msrtc recruitment 2023: 8वी 10वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..
msrtc recruitment 2023: बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात असली तरी काही विभागांमध्ये नोकर भरती देखील केली जात आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागात मोठी भरती केली जाणार असून, या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही. मात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे. (MSRTC Nashik Bharti 2023)
राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत नाशिक विभागामध्ये विविध पदांसाठी 122 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत केल्या जाणाऱ्या नाशिक या विभागात एकूण 122 जागा कोणकोणत्या पदासाठी भरण्यात येणार आहेत? त्याचबरोबर उमेदवारांची पात्रता काय निश्चित करण्यात आली आहे? जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी एकूण १२२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये 76 जागा ‘मेकॅनिक’ या पदासाठी भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची पात्रता दहावी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. ‘शीट मेटल वर्कर’ या पदासाठी 14 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आठवी पास ठेवण्यात आली आहे. ‘मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स’ या पदासाठी 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
‘वेल्डर’ या पदासाठी ५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आठवी पास ठेवण्यात आली आहे. सोबतच संबंधित विभागातील आयटीआय उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे. पेंटर या पदासाठी दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची पात्रता आठवी पास ठेवण्यात आली आहे. मेकॅनिक डिझेल या पदासाठी ११ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी एकूण 5 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पगार आणि ऑनलाईन अर्ज
मेकॅनिक या पदासाठी 10,000 ते 10,121 रुयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. शीट मेटल वर्कर या पदासाठी 10,000 ते 10,121 रुपये पगार दिला जाणार आहे. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी 10,000 ते 10,121 रुपये पगार दिला जाणार आहे. वेल्डर या पदासाठी 10,000 ते 10,121 रुपये पगार दिला जाणार आहे. पेंटर या पदासाठी 10,000 ते 10,121 रुपये पगार दिला जाणार आहे. मेकॅनिक डिझेल यपदासाठी 10,000 ते 10,121 पगार दिला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी 10,000 ते 10,121 पगार दिला जाणार आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत नाशिक विभागामध्ये होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन msrtc.maharashtra.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही नोंदणी करू शकता.
हे देखील वाचा Rahul Dravid: ..म्हणून कोहली रोहीतला टी-ट्वेंटी टीममधून वगळले; राहूल द्रविडच्या विधानाने खळबळ..
Ration Card: ब्रेकिंग! राज्य सरकारने जारी केला आदेश; गहू-तांदळाबरोबर या वस्तू मिळणार मोफत..
LIC: एलआयसी मध्ये या उमेदवारांसाठी 9400 जागांची मेगाभरती; जाणून घ्या सविस्तर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम