UPI Payment System: वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, पेमेंटवर लागू शकते ‘एवढे’ शुल्क
UPI Payment System: जर तुम्ही UPI वापरकर्ते असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. UPI Payment System Update आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी आणि त्याची आर्थिक व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी सरकार अशा व्यवहारांवर आता लवकरच 0.3 टक्के डिजिटल पेमेंट सुविधा शुल्क आकारण्याचा विचार करू शकते. त्याचे कारण असे की Indian Institute Of Technology (IIT)-बॉम्बेने केंद्र सरकारला तसे सुचवले आहे.
केंद्र सरकारला ५००० हजार कोटी मिळणार
‘PPI-आधारित UPI पेमेंट्ससाठी चार्जेस- द डिसेप्शन’ च्या अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की 0.3 टक्के सुविधा शुल्कातून 2023-24 मध्ये केंद्र सरकारला सुमारे 5,000 कोटी रुपये एवढी रक्कम उभा करता येऊ शकते. दुकानदारांकडून मिळालेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, सल्ला देखील देण्यात आला आहे.
असा आहे नियम: सध्या दुकानदारांना ग्राहकांनी केलेल्या UPI पेमेंटवर 1 एप्रिल 2023 पासून पेमेंट रक्कमेवरील 1.1 टक्के शुल्क द्यावे लागत आहे. सध्याच्या नियमानुसार बँक किंवा इतर कोणतीही UPI पेमेंट सिस्टीम सेवा देणारी कंपनी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे UPI Payment वर कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारू शकत नाही. परंतु या अगोदर देखील अनेकदा बँक आणि UPI सिस्टम प्रोव्हाइर कंपन्यांनी UPI कायद्याला आपल्या सोयीनुसार वापरण्याचा प्रयत्न केला आहे.
Aadhar card: आधार कार्डवरून बँक अकाउंट केलं जातंय रिकामं; त्वरित फॉलो करा या टीप्स..
PAN Card Apply: सात दिवसात घरपोच मिळवा पॅन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची ही सोपी पद्धत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम