Marriage Tips: या पाच गोष्टींचे पालन करा, अन्यथा वैवाहिक जीवनाचा होईल सत्यानाश..
Marriage Tips: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. लग्न करत असताना अनेक जण आपला वैवाहिक जोडीदार हा सर्वगुण संपन्न असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. वैवाहिक जीवन हे आनंदी आणि सुख समृद्धीचं जावं यासाठी अनेकजण या विषयाच्या तज्ञांचा सल्ला देखील घेतात. वैवाहिक जीवन आनंदाचे आणि समाधानाचं असलं तरच यशस्वी जीवनाकडे वाटचाल करता येते. याविषयी अधिक सांगण्याची गरज नाही. अलीकडच्या काळात तर छोट्या-छोट्या गोष्टीवरून नवविवाहित जोडप्यांचा वाद होतो .आणि प्रकरण घटस्फोटांपर्यंत देखील पोहचते.
जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल, किंवा तुमचं नुकतंच लग्न झालं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वैवाहिक जीवन यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मात्र अनेकांना या गोष्टी माहिती नसल्याने, समस्या निर्माण होतात. वैवाहिक जीवनात आनंद त्याचबरोबर समाधान आणि कायम प्रेमाचा मोहर खुलून ठेवण्याची तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
खूप साऱ्या अपेक्षा
लग्नापूर्वी आपण आपला जोडीदार कसा असावा? याची कल्पना केलेली असते. मात्र लग्नानंतर आपल्या लक्षात येतं, आपला जोडीदार आपण कल्पना केली होती याच्या उलट आहे. अशा वेळी तुम्ही स्वतःला समजून सांगणं फार गरजेचं असतं. कोणीही सर्वगुण संपन्न नसतो. आपण अनेक कल्पना केल्यामुळे, आपल्या वैवाहिक जोडीदाराविषयी आपण अनेक साऱ्या अपेक्षा बाळगून असतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरवर अपेक्षांचं ओझं टाकता. आणि मग तुमच्या नात्यात आनंद शोधण्याऐवजी तुम्ही दुखी होता. आपल्या वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षा असणं काही गैर नाही. मात्र अपेक्षाला देखील काही मर्यादा आहेत. प्रत्येकाला मनासारखा जोडीदार मिळेलच असं नाही. साहजिकच यामुळे जोडीदाराला समजून घेऊन वेळ देणं आणि त्या दृष्टिकोनातून तयार करणं देखील तुमची जबाबदारी असते. तुमच्या जोडीदाराला आपला पार्टनर आपल्या सोबत आहे याची जाणीव होणं फार आवश्यक असतं. विनाकारण तुम्ही अनेक अपेक्षा टाकल्याने त्याच्यामुळे अधिक दर्पण येऊ शकतं. आणि मग नात्यात दुरावा निर्माण होण्याची देखील शक्यता असते.
वैयक्तिक आयुष्य
लग्न झाल्यानंतर, अनेकदा आपण पाहतो पार्टनर अधिक हक्क जमवताना पाहायला मिळतो. मात्र आपल्या जोडीदाराला देखील एक वैयक्तिक आयुष्य आहे. आणि आपण त्याचा सन्मान करणे आवश्यक आहे. कोणत्याही नात्यात तुम्ही कधीही मालक होण्याचा प्रयत्न करणं उचित राहत नाही. नात्यात नेहमी साथीदार बनून राहणे, हेच यशस्वी नात्याचं गमक आहे. हे सर्वप्रथम आपण लक्षात घेण आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरला स्वातंत्र्य देत असाल, तर तुमच्या पार्टनरला देखील तुमच्याविषयीचा सन्मान, प्रेम वाढत जातो.
कमी लेखू नका कौतुक करा
वैवाहिक जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या पार्टनर्ससोबत सुख दुःखात असणं आवश्यक असतं. सोबतच तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या आवडी-निवडी याची देखील जोपासना करावी लागते. प्रत्येक जण सर्व गुण संपन्न असेलच, असं नाही साहजिकच यामुळे अनेकांकडून चुका होत राहतात. एखाद्या कामात तुमचा पार्टनर विपुल नसेल, तर तुम्ही त्या विषयावरून टीका करणे उचित राहत नाही. याउलट तुम्ही तुमच्या पार्टनरचे कौतुक करणं आवश्यक असतं.
गृहीत धरू नका
वैवाहिक जीवनात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर तुमच्या पार्टनरला तुम्ही गृहीत धरण कधीही योग्य राहणार नाही. तुमच्या पार्टनरच्या अपेक्षा, इच्छा काय आहेत? हे जाणून घेणं तुमची जबाबदारी आहे. अनेक विषयांवर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जितकी जास्त चर्चा कराल, तितकं तुमचं वैवाहिक आयुष्य समाधानाचं आणि आनंदाचा जाणार हे लक्षात घ्या. वैवाहिक जीवनात नेहमी एकमेकांचा सन्मान कसा करता येईल, याची काळजी घेऊन आयुष्य जगत गेल्यास, तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होणार नाहीत.
आरोप करण्यापेक्षा बातचीत करा
आयुष्य जगत असताना अनेकदा वाद-विवाद होत असतात. वाद-विवाद झाल्यानंतर, चूक कोणाची आहे? हे शोधण्याऐवजी तुम्ही ज्या विषयावरून वाद-विवाद झाले आहेत, त्या विषयावर चर्चा करणे योग्य ठरेल. एखाद्या गोष्टीविषयी काही गैरसमज असतील, तर तुम्ही त्या विषयावर पार्टनर सोबत चर्चा करणे योग्य आहे. अनेकदा काही विषयांना घेऊन पार्टनर विषयी गैरसमज असतात. या गैरसमजातून अविश्वास देखील निर्माण होतो. साहजिकच याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊन, प्रकरण घटस्फोटांपर्यंत देखील पोहचते. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत चर्चा करणे या सगळ्यांवर उत्तम उपाय आहे.
हे देखील वाचा SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत तब्बल इतक्या जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Internet data:अचानक डाटा संपला? चिंता करू नका, हा नंबर डायल करा मिळेल अनलिमिटेड डाटा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.