Women rights: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! महिलांना गर्भपात करण्याचा दिला पूर्ण अधिकार..
Women rights: सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) गर्भवती (pregnant) महिलांसंदर्भात (women) एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मेडिकल टर्मिनेश ऑफ प्रेग्नेंसी (MTP) कायद्याअंतर्गत विवाहित असो की अविवाहित सर्व प्रकारच्या महिलांना कायदेशीर त्याचबरोबर सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता महिलांवर होणारा अन्याय कमी होणार असल्याचं बोललं जात आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने विवाहित आणि अविवाहित असा भेदभाव करता येणार नसून, गर्भवती महिलांच्या अधिकाराचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत नोंदवले.
काय म्हणाले न्यायालय
गर्भपाताशी निगडित असणाऱ्या या प्रकरणावर आपले मत नोंदवताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. अनेक मुद्दे स्पष्ट करताना एमटीपी कायद्याअंतर्गत सर्व महिलांना सुरक्षित त्याचबरोबर कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार दिला आहे. यामध्ये विवाहित आणि अविवाहित असा भेदभाव करता येणार नसल्याचे म्हणत हा मुद्दा न्यायालयाने फेटाळून लावला. तिची स्थिती आणि गर्भधारणा याचा संबंध असला, तरी केवळ हे कारण गर्भ पाडण्याचा अधिकार कदापिही हिरावून घेऊ शकता नाही. या कायद्यांतर्गत 24 आठवड्यांच्या आतमधील गर्भपात महिलांना पाडण्याचा अधिकार विवाहित महीलांप्रमाने अविवाहित महिलांनाही असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने याबाबत म्हंटले आहे.
पूर्वी काय होता नियम
यापूर्वी 24 आठवड्यांच्या आत मधील गर्भपात करण्याचा अधिकार महिलांना देण्यात आला होता. मात्र हा अधिकार फक्त विवाहित महिलांनाच होता. अविवाहित महिलांना या संदर्भात गर्भपात करण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने विवाहित आणि अविवाहित असा भेदभाव करता येणार नसल्याचा निर्वाळा दिला. विवाहित महिलेप्रमाणे अविवाहित महिलांना देखील 24 आठवड्याच्या आतमधील गर्भपात करण्याचा अधिकार असू शकतो का? या संदर्भात हा निकाल देण्यात आला.न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला त्याचबरोबर न्यायमूर्ती डी. वाई चंद्रचूड, तसेच न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना या तीन सयुक्त खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला.
विवाहित बायकांवर देखील नवरा बलात्कार करू शकतो; सर्वोच्च न्यायालय
फक्त विवाहित महिलांनाच हा कायदा लागू होऊ शकतो आणि अविवाहित महिलांना नाही, हा भेदभाव करणारा कायदा आहे. तिच्या परवानगी शिवाय ठेवलेल्या लैंगिक संबंधामधून देखील ती गरोदर राहू शकते. केवळ लग्नामुळेच तिला गर्भपात करण्याचा अधिकार मिळतो, ही धारणा खूप चुकीची आहे. एखादी महिला विवाहित नसेल, आणि ती गर्भवती असेल, तर तिचा गर्भपात करण्याचा अधिकार संपणार नाही. बायकोवर देखील त्यांचा नवरा ब ला त्का र करू शकतो. त्यामुळे अविवाहित महिला गरोदर राहू शकत नाही, असं म्हणता येत नाही.
हे देखील वाचा Viral Video: पतीला पत्नीने रंगेहात पकडलं दुसऱ्या महिलेसोबत; तसल्या अवस्थेतला व्हिडिओही केला व्हायरल..
SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम