Shikhar Dhawan: पत्त्याचा डाव मांडला अन् अचानक पोलिसांची एंट्री झाली; शिखर धवनचे साथीदार पळाले, पुढे काय घडलं पाहा व्हिडिओ..

0

Shikhar Dhawan: सध्या आयपीएलचा (IPL season16) रणसंग्राम सुरू असून, प्रत्येक खेळाडू आपापल्या संघाला जिंकवण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहे. या आयपीएल सीझनमध्ये पंजाबचा (Punjab kings) संघ देखील दमदार कामगिरी करत आहे. पंजाब संघाचे नेतृत्व भारताचा सलामीवीर शिखर धवन s (hikhar dhawan करत असून, त्याच्या नेतृत्त्वात पंजाबने एकूण तीन सामन्यात दोन विजय संपादन केले आहेत. शिखर धवन खूप मजेशीर खेळाडू आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. सोशल मीडियावर तो कमालीचा ॲक्टिव असतो. (Shikhar Dhwan Leaked Video)

आयपीएलच्या सामन्यांचा तणाव किती मोठा असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खासकरून जर तुम्ही एखाद्या संघाचा कर्णधार असाल, तर तुम्ही सामना संपेपर्यंत प्रचंड तणावात असता. साहजिकच यातून बाहेर निघण्यासाठी अनेक खेळाडू सामना संपल्यानंतर, मनोरंजनाच्या माध्यमाचा वापर करतात. शिखर धवनचा देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ?Shikhar Dhawan viral video)

शिखर धवन एका झाडाखाली मातीमध्ये पत्त्या खेळताना पाहायला मिळत आहे. शिखर धवनने हा पत्त्याचा डाव आपले साथीदार राहुल चहर, आणि हरप्रीत ब्रार सोबत टाकला आहे. हे दोघेही सध्या पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, पत्त्याचा डाव रंगदार अवस्थेत आला असताना अचानक पोलिसाची एन्ट्री होते. पोलीसाची एन्ट्री झाली आहे, हे पाहून तिघेही दचकतात. राहुल चाहर आणि हरप्रीत पत्त्या सोडून पळूनही जातात.

दोघेही पळून गेल्यानंतर, शिखर धवन त्यांना म्हणतो, अरे या. हे माझे वडील आहेत. हा सगळा संवाद पंजाबी भाषेत असून, मनोरंजनासाठी शिखर धवनने खूपच मजेशीर रिल्स बनवलं आहे. पोलिसांच्या सायरनचा आवाजही या रीलच्या बॅकग्राऊंडला दिला असल्याने हे रिल्स खूपच रियलिस्टिक वाटत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे रिल्स जवळपास साडेसहा लाख लोकांनी लाईक केले आहे. तर तीस लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. शिखर धवनचा नुकताच एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो आपल्या खाजगी गोष्टी बोलत होता. या व्हिडिओची सत्यता समोर आली नाही. मात्र या व्हिडिओतील संभाषण खूपच अश्लील भाषेत होतं.

हे देखील वाचा Shikhar Dhawan Viral video: पहिल्याच भेटीत प्रेम, लगेच हॉटेलमध्ये घेऊन गेलो शिखर धवनच्या त्या व्हिडिओने खळबळ..

My11Circle prediction: My11Circle वर टीम बनवताय? जिंकायचं असेल, तर या पाच गोष्टी विचारात घेऊनच बनवा टीम..

PM Kisan Yojana: या दिवशी येणार 14 वा हप्ता, पण त्याआधी करावं लागणार हे काम; तुम्हाला १४वा हप्ता मिळणार का? जाणून घ्या या पद्धतीने..

CSK vs RR: या सिझनचे दोन सर्वात तगडे संघ एकमेकांशी भिडणार; जाणून घ्या कोण मारणार बाजी..

Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी वाट पाहाल तर कंगाल व्हाल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.