Indurikar Maharaj: इंदुरिकर महाराज यांना अटक करण्याचे कोर्टाचे आदेश; ते घाणेरडं वक्तव्य भोवले..

0

Indurikar Maharaj: प्रसिद्ध कीर्तनकार (kirtankar) इंदुरीकर महाराज (Indurikar महाराज) यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. आपल्या विनोदी बुद्धीने इंदुरीकर महाराज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन उपदेश करत असतात. कीर्तनकार इंदुरीकर महाराज महिलांचा सतत अपमान करतात, असा देखील आरोप त्यांच्यावर सातत्याने होतो. महिलांविषयी इंदुरीकर महाराजांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी असंच एक वादग्रस्त विधान इंदुरीकर महाराजांनी केला होतं, ज्यामुळे आता ते अडचणीत सापडले आहेत.

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर, इंदुरीकर महाराज यांना अटक होण्याची शक्यता आहे. इंदुरीकर महाराज यांना अटक होण्याची शक्यता असली तरी त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टत जाण्यासाठी अवधी मागितला आहे. औरंगाबाद कोर्टाने देखील सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी इंदुरीकर महाराज यांना चार आठवड्याचा कालावधी दिल्याने, तूर्तास तरी त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

का होणार अटक?

इंदुरीकर महाराज यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. कीर्तन करताना इंदुरीकर महाराज म्हणाले होते, पती-पत्नीने जर सम तारखेला शारीरिक संबंध केले, तर मुलगा जन्मतो. त्याचबरोबर जर विषम तारखेला संबंध ठेवले तर मुलगी जन्माला येते. एवढंच नाही, तर संबंध जर अशुभ वेळेला झाला, तर होणारे अपत्य रांगडं, बेवडं, खानदान मातीत घालणारे होते. असं वादग्रस्त विधान इंदुरीकर महाराजांनी केलं.

काय आहेत आरोप?

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या या विधानामुळे त्यांच्यावर लिंगभेद त्याचबरोबर अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचे आरोप केले आहेत. आता हे आरोप सिद्ध झाल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद न्यायालयाने म्हंटले आहे. साहजिकच त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असं असलं तरी त्यांना अटकेपासून चार आठवडे संरक्षण मिळाले आहे.

सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी इंदुरीकर महाराज यांना चार आठवड्याचा कालावधी न्यायालयाकडून देण्यात आला आहे. मात्र सुप्रीम कोर्टात देखील त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. इंदुरीकर महाराजांना जर सुप्रीम कोर्टामध्ये देखील दोषी ठरवण्यात आलं, तर त्यांना कायद्यानुसार जेलची हवा खावी लागू शकते.

हे देखील वाचा shubman gill: सारा नव्हे या पोरीच्या प्रेमात पागल आहे शुभमन गिल? त्या फोटोमुळे झाला भांडाफोड..

Health Tips: पाणी पिण्याच्या या तीन आहेत सर्वात घातक वेळा; वेळीच थांबला नाहीत तर..

Vastu Tips: अशा ठिकाणी घर बांधल्यास व्हाल बर्बाद, जाणून घ्या घर बांधण्याचे योग्य ठिकाण..

Asia Cup 2023: पाकिस्तानमध्ये होणार सामने; भारत पाकिस्तान तीन वेळा होणार लढत, वाचा सर्व डिटेल्स..

Chanakya Niti: ही तीन कामे केल्यामुळे अफाट कष्ट करूनही लक्ष्मी राहते सदैव नाराज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.