MPL 2023: केदार जाधव आणि ऋतुराजची आज झुंज, आज पासून MPL चा थरार सुरू; कधी आणि कोठे पाहाल सामने? जाणून घ्या..
MPL 2023: आयपीएलच्या (ipl) धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) पहिल्या एमपीएल म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीग (Maharashtra premier league) स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आजपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, या स्पर्धेचा पहिला सामना ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव (Rituraj Gaikwad vs Kedar Jadhav) या दोन क्रिकेटर्समध्ये रंगणार आहे. ऋतुराज गायकवाड पुणेरी बाप्पा (puneri Bappa) तर केदार जाधवचा कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) संघाचे कर्णधापद भूषवणार आहे. (MPL 2023 Matches Fixtures Teams Ruturaj Gaikwad vs Kedar Jadhav)
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये पुणेरी बप्पा, ईगल नाशिक टायटन्स, कोल्हापूर टस्कर्स, छत्रपती संभाजी किंग्ज, सोलापूर रॉयल्स, रत्नागिरी जेंट्स, असे एकूण सहा संघ असणार आहेत. हे सारे संघ एकमेकांबरोबर खेळणार असून, आयपीएल प्रमाणे चार संघांमध्ये क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना होणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये एकूण 19 सामने होणार आहेत. हे 19 सामने 14 दिवसात खेळण्यात येणार असून, या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जूनला होणार आहे. या स्पर्धेचे संपूर्ण सामने हे पुण्यातील गेहंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर पार पडणार आहेत. (Maharashtra cricket association stadium gahunje)
कुठे पाहाल सामना
आयपीएल प्रमाणे ही स्पर्धा रंगतदार होणार असल्याचं अनेक क्रिकेट विश्लेषकांनी म्हटलं आहे. अनेक नवीन खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची ही संधी असून, उत्कृष्ट खेळ करणारे खेळाडू आयपीएलमध्ये देखील पाहायला मिळणार आहेत. साहजिकच त्यामुळे खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ या स्पर्धेत दाखवण्यासाठी उत्सुक आहेत.
दुपारी दोन त्याचबरोबर रात्री आठ वाजता, हे सामने पार पडतील. या सामन्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन DD वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्याचबरोबर ओटीपी प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला हा सामना पाहायचा असेल, तर ‘फॅनकोड’ (fancode) या स्ट्रीमिंगवर हा सामना पाहू शकता.
ऋतुराज आणि केदारची झुंज, कोण सरस?
पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या संघामध्ये आज आठ वाजता या स्पर्धेची पहिली लढत रंगणार आहे. या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स सहसंघ अधिक तुल्यबळ वाटत आहे. कोल्हापूर संघामध्ये केदार जाधव नौशाद शेख अंकित बावणे सचिन धस साहिल अवताडे असे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. या सामन्याचे उद्घाटन सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून अमृता खानविलकरसह अनेक कलाकारांची उपस्थिती असणार आहे.
MPL चे वेळापत्रक –
15 जून 2023 पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स (8 PM)
16 जून 2023 ईगल नाशिक टायटन्स vs छत्रपती संभाजी किंग्स, 2 वाजता
रत्नागिरी जेट्स vs सोलापूर रॉयल्स (8 PM)
17 जून 2023 कोल्हापूर टस्कर्स vs रत्नागिरी जेट्स (8 pm)
18 जून 2023 ईगल नाशिक टायटन्स vs सोलापूर रॉयल्स 2 pm
पुणेरी बाप्पा vs छत्रपती संभाजी किंग्स (8pm)
19 जून 2023 पुणेरी बाप्पा vs ईगल नाशिक टायटन्स 8pm
20 जून 2023 सोलापूर रॉयल्स vs कोल्हापूर टस्कर्स 2pm
रत्नागिरी जेट्स vs छत्रपती संभाजी किंग्स, 8 pm
21 जून, ईगल नाशिक टायटन्स vs रत्नागिरी जेट्स, 8pm
22 जून, छत्रपती संभाजी किंग्स vs कोल्हापूर टस्कर्स, ( 2pm )
पुणेरी बाप्पा vs सोलापूर रॉयल्स (8pm)
23 जून, सोलापूर रॉयल्स vs छत्रपती संभाजी किंग्स, ( 8pm)
24 जून पुणेरी बाप्पा vs रत्नागिरी जेट्स (2pm)
कोल्हापूर टस्कर्स vs ईगल नाशिक टायटन्स, (8pm)
26 जून 2023- क्वालिफायर 1
27 जून 2023- एलिमिनेटर
28 जून
2023- क्वालिफायर 2
29 जून2023 – अंतिम सामना
हे देखील वाचा INDvsWI T20I Series: रोहित, विराटला टी ट्वेंटी संघातून कायमस्वरूपी डच्चू; IPL गाजवणाऱ्या पाच खेळाडूंना संघात स्थान..
Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून पत्नीला हव्या असतात या चार गोष्टी..
Aadhar card update: आधारकार्ड धारकांनो दोन दिवसांत करा हे काम नाहीतर द्यावे लागतील पैसे..
Viral video: काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ! गुरांच्या कळपात वाघ शिरला अन्..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम