Post Office RD: फक्त दहा हजार गुंतवा, मिळेल 16 लाखांचा परतावा; होय ही आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना..
Post Office RD: प्रत्येकाला भविष्याची चिंता असते. म्हणून प्रत्येक जण आपल्या पगारातली काही रक्कम अनेक कंपन्यांमध्ये गुंतवत असतो. मात्र अलीकडे विश्वासाहर्ता जवळ्पास संपुष्टातआली आहे. अलीकडे मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत असल्याचं पाहायला मिळते. आणि म्हणून अनेक जण आता गुंतवणूक करताना दहा वेळा विचार करतात. मात्र आता सरकारच्याही अशा काही योजना आहेत. ज्यामध्ये काही हजारांची गुंतवणूक करून तुम्ही बक्कळ परतावा मिळवू शकता.
पोस्ट ऑफिसमध्ये (post office) अनेक गुंतवणुकीच्या योजना सुरू आहेत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही बक्कळ परतावा मिळवू शकता. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेविषयी जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसमध्ये खूप कमी रकमेपासून आता गुंतवणूक केली जात आहे. सरकारची ही योजना असल्यामुळे पैसे बुडण्याची देखील भिती नाही. कोणत्याही जोखमेशिवाय तुम्ही कमी रकमेची गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवू शकता. “पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट” असं या योजनेचे नाव आहे. जाऊन घेऊया सविस्तर.
“पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट” या योजनेचा पोस्ट ऑफिस योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेत भारतातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो. काही अटी आणि शर्तीचे पालन करून या योजनेत तुम्ही देखील गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे, या योजनेचा परतावा पाहिला तर तुमचे देखील डोळे फिरतील. या योजनेत पोस्ट ऑफिस कमालीचे व्याजदर देत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्ही शंभर रुपयापासून गुंतवणुकीस सुरुवात करू शकता. तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला शक्य होईल, तेवढी रक्कम तुम्ही या योजनेत गुंतवू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी पाच वर्षासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यापेक्षा कमी गुंतवणूक करण्याची सुविधा या योजनेमध्ये ग्राहकांना मिळत नाही. मात्र तुम्हाला शंभर रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा दिली जाते.
जाणून घ्या व्याजदर
पोस्ट ऑफिसमध्ये सध्या आवर्ती ठेव या योजनेवरती तब्बल 5.8 टक्के व्याजदर दिले जात आहे. ग्राहकांना पोस्ट ऑफिसने एक जानेवारी 2023 पासून या व्याजदराची सुविधा अदा केली आहे. सरकारकडून आवर्ती ठेव योजनेवर प्रत्येक तीन महिन्याला व्याजदर निश्चित केले जातात. काही खाजगी कंपन्यांमध्ये यापेक्षा जास्त व्याजदर दिला जात आहे, मात्र विश्वासहार्यते विषयी प्रश्नचिन्ह आहे.
असे मिळणार सोळा लाख
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट या योजनेमध्ये तुम्हाला 16 लाख रुपये परवा मिळवायचा असेल, तर तुम्हाला काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी, दर महिना दहा हजार रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम तुम्हाला दहा वर्षासाठी भरायची आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला दहा वर्षापर्यंत ही रक्कम काढता येणार नाही. जर या अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला 5.8% दराने तब्बल दहा वर्षानंतर 16 लाख रुपये मिळणार आहेत.
तर खाते बंद होईल..
जर तुम्ही तुमच्या आरडी खात्यामध्ये वेळेवर पैसे जमा केली नाहीत, तर तुमचे खाते बंद देखील करण्यात येऊ शकते. जर तुमचे चार हप्ते थकले तर तुमचे खाते बंद होईल. शिवाय महिन्याच्या प्रत्येक तारखेला जर तुम्ही पैसे भरले नाहीत, तर तुम्हाला दंड देखील आकारला जाणार आहे. प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये तुम्हाला दहा वर्षाकरिता भरायचे आहेत. म्हणजेच एकूण रक्कम तुम्हाला 12,00,000 रुपये भरावी लागणार आहे. त्यानंतर दहा वर्षांनी तुम्हाला 16 लाख रुपये मिळतील.
हे देखील वाचा UPI Credit Payment: खात्यावर पैसे नसले तरीही UPI द्वारे करू शकता पेमेंट; जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम..
MI vs CSK: या तीन कारणामुळे मुंबई इंडियन्सचा उडणार धुव्वा; जाणून घ्या धोनीचा मास्टर प्लॅन..
physical relationship: संबंध करताना चुकूनही खाऊ नका हे चार पदार्थ अन्यथा..
IRCTC Recruitment 2023: B.Sc उत्तीर्ण आहात, असा करा अर्ज नोकरी मिळेल हमखास..
Dhanashree Verma story: चहलच्या पत्नीची पुन्हा श्रेयस अय्यर सोबत मौज मस्ती; व्हायरल व्हिडिओने खळबळ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम