RBI BRBNMPL Recruitment 2022: या उमेदवारांना रिझर्व बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अशी केली जाणार निवड..
RBI BRBNMPL Recruitment 2022: महागाई बरोबरच बेरोजगारीचा दर देखील दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबर मोडलं असताना दुसरीकडे बेरोजगारी देखील सतावत आहे. अशा दुहेरी संकटामुळे सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात नोकरीविना घरी बसणे आता फारच अवघड झाले आहे. त्यामुळे प्रत्येकजण आज नोकरीच्या शोधात आहे. जर सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आरबीआयने काही जागा भरण्याची अधिसुचना जाहीर केली आहे.
सरकारी नोकरीचे स्वप्न अनेक युवक बघतात. मात्र वाढत्या स्पर्धेने त्यांना या स्वप्नाला गवसनी घालणे बर्याचदा फार कठीण होऊन जाते. मात्र आता परिक्षेविना थेट सरकारी नोकरी घेण्याची संधी आरबीआयने तुम्हाला ऊपलब्ध करुन दिलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंक नोट मुद्रण प्रायवेट लिमीटेडच्या वतीने २०२२ च्या भरतीची अधिसुचना जाहीर करण्यात आलेली आहे. सहाय्यक व्यवस्थापक आणि उपसहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठीची ही भरती आहे. रीझर्व्ह बॅंकेच्या या भरतीचीच संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला याठिकाणी देणार आहोत. तर चला जाणुन घेऊया सविस्तर.
आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर या भरतीची अधिसुचना जाहीर करण्यात आलेली आहे. RBI BRBNMPLच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार एकुण १७ जागांसाठीची भरती आहे. ८ ऑक्टोंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. आता आपण कोणत्या पदांकरीता ही भरती आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रिया संदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी देखील विस्तृतपणे जाणुन घेऊया. प्रथम आपण कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे पाहू.
या पदांसाठी केली जाणार भरती
सहाय्यक व्यवस्थापक सुरक्षा यासाठी ४ जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. वित्त आणि लेखा विभागातील सहाय्यक व्यवस्थापकासाठी ६ जागांचे प्रावधान आहे. स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक व्यवस्थापकाच्या ५ जागा आहेत. तसेच पर्यावरण विभागामध्ये सहाय्यक व्यवस्थापक १ आणि उपसहाय्यक व्यवस्थापक १ अशा जागा या स्वरूपात भरती केली जाणार आहे. अधिसुचना पाहून तुम्ही याविषयी सविस्तर जाणून घेऊ शकता.
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवाराने या शैक्षणिक पात्रतेची पूर्णता करणे आवश्यक आहे. सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक या पदासाठी उमेदवाराने संबंधित क्षेत्रात ईंजिनीयरींगचे शिक्षण घेतलेले असावे. किंवा पदवीपर्यंतचे तरी शिक्षण आवश्यक आहे. तसेच उमेदवारास कामाचा किमान २ वर्ष अनुभव असावा. वित्त आणि लेखा विभागाच्या सहाय्यक व्यवस्थापकासाठी उमेदवाराने संबंधीत क्षेत्रात ईंजिनीयरींगचे शिक्षण घेतलेले असावे.
स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी ऊमेदवाराने स्थापत्यशास्त्र या विषयात ईंजिनीयरींग केलेले असावे. किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे. पर्यावरण अभियांत्रिकी विभागात सहाय्यक व्यवस्थापक आणि उपसहाय्यक व्यवस्थापक अशी दोन पदे आहेत. यासाठी ईंजिनीयरींगचे शिक्षण घेतलेले असणे जरुरी आहे. किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. तसेच कामाचा अनुभव असणार्यांना प्राधान्य देण्यात येईल.
पदानुसार पगार
आरबीआयने जाहीर केलेल्या या भरतीमध्ये पदानुसार पगाराचे प्रावधान करण्यात आलेले आहे. त्यामुळे सहाय्यक व्यवस्थापक सुरक्षा विभागासाठी ६९ हजार रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक व्यवस्थापकासाठी प्रति महिना ५६ हजार १०० रुपये वेतन असणार आहे. वित्त आणि लेखा तसेच पर्यावरण विभागातील सहाय्यक व्यवस्थापकासाठी सुद्धा ५६ हजार १०० रुपये प्रति महिना वेतनाचे प्रावधान करण्यात आलेले आहे. पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील उपव्यवस्थापक या पदाकरिता देखील ५६ हजार १०० रुपये मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
सर्वप्रथम ऊमेदवाराचा बायोडेटा देणे आवश्यक आहे. त्यासोबतच १० वी, १२ वी आणि पदवीची मार्कशीट किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र आवश्यक आहे. मागासवर्गीय ऊमेदवारांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला तसेच ओळखपत्र व पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत देणे आवश्यक आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
या भरतीसाठी पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.brbnmpl.co.in/ असं सर्च करणे आवश्यक आहे. हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर या भरती प्रक्रिया संदर्भातील अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर, खाली स्क्रोल करायचं आहे स्कूल केल्यानंतर तुम्हाला या भरती प्रक्रिया संदर्भात अर्ज करण्याचा तपशील पाहायला मिळाले. त्यानंतर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता.
हे देखील वाचा eyes colour describe nature: डोळ्यांच्या रंग सांगतो माणसाचा स्वभाव; या रंगाचे डोळे असतात प्रचंड धोकादायक..
Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम