Viral video: काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ! गुरांच्या कळपात वाघ शिरला अन्…

0

Viral video: सोशल मीडियावर (social media) अनेक व्हिडिओ व्हायरल (video Viral) होतात. काही व्हिडिओ मनाला स्पर्श करून जातात. तर काहीच व्हिडिओ प्रेरणा देखील देऊन जातात. मात्र काही व्हिडिओ डोळ्यातून अश्रू आणणारे असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील.

प्राण्यांची लाईफस्टाइल (animal lifestyle) जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. प्राणी कसे राहतात? काय खातात? याबरोबरच शिकार कसे करतात? हे देखील आपण आवर्जून पाहतो. मात्र काही हिंसक प्राणी इतर गरीब प्राण्याची शिकार करताना आपल्याला पाहवत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ देखील असाच आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एका मोकळ्या माळरानामध्ये गुरांचा कळप गवत खात आहे. अनेक गुरे गवत खाण्यात मग्न असताना अचानक एक वाघ गुरांच्या कळपात घुसतो. वाघ शिकार करण्यासाठी आला आहे, हे पाहून इतर अनेक जनावरे पळून जातात. मात्र एक गाय वाघाच्या तावडीत सापडते.

वाघाने केलेला हल्ला इतका हिंसक आणि आक्रमक होता गाईला काही समजायच्या आत गाय जमिनीवर कोसळते. वाऱ्याच्या वेगाने एका गाईला आपले लक्ष करून वाघ तिच्या अंगावर झेप घेतो. वाघाच्या तावडीतून गाय स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, मात्र गाईचे प्रयत्न अपुरे पडतात. आणि ती वाघाची शिकार होते. वाघ गाईला खाली पाडून काही सेकंदाच्या आतमध्ये तिला आपले भक्ष्य बनवतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ राजस्थानमधील आहे. राजस्थानच्या रणथंबोर नॅशनल पार्कममधील ही घडली आहे. @VikramKhatanaji ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल देखील झाला आहे.

हे देखील वाचा Aadhar card update: आधारकार्ड धारकांनो दोन दिवसांत करा हे काम नाहीतर द्यावे लागतील पैसे..

Samsung Galaxy S22 Plus: एक लाखाचा Samsung smartphone मिळतोय केवळ 18 हजारांत; विश्वास नाही बसत मग पाहा..

INDvsWI T20I Series: रोहित, विराटला टी ट्वेंटी संघातून कायमस्वरूपी डच्चू; IPL गाजवणाऱ्या पाच खेळाडूंना संघात स्थान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.