Aadhaar Card: आधार कार्ड हरवलंय? तर चिंता करू नका; दोन मिनिटात ‘असं’ करा डाऊनलोड..

0

Aadhaar Card: आधार कार्ड (aadhar Card) हे फक्त तुमची ओळख नाही, तर आधार देखील आहे. सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. लहान मुलांपासून वयोवृद्ध मंडळीकडे देखील आधार कार्ड असणे सरकारने बंधनकारक केले आहे. मात्र कामाच्या व्यापात अनेकदा आधार कार्ड कुठे ठेवलं आहे, याचं भान राहत नाही. गहाळ झाल्याचे देखील प्रकार घडतात. जर तुमच्या बाबतीतही असं घडलं असेल, तर चिंता करण्याची करण्याची गरज नाही. केवळ एका ओटीपीच्या माध्यमातून तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करता येणार आहे. (Aadhaar Card Apply)

दिवसेंदिवस आधार कार्डचे महत्व वाढत चालल्याचे दिसते. सरकारने नागरिकांकडे फक्त आधार हेच एकमेव ओळखपत्र असावे. यासाठी पॅन कार्ड, (pan Card) रेशन कार्ड (Ration Card) ड्रायव्हिंग लायसन्स (driving licence) अशा अनेक ओळखपत्रांना आधार कार्ड लिंकिंक करण्याचा सरकारचा मानस आहे. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सहाजिकच यामुळे आता तुमच्याकडे आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे. आता आपण हरवलेले आधार कार्ड कसे काढायचे? हे सविस्तर जाणून घेऊ.

जर तुमचे आधार कार्ड कुठे गहाळ झालं असेल, किंवा हरवलं असेल, तर तुमच्याकडे आधार कार्डचा बारा अंकी नंबर असायला हवा. एखाद्याकडे जर हा नंबर नसेल, तरीदेखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. या नंबर व्यतिरिक्त तुमच्याकडे 28 अंकी नावनोंदणी आयडी क्रमांक असायला हवा. या दोन्हीपैकी एकही नंबर तुमच्याकडे नसेल, तरीदेखील तुम्ही आधार क्रमांक मिळवू शकता. सर्वप्रथम आपण नाव नोंदणी आयडी कसा मिळवायचा? हे जाणून घेऊ. आणि त्यानंतर आधार कार्ड कसे काढायचे हे पाहू.

असा मिळवा नावनोंदणी आयडी

नाव नोंदणी आयडी क्रमांक मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला “मोबाईल नंबरवर आधार मिळावा” हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर एनरोलमेंट आयडी पुनर्प्राप्ती या पर्यायावर क्लिक करायचे आहे. नंतर समोरील रकान्यात सर्व तपशील भरून सबमिट करायचं आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला एनरोलमेंट आयडी तसेच आधार क्रमांक दिसेल.

या पद्धतीने काढा आधारकार्ड

आधार कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जायचं आहे. त्यानंतर Order Aadhaar Reprint या पर्यायावर क्लिक करायचं आहे. समोरील रकान्यामध्ये तुम्हाला तुमचा एनरॉलमेंट आयडी (EID) नोंदवायचा आहे. त्यानंतर खाली असणारा CAPTCHA व्यवस्थित भरून, Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी समोरील रकान्यामध्ये व्यवस्थित भरायचा आहे. T&C चेकबॉक्स मार्क करा. आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला समोरील ‘Make Payment’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हवी ती ऑनलाईन पेमेंटची पद्धत निवडून पैसे भरायचे आहेत.

आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क आकारले जाईल. त्यानंतर तुम्ही आधार कार्डची प्रिंट काढू शकता. पंधरा दिवसानंतर तुम्हाला पोस्टच्या माध्यमातून घरपोच आधार कार्ड मिळवू शकता

 देखील वाचा Second Hand Bike: नवी कोरी Hero HF Deluxe मिळतेय 25 हजारात, तर Hero passion Pro मिळतेय 30 हजारात..

Aadhar Card Loan: आता आधारकार्ड वरून मिळणार दोन लाख लोन, तेही ऑनलाईन; जाणून घ्या सविस्तर..

Mobile Aadhaar linking: आता आधार कार्डला सिमकार्ड लिंक करणे अनिवार्य; जाणून घ्या सिमकार्ड आधारशी लिंक करण्याची प्रोसेस..

PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

Aadhar card update: आता आधार कार्डवरचा फोटो बदलणे झाले अधिक सोपे; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत..

Ration Card Update: मोठी अपडेट! या रेशन कार्ड धारकांचे रेशन बंद..

Ration Card: सरकारचा मोठा निर्णय! या 14 जिल्ह्यांना मिळणार रेशन ऐवजी वर्षाला 36 हजार रुपये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.