ICF Recruitment 2023: दहावी बारावी उमेदवारांसाठी या विभागात मोठी भरती; परीक्षा विना अशी केली जाणार निवड..

0

ICF Recruitment 2023: महागाई आणि बेरोजगारीच्या (inflation and unemployment) दुनियेत नोकरी मिळवणं खूप अवघड आहे उच्च शिक्षण घेऊन देखील संबंधित विभागामध्ये पुरेशा संधी उपलब्ध होत नसल्याने आता अनेकांना बेरोजगार राहावं लागत असल्याचे चित्र आहे. साहजिकच यामुळे आता अनेक जण उच्च शिक्षण घेण्याऐवजी दहावी बारावीनंतर कुठेतरी चार पैशाची नोकरी (nokari) शोधताना दिसून येतात. जर तुम्ही देखील दहावी बारावीनंतर नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कोच फॅक्टरीमध्ये नोकरी करण्याची खूप मोठी संधी उपलब्ध झाली असून, या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘रेल कोच फॅक्टरी चेन्नई’ या ठिकाणी ही भरती होणार असून, उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उमेदवारांची निवड ही कोणत्याही परीक्षेशिवाय मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखती बरोबर क्रीडा चाचणी देखील उमेदवारांना उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

रेल कोच फॅक्टरीत दहावी आणि बारावी या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी pb.icf.gov.in याअधिकृत वेबसाइटवर जायचं आहे. या वेबसाईटवर उमेदवारांना भरती प्रक्रिया संदर्भातला फॉर्म डाउनलोड करायचा आहे. संबंधित फॉर्म व्यवस्थित भरून ऑफलाइन पद्धतीने जमा करायचा आहे. या भरती संदर्भात उमेदवाराची शैक्षणिक पात्रता/वयोमर्यादा/ निवड प्रक्रिया/ आणि अर्ज कोणत्या पत्त्यावर जमा करायचा? जाणून घेऊया सविस्तर.

पद आणि शैक्षणिक पात्रता

रेल कोच फॅक्टरी या विभागात दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ ग्रेड 3 या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र ‘वरिष्ठ लिपिक’ या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी संपादन केलेला असावा. तंत्रज्ञ ग्रेड 3 या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवारांचा संबंधित विषयात आयटीआय पूर्ण असणे देखील गरजेचे आहे.

परीक्षा फी/ वयोमर्यादा/ निवड

रेल कोच फॅक्टरीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही परीक्षा फी देखील आकारण्यात येणार आहे. ओपन कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये, तर एससी आणि एसटी त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी मात्र 250 रुपये परीक्षा फी आकारण्यात येणार आहे. पोरांच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, एक जुलै 2023 पर्यंत उमेदवारांचे वय १८ ते २५ यादरम्यान पूर्ण असणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार या वयामध्ये सवलत दिली जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

रेल कोच फॅक्टरीमध्ये जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल, तर तुम्हाला या विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संबंधित अर्ज डाऊनलोड करायचा आहे. pb.icf.gov.in या वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला व्यवस्थित अर्ज भरून सहाय्यक कार्मिक भरती, इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई 600 038 या ठिकाणी अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. pb.icf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाणून तुम्ही जाहिरात पाहू शकता.

हे देखील वाचा BPL Ration Card: आता बीपीएल रेशन कार्डसाठी तुम्हालाही करता येणार अर्ज; जाणून घ्या फायदे आणि असा करा अर्ज..

Ration Card: ब्रेकिंग! राज्य सरकारने जारी केला आदेश; गहू-तांदळाबरोबर या वस्तू मिळणार मोफत..

MPSC: MPSC च्या 8 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

LIC: एलआयसी मध्ये या उमेदवारांसाठी 9400 जागांची मेगाभरती; जाणून घ्या सविस्तर..

KL Rahul-Athiya Shetty: केएल राहुलचा हनिमून संदर्भात धक्कादायक निर्णय; रिसेप्शन पार्टीबद्दलही मोठा खुलासा..

Cricket Love Story: कार्तिक मुरली विजय घटनेची पुनरावृत्ती; या खेळाडूने मित्राच्या पत्नी सोबतच लग्न केल्याने खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.