Chanakya Niti: चाणक्यांच्या या मार्गाचा अवलंब केल्यास झटक्यात मिळेल यश..
Chanakya Niti: आचार्य चाणाक्य (Aacharya Chanakya) प्रचंड बुद्धीमान होते. त्यांना विविध विषयांचे ज्ञान होते. या ज्ञानाचा उपयोग सर्वांना घेता यावा असे त्यांना कायम वाटत असयाचे. त्यामुळेच त्यांनी विविध विषयांवर पुष्कळ लिखाण करुन ठेवलेले आहे. आचार्य चाणाक्य यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आज सुद्धा अभ्यास केला जातो. या ग्रंथांमध्ये मानवी जिवन समृद्ध करण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. त्यामुळे या ग्रंथांमधील संदर्भाचा वापर करुन आजच्या काळात सुद्धा काही ध्येय धोरणे ठरवले जातात. आचार्य चाणक्य यांची चाणाक्य निती अनेकांसाठी मार्गदर्शकाच्या स्वरुपात काम करते आहे. (Aacharya Chanakya quotes on make a successful life)
आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे आहे. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. बर्याचदा मेहनत करुन सुद्धा यश आपल्याला हुलकावणी देऊन निघून जाते. आणि मग अनेकजण अनेक जण नैराश्यात देखील जातात. मात्र आचार्य चाणाक्य यांच्या चाणाक्य नितीमध्ये काही मार्गदर्शक तत्वे तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात.
जिवनात यशस्वी होण्याबाबत आचार्य चाणाक्य यांनी फार मोलाचे मार्गदर्शन करुन ठेवले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवक आपल्या कठीण काळात चाणाक्य नितीमध्ये सांगण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करतात. चाणाक्य नीतीनुसार मार्गक्रमण करुन अनेकांनी यशाला आपल्या पायाशी लोळण घ्यायला भाग पाडले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा निराश होऊन न जाता, यशस्वी होण्यासाठी चाणक्य यांनी सांगितलेल्या या मार्गांचा अवलंब करु शकता. आचार्य चाणाक्य यांनी नेमके कोणते गुण सांगितलेले आहेत? ज्यामुळे तुम्ही कमी वेळेत यश मिळवू शकाल? जाऊन घेऊया सविस्तर.
यशस्वी होण्यासाठी मेहनत करु इच्छिणार्यांसाठी आचार्य चाणक्यांनी राजहंस पक्षाचे उदाहरण दिले आहे. चाणाक्य त्यांच्या एका श्लोकामध्ये म्हणतात की, राजहंस पक्षाचा एक गुण तुम्हाला यश मिळवून देण्यास पुरेसा आहे. त्यामुळे तुम्ही हा एक गुण जरी स्वत:मध्ये विकसीत केला तर कुठलीही समस्या तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकाल. त्यामुळे तुमच्या यशस्वी होण्याच्या वाटेत कुठलीही अडचण येणार नाही. परिणामी अल्पावधीतच तुम्ही निश्वित केलेले तुमचे ध्येय गाठू शकाल.
राजहसं पक्षी दूध पिताना केवळ दूध पितो. आणि त्या दुधामधील पाणी बाजूला काढतो. चाणाक्य यांनी राजहंस पक्षाच्या या गुणाचेच कौतुक केले आहे. तसेच माणसाला यशस्वी होण्यासाठी व त्याच्या जिवनातील समस्या सोडवण्यासाठी सुद्धा याच गुणाचे उदाहरण आचार्य चाणाक्य यांनी दिले आहे.
आचार्य चाणाक्य यांच्या म्हणण्यानुसार सृष्टी फार विशाल आहे. संपूर्ण विश्व हे ज्ञानाने भरलेले आहे. हे संपूर्ण ज्ञान आत्मसात करण्यासाठी मानवी जिवन अपुरे आहे. आपल्या रोजच्या जिवनातील जवाबदारी आणि कर्तव्य पार पाडत असताना हे सर्व ज्ञान मिळवणे अशक्य आहे. अशावेळी या विशाल ज्ञानामध्ये सर्वच उपयोगी आहे असे नाही. काही उपयोगी तर काही निरुपयोगी आहे. त्यामुळे जे आपल्या उपयोगाचे आहे त्याचेच चिंतन आपण करावे. राजहंस पक्ष्याप्रमाणे जे ज्ञान आपल्या कामाचे आहे त्याकडेच लक्ष देऊन ते कसे मिळवता येईल, याचा विचार करावा. जे आपल्या उपयोगाचे नाही ते बाजूला सारुन सोडून द्यावे, असा उपदेश आचार्य चाणाक्य यांनी केला आहे.
आचार्य चाणाक्य म्हणतात, विविध विषयातील अर्धवट ज्ञान निरुपयोगी आहे. त्यामुळे एखाद्या विषयातील संपूर्ण ज्ञान असणारा व्यक्ती कधीही श्रेष्ठ ठरतो. अशा व्यक्ती जिवनातील कुठल्याही समस्येवर मात करु शकतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अडसर सुद्धा निर्माण होत नाही. याचप्रमाणे यशस्वी होण्यासाठी धीर आणि क्रोधावर नियंत्रण मिळवण्याबाबत सुद्धा आचार्य चाणाक्य यांनी भाष्य केले आहे.
हे देखील वाचा Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..
Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..
Malaika Arora: मलायका माझ्या आयुष्यात आल्यामुळे आता मला रोज रात्री..,’; अर्जन कपूरचे खळबळजनक विधान..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम