Delhi Metro kiss: भर मेट्रोतच सुरू केला इम्रान हाश्मी स्टाईल kiss; एक मिनिट किस करूनही थांबायचं नाव घेत नव्हतं कपल..
Delhi Metro kiss: प्रेमामध्ये रोमान्सला खूप महत्त्व असलं तरी सार्वजनिक ठिकाणी काही मर्यादा पाळणे आवश्यक असतं. अनेकदा आपण पाहतो, कपल प्रवास करत असताना अचानक रोमँटिक होतं. आणि मग आसपास असणाऱ्या लोकांना नको तो प्रकार पाहायला मिळतो. प्रेम ही खूप सुंदर कल्पना आहे. असं म्हणतात, माणूस प्रेमात असला की त्याला हे जग सुंदर वाटू लागतं. एवढेच नाही, तर जगाचा विसर देखील पडतो. आता काहीसा असाच प्रकार दिल्लीच्या मेट्रोमध्ये घडला आहे. (Delhi metro Couple romance video)
दिल्लीच्या मेट्रोमध्ये एका कपलचा व्हिडिओ (video) सोशल मीडियावर (social media) तुफान वायरल (viral) झाला आहे. भाजपच्या वीरेंद्र तिवारी नेत्याने आपल्या सोशल मीडिया काउंट करून हा व्हिडिओ पोस्ट करताना, लहान मुलांवर याचे काय परिणाम होतील? असा सवाल उपस्थित करत, या कपलवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी देखील मागणी केली. पाश्चिमात्य देशात या गोष्टी सामान्य असल्या तरी भारतात मात्र अद्यापही सार्वजनिक ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टींचे पालन करावं लागतं. मात्र अलीकडे भारतात देखील पाश्चिमात्य संस्कृती जोपासली जाते की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
काय घडलं नक्की
दिल्ली मेट्रोने प्रवास करणाऱ्या एका कपलचा हा व्हिडिओ आहे. मेट्रोमध्ये उभे राहिल्यानंतर, हे कपल अचानक मूडमध्ये आले. आणि या दोघांनी बंद दाराआड करण्याच्या गोष्टी मेट्रोमध्ये सुरू केल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे. हे कपल मिठी मारल्यानंतर रोमँटिक मूडमध्ये येतं. मेट्रोमध्ये उभे असलेले हे कपल फक्त मिटीपर्यंतच न थांबता, या दोघांनी थेट मेट्रोतच किस करायला सुरुवात केली.
किस करत असताना या दोघांना आपल्या आसपास लोकं देखील बसली आहेत, त्याचा विसर पडल्याचे तुम्ही पाहू शकता. सोशल मीडियावर तब्बल एक मिनिटाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, एक मिनिट हे दोघेही असेच चाळे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी मेट्रोत बिकिनी घालून एक तरुणी प्रवास करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा मेट्रोतला हा प्रकार समोर आल्याने मेट्रो विभागाने या संदर्भात पाऊले उचलली पाहिजेत, असं सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं आहे.
अपने बच्चों को कम से कम इतना तो सिखाएं…कि उन्हें कौन सा काम..कहां करना चाहिए…गन्दगी फैला के रखा हुआ है ऐसे लोगों ने… #दिल्ली_मेट्रो pic.twitter.com/AvCt0efTvl
— VIRENDRA TIWARI (@RealVirendraBJP) April 2, 2023
अलीकडे प्रेमीयुगुल आपल्या भावना व्यक्त करताना समाजाचा कसलाही विचार करत नाहीत. त्यांच्या अशा कृत्यामुळे आसपास असणाऱ्यांना अनकॉम्फर्टेबल वाटते. या तरुणांच्या आसपास अनेक वय वृद्ध मंडळीही असतात. त्यांना हा किळसवाणा प्रकार वाटतो. मात्र तरीदेखील या तरुणांना याचा कसलाही फरक पडत नाही. याकडे गांभीर्याने पाहून असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहेत.
हे देखील वाचा Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..
PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम