Goutam Adani Vs Elon Musk: अवघ्या एका महिन्यात अदानी एलोन मस्कचा उठवणार बाजार, मस्कला ट्विटर भोवले

0

Goutam Adani Vs Elon Musk: गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. मोदी सरकारने घेतलेल्या खासगीकरणाच्या निर्णयाचा त्यांनी पुरपुर फायदा घेतल्याचे पाहायला मिळते. बऱ्याच सरकारच्या ताब्यातील संस्था, विमानतळे, रेल्वे स्टेशन त्यांच्या अदानी उद्योग समूहाच्या ताब्यात आहेत. एवढंच काय तर अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांनी संप देखील पुकारला आहे. अर्थातच अदानी समूह आता वीज वितरण कंपनीमध्ये देखील पाय पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अदानी (Gautam Adani) अजून सरकारच्या ताब्यातील संस्था ताब्यात घेऊन कुठे कुठे पाय पसरणार आहेत, हे तरी सांगणे शक्य नाही. (Goutam Adani Vs Elon Musk)

 

देशात गौतम अदानीने (Gautam Adani) रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहेच. परंतु सध्या ते १२१ अब्ज डॉलर्स संपत्ती असलेले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु लवकरच अदानी एलॉन मस्क ( Goutam Adani Vs Elon Musk) याच्या संपत्तीच्या बाबतीत पुढे जाण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. टेस्ला आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्कची (Elon Musk Property) संपत्तीत नोव्हेंबर 2022 मध्ये 340 अब्ज डॉलर्सवरून 137 अब्ज डॉलर्सवर आली आहे. गौतम अदाणी यांच्या अदानी समूहाच्या संपत्तीमध्ये (Gautam Adani Property) गेल्या एका वर्षामध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

 

एकीकडे पाठीमागील एका वर्षात अदानी यांची संपत्ती 44 अब्ज डॉलर्सने वाढलेली पाहायला मिळते. तर दुसरीकडे एलॉन मस्क (Gautam Adani Vs Elon Musk) याच्या संपत्तीमध्ये 133 अब्ज डॉलर्सने घट झाली. अर्थात मस्क याची संपत्ती झपाट्याने कमी झाली आणि दुसरीकडे अदानी यांनी गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत चांगलीच वाढ केली आहे. तज्ञांच्या मते हे प्रमाण जर असेच टिकून राहिले तर अदानी अवघ्या महिनाभरात Elon Musk च्या पुढे पाहायला मिळतील आणि जगातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरतील आणि टेस्लाचे मालक Elon Musk हे श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर जातील. सध्या एलोन मस्के जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

२०२२ मध्ये शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. त्यात गौतम अदाणी यांच्या अदानी समूहाचे शेअर देखील खूप तेजीत पाहायला मिळाले. अदानी समूहाच्या विविध शेअरची किंमत किमान दुपटीने वाढली. हेच अदानी यांची संपत्ती वाढण्याचं मुख्य कारण आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर गौतम अदानीला पोचवण्यासाठी अदानी एंटरप्रायझेस या त्यांच्या कंपनीच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. अदाणी पॉवरचे शेअर (Adani Power Share) 185 टक्के, अदाणी विल्मरचे (Adani Wilmar share) शेअर 105 टक्के, अदाणी टोटल गॅस (Adani Total Gas) 91 टक्के एवढे तेजीत होते.

 

याच शेअर्सच्या जोरावर अदानी समूहाचे भाग भांडवल तीन वर्षात तब्बल नऊ पटीने वाढलेले पाहायला मिळाले. ही आकडेवारी 23 डिसेंबरला 17.9 लाख कोटींच्या पुढे गेलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अदानी (Gautam Adani) संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पुढे गेले. अदाणी ग्रुप आणि त्यांच्या इतर कंपन्यांमधये झपाट्याने वाढ झाल्याने गौतम अदाणी हे जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहचले. एवढंच काय तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना देखील त्यांनी मागे टाकले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची एकूण संपत्ती 94 अब्ज डाॅलर (7.55 ट्रिलियन रुपये) आहे. ते जगातील 8 व्या क्रमांकाचे आणि भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत 2021 मध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यांची संपत्ती 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली होती. याचे कारण म्हणजे कोरोना महामारीत टेस्लाचे शेअर्स (Tesla Shares) मध्ये तेजी पाहायला मिळत होती. त्यानंतर टेस्लाचे शेअर्स बराच काळ तेजीत होते. परंतु सध्या टेस्लाशी स्पर्धा करणाऱ्या इतर कंपन्या देखील आहेत. टेस्लाच्या इलेक्ट्रॉनिक कारच्या (Tesla Electric Car) समोरील प्रवासी एअरबॅगमध्ये त्रुटी असल्यामुळे कंपनीने त्यांच्या 30 हजार गाड्या परत मागवल्या आहेत. तेव्हापासून टेस्लाच्या शेअरमध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे. मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेण्यासाठी टेस्लाच्या शेअरची विक्री केली होती. त्याचा परिणाम त्यांच्या संपत्तीवर झाला.

हेही वाचा: Cristiano Ronaldo Salary Breakup: रोनाल्डो कमावणार तासाला 21 लाख रुपये, एवढंच नव्हे तर..

Dhananjay Munde Car Accident: धनंजय मुंडे यांच्या गाडीला भीषण अपघात, मीडियाने काय पसरवली अफवा?

urfi javed: उर्फी जावेदने शोधून काढले संजय आणि चित्रा वाघ कनेक्शन; जाणून घ्या उर्फि जावेद चित्रा वाघ वाद..

Chanakya Niti: या गोष्टीत पत्नीचे समाधान नाही झाले तर पैशाची चणचण सतत भासते..

Acharya Chanakya: पत्नीमध्ये हे चार गुण असतील तर यश तुमच्या पायाशी घालते लोटांगण..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.