Jio-Airtel: जिओचा बाजार उठवण्यासाठी एअरटेल ने आणली बाजारात धमाकेदार ऑफर, मिळणार 35 दिवसांपर्यंत अनलिमिटेड..
Jio- Airtel: एअरटेल ने नुकताच एक प्लॅन आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. ही ऑफर एअरटेलच्या (Airtel Offer) अधिकृत वेबसाईट आणि ॲपवरती पाहायला मिळत आहे. हा एअरटेलचा रिचार्ज प्लॅन 35 दिवसांसाठी वैद्य असणार आहे. या प्लॅनची किंमत 289 रुपये (Airtel Rs 289 Prepaid Plan) एवढी आहे. या ऑफरमुळे कंपनीला चांगला फायदा होईल, असे देखील बोलले जात आहे. एअरटेल (Airtel) आपली प्रतिस्पर्धी असणारी कंपनी जिओला (Jio) टक्कर देण्यासाठी वारंवार नवनवीन ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणत असते. याच गोष्टीमुळे एअरटेल जिओ ला चांगली टक्कर देताना पाहायला मिळत आहे.
35 दिवसांच्या वैद्यतेसह मिळणाऱ्या या 289 रुपयांच्या प्लॅनमध्ये (Airtel Rs 289 Plan Details) आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस आणि 4 जिबी इंटरनेट डेटा या प्लॅनमध्ये मिळत आहे. परंतु जो 4 जीबी डाटा कंपनी ग्राहकांना देत आहे, तो प्रत्येक दिवशी 4 जीबी डेटा नसणार आहे. 35 दिवसांमध्ये केवळ 4 जीबी डाटा कंपनी या प्लॅनमध्ये देत आहे. परंतु कंपनीच्या एअरटेल थँक्स अंतर्गत (Airtel Thanks) काही अधिक सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. मोफत अपोलो 24×7 सर्कल यासह मोफत हॅलोट्यून आणि मोफत Wynk Music ॲप या सारख्या सुविधा कंपनी देत आहे.
परंतु वरील प्लॅन ज्या लोकांना दररोज एक जीबी पेक्षा अधिकच्या डेटाची गरज भासते, अशा ग्राहकांसाठी वरील प्लॅन उपयोगी ठरत नाही. या प्लॅनमध्ये महिन्याला केवळ 4 जिबी डेटा मिळतो. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी Airtel चा 239 रुपयांचा प्लॅन फायदेशीर ठरत आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सह दररोज 1.5 जीबी डेटा ग्राहकांना देण्यात येतो. तसेच दररोज शंभर एसएमएस देखील मिळतात. जर तुमच्याकडे 5 जी सुविधा असणारा मोबाईल असेल तर तुम्ही मोफत 5 जीचा देखील आनंद लुटू शकता. मोफत 5G चा आनंद घेण्यासाठी 239 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागतो.
Jio स्वस्त की Airtel: जर जिओ आणि एअरटेल या कंपनीच्या रिचार्ज प्लॅनचा विचार केला तर जिओचे रिचार्ज प्लॅन्स (Jio Recharge Plans) हे स्वस्त आहेत. जसे की एअरटेलच्या 239 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा 28 दिवसांपर्यंत मिळतो. तर जिओच्या 239 च्या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना दररोज दोन जीबी पर्यंत इंटरनेट डेटा मिळतो. परंतु काही भागांमध्ये जिओच्या नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम येत असल्याच्या तक्रारी ग्राहक करत असतात. तर दुसरीकडे एअरटेल बाबत देखील तक्रारी येत असतात. त्यामुळे काही लोक एअरटेल नेटवर्क वापरण्यात आनंद मानतात, तर काही लोक जिओ नेटवर्क वापरण्यामध्ये आनंद मानतात.
हेही वाचा: Chanakya Niti About Parenting : या 10 गोष्टींची काळजी पालकांनी घेतली पाहिजेच, अन्यथा होईल सत्यानाश
Cow Vs Tiger Fight: अरे बापरे! दबक्या पावलाने गाईने केली वाघाची शिकार, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.