Lampi Virus: लम्पी रोगाचा महाराष्ट्रातही कहर; आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी आत्ताच करा हे काम अन्यथा..
Lampi Virus: अलिकडे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. नुकताच को रो ना चा कहर कमी झाला. कधी नव्हे एवढी मनुष्य हानी कोरोनाने केली. विविध साथीचे रोग सुद्धा माणसांसाठी धोक्याचे ठरतात. अनेकदा जिव जाण्याची सुद्धा शक्यता असते. प्लेग, पोलिओ, मलेरिया यांसारखे अनेक रोग आपण बघितले जे मानवासाठी वेळोवेळी फार धोकादायक ठरलेले आहेत. परंतू अशा साथीच्या रोगांचा सामना केवळ मानवालाच नाही तर मुक्या जनांवरांना सुद्धा करावा लागतो. ज्यामुळे मोठ्याप्रमाणात जनावरांना आपला जिव गमावण्याची वेळही येते.ऊदाहरण द्यायचे झाल्यास “बर्ड फ्लु” चे ऊदाहरण आपण घेऊ शकतो. (Lampi Virus Maharashtra)
सध्या असाच जनावरांचा साथीचा रोग महाराष्ट्रात कहर करतो आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडल्यास जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. लम्पी (Lampi Virus) असे या रोगाचे नाव असून, ग्रामीण भागात याचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. यामध्ये जनावरांच्या त्वचेवर मोठ्याप्रमाणात फोडं येतात. आतापर्यंत महाराष्ट्रात लम्पीने जनावरे दगावल्याची बातमी नाही. परंतू हा रोग जिवघेणा नसल्याचे सुद्धा अद्याप अधिकृत नाही. लम्पीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पशुपालक चिंतेत आहेत.
राज्यातील पशुसंवर्धन विभाग मात्र आता एक्टीव्ह मोडमध्ये आलाय. संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने रोग पसरत असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने पाऊले ऊचलण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही सुद्धा पशुपालन करत असाल, किंवा तुमच्या घरी जनावरे असतील तर तुम्ही सुद्धा विशेष काळजी घेणे जरुरी आहे. जनावरांचे या रोगापासून संरक्षण करण्यासाठी काय ऊपाय योजले गेले पाहिजेत, कुठल्या प्राथमिक ऊपायांनी तुम्ही तुमच्या जनावरांना या आजारापासून लांब ठेऊ शकाल, याबाबतच आपण सविस्तर जाणून घेऊया.
लम्पी होण्याची कारणे
वेगाने पसरणार्या या रोगापासून आपल्या जनावराचे रक्षण करण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल व त्यावर काही प्राथमिक ऊपाय करावे लागतील. मात्र ऊपाय करण्याअगोदर लम्पी रोग होतो कशामुळे? हे जाणुन घेणे महत्वाचे आहे. रोग होण्याची कारणे आपल्याला माहिती असल्यास आपण आजार होण्याअगोदरच योग्य ती काळजी घेऊ शकतो. लम्पी हा त्वचारोग आहे. लम्पी होण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता असल्याचे काही पशुवैद्यकीय सांगतात. जनावरं ज्या गोठ्यात राहतात, तिथे अस्वच्छता असल्यामुळे या रोगाची लागन सहजरीत्या होते. गोठ्यामध्ये माशा, गोमाशा, गोचीड मोठ्याप्रमाणात असतात. यांच्याद्वारे लम्पी रोगाचा प्रादुर्भाव जनावरांवर होतो आहे.
लम्पीची लक्षणे
लम्पीमध्ये अद्याप कुठला जनावर दगावल्याची बातमी नाही. परंतू या आजाराने जनावरे दगावणार नाहीत याची सुद्धा शाश्वती नाही. त्यामुळे या आजारापासून जनावरांना कसे दुर ठेवता येईल, याची काळजी घेणे जरुरीचे आहे. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास अचानक जनावराला ताप यायला लागतो. जनावराच्या डोके, मान, पाय, छाती यांच्यासह जवळपास संपूर्ण शरीरावरच ५ सेंटीमीटरचा व्यास असणार्या गाठी येतात. यादरम्यान जनावराच्या भुकेवर याचा परिणाम होतो. जनावराच्या शरीरातील पाणी कमी होते. खाण्याचे प्रमाण कमी झाल्याने शरीरातली शक्ती कमी होते. याचा थेट परिणाम दुध ऊत्पादनावर होतो.
लम्पीवर ऊपाय योजना
महाराष्ट्रात लम्पीचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता, पशुसंवर्शन विभाग तयारीला लागला आहे. वेळोवेळी काही मार्गदर्शक सुचना पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या जात आहेत. विविध स्तरावर विभागाचे कर्मचारी पाहणी करत आहेत. राज्य सरकारने सुद्धा लम्पी अजाराबाबत विचारमंथन सुरु केले आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरातुन प्रयत्न केले जात आहेत. परंतू काही प्राथमिक ऊपाययोजना करणे गरजेचे आहे. घरगुती ऊपायाच्या सहाय्याने सुद्धा आपण या आजारास आपल्या जनावरांपासून लांब ठेऊ शकतो.
सर्वप्रथम जनावरांना ज्या ठिकाणी ठेवण्यात येते, तो जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा. अनेकदा तेथेच जनावरांचे मलमुत्र जमा होत असल्याने त्याठिकाणी अस्वच्छता वाढते. परिणामी गोचीड, गोमाश्या आणि माशा तेथे पुष्कळ होतात. त्यामुळे गोचीड, गोमाशा आणि माशांपासून जनावरांना दुर ठेवण्यासाठी शक्य ते सगळे ऊपाय करावे. २० टक्के ईथर व क्लोरोफॉर्म, १ टक्के फॉर्मलीन, २ टक्के फिनॉल, आयोडिन, जंतनाशके इत्यादी पाण्यात मिसळुन त्याची गोठ्यात फवारणी करावी.
जवळच्या पशुसंवर्धन विभागात लम्पी या आजारावरील लस मोफत ऊपलब्ध आहे. आपल्या जनावरांना लगेच ही लस टोचुन घ्यावी. लम्पीचा प्रादुर्भाव एखाद्या भागात झाल्यास त्या भागातील ५ किमीपर्यंत लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. अशा सुचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे त्वरीत आपल्या जनावरांना लम्पीची प्रतिबंधात्मक लस टोचुन घ्या आणि सुरक्षित राहा.
हे देखील वाचा Pitru Paksha 2022: कावळ्या व्यतिरिक्त पितृपंधरवड्यात आपले पूर्वज या तीन रूपात देतात आशीर्वाद; त्यांना उपाशी पाठवणं असतं अशुभ..
PMMVY: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मिळतात पाच हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ..
Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..
Job: नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे; जाणुन घ्या कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.