How To Get Sleep Early: रात्री चांगली झोप लागत नसेल तर करा ‘हे’ काम झटक्यात लागेल झोप..

0

How To Get Sleep Early: निरोगी आयुष्य जगण्यासाठी झोप ही अत्यंत महत्वाची असते. प्रत्येक व्यक्तीने किमान आठ तास झोप घेणे गरजेचे असते. असे अनेक संशोधनातून सांगण्यात आले आहे. कमी झोप घेतल्याने अनेक आजार जडतात. हे तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल. पुरेशी झोप न घेतल्याने हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह यासारख्या समस्या उद्भवतात. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता देखील कमी होत असते. त्यामुळे झोप ही निरोगी आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे.

सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकांना रात्री झोप लागत नाही. सध्या अगदी पंचविशीतील तरुण याचे शिकार मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात मोबाईल हा झोपेचा शत्रू बनला आहे. मात्र झोप ना येण्याचे प्रमुख कारण हे टेन्शन आहे. ज्या व्यक्तीला खूप टेन्शन असते, त्या व्यक्तीला रात्री झोप लागत नाही. झोपेच्या अनेक समस्या उद्भवतात. असं म्हणतात चिंता माणसाला जिवंतपणी जाळते. जर तुम्हाला देखील झोपेची समस्या सतावत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. चांगली झोप लागण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो? जाणून घेऊ सविस्तर.

शांत झोप येण्यासाठी दूध खूप फायदेशीर असते. दूधामध्ये अमिनो ऍसिड ट्रिप्टोफॅन नावाचा पदार्थ असतो, जो झोप येण्यास मदत करतो. तुम्हाला जर चांगली झोप लागत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध फायदेशीर ठरू शकते. दुधामध्ये हळद टाकून पिल्यास रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. चांगली झोप येण्यासाठी कॅमोमाइल चहा आणि चेरीचा रस देखील उपयुक्त आहे. मद्यपान झोपेसाठी प्रचंड घातक आहे. मद्यपान केल्याने चांगली झोप होत नाही. त्यामुळे झोपेची समस्या असेल, तर मद्यपान करणे टाळा.

अनेकांना झोपताना मोबाईल किंवा टीव्ही पाहण्याची सवय असते. जेवण झाले की हातात मोबाईल घेऊन बेडवर पडणे आणि मोबाईल पाहत बसणे ही तर अनेकांची सवय बनली आहे. या सवयीचा परिणाम तुमच्या झोपेवर झालेला दिसतो. चांगली झोप यावी, असं वाटतं असेल, तर झोपण्याअगोदर किमान एक तास मोबाईल स्वतःपासून दूर ठेवा. रात्री झोपताना खोलीतील लाईट बंद करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल.

दररोज व्यायाम करणारी लोक ही निरोगी आयुष्य जगतात. नियुमित व्यायाम करणाऱ्या लोकांना झोपेची समस्या नसते. झोपेची कोणतीही समस्या असू नये असं वाटत असेल तर तुम्हाला रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्याने चांगली झोप लागू शकते. हे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. झोप येत नसेल, तर डॉक्टरही व्यायाम करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल, तर तुम्ही रोज अर्धा तास व्यायाम करा. ज्यामुळे तुमची झोपेची समस्या लवकर दूर होईल.

चांगल्या झोपेसाठी चांगला आहार घेणे फार महत्वाचे असते. आपण झोप न येण्याचे शिकार असाल, तर खाण्यामध्ये ही बदल करावे लागतील. बाहेरचे मसालेदार आणि जड पदार्थ आहारातून वगळावे लागतील. रात्रीचे जेवण करताना मैद्याचे पदार्थ खाणे टाळा. रात्रीचे जेवण आठ वाजण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. जेवणात हलक्या फुलक्या पदार्थांचा समावेश करा. जसे, ज्वारीची भाकरी, पालेभाज्या. याशिवाय कॅफिनयुक्त पदार्थ घेऊ नका. या गोष्टी केल्या तर तुमची झोपेची समस्या दूर होईल.

हे देखील वाचा Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

Breast Shape Tips: सैल झालेले ब्रेस्ट या घरगुती उपायांनी बनवा सुडोल आणि आकर्षक..

Healthy Physical Life: सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

Viral video: शिकारी झाला स्वतःच शिकार, बेडूक आणि सापाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल..

​BOI Recruitment 2023: बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..

BOB Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल इतक्या जागांसाठी होणार भरती, लगेच करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.