YS Sharmila: ..म्हणून मुख्यमंत्र्याच्या बहिणीने आणि आईने मारली पोलिसांच्या कानाखाली; भाजप घेणार हा स्टँड..
YS Sharmila: सत्ता आणि पदाचा गैरवापर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे. आमदार, खासदाराची ओळख सांगून अनेकदा गैरफायदा घेतला जातो. राजकारणामध्ये जर तुमचा नातेवाईक मोठ्या पदावर असेल, तर स्वतःची कामे करून मोठ्या प्रमाणात करून घेतली जातात. कामे करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकला जातो. हे आता काही लपून राहिले नाही. यासंदर्भातलीच एक बातमी समोर आली आहे. थेट मुख्यमंत्री यांच्या बहिणीने आणि आईने पोलिसांचा कानशिलात लगावल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
वायएसआर तेलंगणा या पक्षाच्या नेत्या असणाऱ्या तसेच आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या बहीण असणाऱ्या वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी थेट पोलिसांच्या कालशिलात लगावली आहे. याप्रकरणी आता त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आता त्या जामिनावर बाहेर आल्या आहेत.
सत्तेत असणारी लोकं प्रशासनावर दादागिरी करतात. हे आपण ऐकून होतो. मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यानेच थेट पोलिसांच्या कानशिलात लगावल्याने या प्रकरणाची चर्चा देशभर होताना पाहायला मिळत आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या बहिण शर्मिला ह्या विशेष तपास पथकाच्या कार्यालयामध्ये जात होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना या कार्यालयात जाऊ दिले नाही. आणि म्हणून संतापून त्यांनी पोलिसांच्याच कानशिलात लगावली.
तेलंगणामध्ये सध्या पेपर फुटी प्रकरणी जोरदार गदारोळ माजला आहे. भरती परीक्षेचा पेपर फुटी झाल्यामुळे तेलंगणामध्ये सरकार बॅकफूटवर असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. सरकारने यासंबंधी विशेष तपास पथक देखील नेमलं आहे. आता याच तपास पथकाच्या ऑफिसमध्ये जाण्यापासून पोलिसांनी रोखल्याने शर्मिला यांनी हे पाऊल उचललं.
तेलंगणामध्ये झालेली भरती परीक्षेचा पेपर फुटी संदर्भात राज्य लोकसेवा आयोग ही परीक्षा घेत होते. सरकारने या संबंधी एसआयटी नेमली असती तरीदेखील या एसआयटीचा तपास कशाप्रकारे होतो, हे आम्हाला पाहायचं आहे. आणि म्हणून शर्मिला कार्यालयात जात होत्या. कार्यालयात जात असताना पोलिसांनी त्यांना वेळीच अडवलं. पोलिसांशी हुज्जत घालताना त्या संतापल्या. आणि त्यांनी थेट कानशिलात लगावली.
मुख्यमंत्र्याच्या आईनेही केली धक्काबुक्की
शर्मिला यांना अटक करण्यात आल्यानंतर, त्यांच्या आईने देखील पोलिसांशी हुज्जत घातली. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आई वायएस विजयम्माही यांनी देखील आपल्या मुलीला अटक केल्यानंतर, पोलिस स्टेशनमध्ये हजर राहत पोलिसांशी धक्काबुक्की केली. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH | YSRTP Chief YS Sharmila manhandles police personnel as she is being detained to prevent her from visiting SIT office over the TSPSC question paper leak case, in Hyderabad pic.twitter.com/StkI7AXkUJ
— ANI (@ANI) April 24, 2023
भाजप उचलणार फायदा
तेलंगानामध्ये आगामी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी भाजप जोरदार कंबर कसत आहे. भाजपने गेल्या काही वर्षापासून दक्षिण भारतामध्ये अधिक जागा निवडून आणण्याची योजना आखली आहे. पेपर फुटी प्रकरणी तेलंगणा सरकार बॅफूटवर असताना या नवीन प्रकरणामुळे भाजपला दोन्ही पक्षांवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे.
हे देखील वाचा Sugarcane Juice Benefits: कावीळ-मुतखड्यावर रामबाण उपाय आहे हा उन्हाळी ज्यूस; मात्र या 5 लोकांना येणार नाही पिता..
TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..
IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम