Extramarital affair: या चार गोष्टीवरून समजते पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही..

0

Extramarital affair: पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. विश्वासाबरोबरच पती-पत्नीमध्ये एकमेकांविषयी आदर नसेल, तर नात्यात कटूता निर्माण होते. आणि म्हणून विश्वास, प्रेम, आणि आदर या गोष्टी पती पत्नीच्या नात्यात खूप महत्त्वाचा रोल अदा करतात. मात्र अलीकडच्या काळात पती-पत्नीच्या नात्यात कटूता निर्माण होणाऱ्या घटना वारंवार घडल्याचे पाहायला मिळतं. अलीकडे किरकोळ घटस्पोटाच्या केसेस देखील तुलनेने अधिक होताना दिसतात.

पती-पत्नीचं नातं सुंदर आणि आनंदी बनवायचं असेल, तर दोघांनाही आपापली जबाबदारी पार पाडावी लागते. पती-पत्नीचे नाते हे दोन चाकाच्या गाड्या प्रमाणे असते. साहजिक त्यामुळे दोघांच्याही खांद्यावर बोजा असतो. तो व्यवस्थितपणे केला, तर वैवाहिक जीवनाचा गाडा व्यवस्थित चालतो. आदर, प्रेम कमी होत गेल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो. नात्यांमध्ये प्रेम आणि आदर कमी होत असेल, तर त्याला दोघेही तितकेच जबाबदार असतात.

विवाहबाह्य संबंध हे अलीकडच्या काळात अनेकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. विवाहबाह्य संबंधाला अनेक कारणे आहेत. अनेकदा विवाहबाह्य संबंधाला पती देखील कारण ठरतो. पत्नीचे जर विवाहबाह्य संबंध असतील, तर पत्नीचे प्रेम कमी झाल्याचे तुम्हाला जाणवेल. त्याचबरोबर तुम्ही पत्नीच्या वागणुकीवरून देखील याचा अंदाज लावू शकता. जाणून घेऊया सविस्तर.

नवीन लग्न झाल्यानंतर, पती-पत्नी दोघेही उत्साही आणि आनंदी असतात. मात्र हा उत्साह कायम असाच राहील असं होत नाही. कालांतराने तुमची सतत भांडणे होत असतील, तर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. छोट्या-छोट्या गोष्टीवरून, जर वाद-विवाद होत राहिला, तर याचा अर्थ तुमच्याविषयी पत्नीला आदर राहिला नाही असा होतो.

पतीव्यतिरिक्त एखाद्या विषयी अट्रॅक्शन असणे सामान्य बाब आहे. कधी-कधी पतीच्या चुकीमुळे देखील महिला विवाह बाह्य संबंध ठेवतात. जर पूर्वीपेक्षा पत्नीच्या वागण्यात फरक जाणवत असेल, बदल झाला असेल, तर तुमच्या पत्नीचे इतरांविषयी अट्रॅक्शन असण्याची शक्यता असते.

पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. जर तुमची पत्नी तिच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या सोबत शेअर करत असेल, मात्र अचानक पत्नीने तिच्या आयुष्यातल्या गोष्टी शेअर करणं बंद केलं असेल, तर विवाहबाह्य संबंध असू शकतात. मात्र विनाकारण पत्नीवर संशय घेणे ही देखील जीवनातील सगळ्यात मूर्ख बाब आहे.

वैवाहिक जीवनामध्ये संबंधाला फार महत्त्व आहे. जर पत्नीला संबंधाविषयी इंटरेस्ट नसेल, पत्नीचा रोमँटिकपणा कमी झाला असेल, तरीदेखील पत्नीचे विवाहबाह्य संबंध असू शकतात. जर पत्नी एखाद्या पुरुषाच्या प्रेमात असेल, तर अशा गोष्टी तिच्याकडून घडत असतात. असे एका सर्वेतून समोर आलं आहे.

जर तुमची पत्नी पूर्वीपेक्षा मोबाईलवर अधिक वेळ घालवत असेल, आणि मोबाईल तुमच्या पासून लपवत असेल, तरीदेखील पत्नी इतर पुरुषाच्या प्रेमात असू शकते. असं देखील एका सर्व्हेतून समोर आले आहे. एका सर्व्हेतून महिला मोबाईलवर अधिक वेळ घालवत असणाऱ्या आणि आपल्या पार्टनर पासून मोबाइल लपवत असणाऱ्या महिलांचे विवाहबाह्य संबंध असतात, असे समोर आले आहे.

हे देखील वाचा IPL 2023 playoffs Scenario: RCB च्या विजयाने तीन संघ व्हेंटिलेटरवर; मुंबई जिंकूनही पोहचणार नाही प्लेऑफमध्ये..

Honda EM1 electric scooter: Honda ची दमदार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल; जाणून घ्या फीचर्स आणि वैशिष्ट्ये..

Google search: नवीन लग्न झालेल्या मुली गुगलवर सर्च करतात या पाच धक्कादायक गोष्टी; दुसरी आहे फारच भयानक..

Realme Narzo N53: 50MP कॅमेरा, 6GB RAM असणारा Realme चा सर्वात पातळ स्मार्टफोन लॉन्च; किंमत केवळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.