Infinix Hot 12: 50 MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन केवळ साडेनऊ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Infinix Hot 12: अलीकडच्या काळात स्मार्टफोनचं महत्त्व प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतं. स्मार्टफोन (smartphone) फक्त लाईफस्टाईलचाच भाग नाही, तर आता स्मार्टफोनमधून अनेकजण लाखो रुपये देखील कमावतात. बाजारात अनेक कंपनीचे जबरदस्त स्मार्टफोन विकले जात आहेत. कमी किंमतीत आता अनेक आकर्षक आणि भन्नाट फीचर्स असणारे स्मार्टफोन ग्राहकांना मिळत असल्याने, ग्राहक देखील आता स्मार्ट खरेदी करताना दिसतात. काही स्मार्टफोन कंपन्या अजूनही खूप महाग स्मार्टफोन परचेस करतात. मात्र ग्राहक देखील आता अशा स्मार्टफोनकडे न वळता कमी किंमतीत जास्त फीचर्स मिळणारा स्मार्टफोन खरेदी करताना दिसून येतात.
स्मार्टफोनच्या दुनियेत आता ग्राहक देखील अधिक स्मार्ट झाल्याचे पाहायला मिळतं. अनेक महागड्या वस्तू खरेदी न करता कमी किंमत आणि जबरदस्त फीचर्स असणाऱ्या फोनला ग्राहक खरेदी करताना दिसून येतात. साहजिकच त्यामुळे कंपनी देखील ही बाब लक्षात घेऊन, कमी किंमत आणि आकर्षक फोन त्याचबरोबर अनेक भन्नाट फीचर्स देण्याचा प्रयत्न करते. ग्राहक स्मार्टफोन खरेदी करताना नेहमी किंमत बरोबरच कॅमेरा आणि बॅटरी बॅकअपचा विचार करून स्मार्टफोन खरेदी करतात. कंपनी देखील या बाबी लक्षात ठेवून, आता स्मार्टफोनची निर्मिती करू लागल्या आहेत.
आता असाच एक स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला असून, या स्मार्टफोनने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. Infinix स्मार्टफोन कंपनीने आपला Infinix Hot 12 हा स्मार्टफोन मार्केटमध्ये उतरवला आहे. या फोनची किंमत फक्त नऊ हजार पाचशे आहे. नऊ हजार पाचशे रुपयांत मिळणारा फोन जबरदस्त आकर्षकरित्या बनवण्यात आला असून, याला जबरदस्त फीचर्स देखील प्रोव्हाइड करण्यात आले आहेत. Infinix Hot 12 या स्मार्टफोन विषयी जाणून घेऊया सविस्तर.
कॅमेरा आणि बॅटरी
भारतात गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Infinix हॉट 11 चे हे अपग्रेट मॉडेल आहे. हा फोन जबरदस्त लुकमध्ये असल्याने ग्राहक याकडे विशेष आकर्षित होत असल्याचे दिसतात. या फोनचा डिस्प्ले 6.8 इंचाचा दिला असून, या फोनचा बॅक कॅमेरा तब्बल पन्नास मेगापिक्सल देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनची बॅटरी देखील 6000mAh ची असणार आहे. याच्या फ्रंट कॅमेराचा विचार करायचा झाल्यास, ८ मेगापिक्सल फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी प्रोसेसर
या स्मार्टफोनची बॅटरी 6000mAh असून, Infinix Hot 12 MediaTek Helio G37 ऑक्टा-कोर प्रोसेसर असणार आहे. या स्मार्टफोनला 3GB/4 रॅम व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह 64GB स्टोरेज मिळणार आहे. T डिव्हाइस ऑनबोर्डसह मायक्रोएसडी स्लॉटद्वारे याचे स्टोरेज वाढवता येते. सोबतच 6,000mAh तर आहेच मात्र ही बॅटरी 18W चार्जिंगला देखील सपोर्ट करते. Infinix Hot 12 स्मार्टफोन Android 11 वर आधारित XOS 10 वर काम करतो.
किंमत आणि डिस्प्ले
या स्मार्टफोनची किंमत 9, 500 ठेवण्यात आली असून, या स्मार्टफोनमध्ये विविध कलर ग्राहकांना देण्यात येत आहेत. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट (Flipkart) वर 23 ऑगस्ट पासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. Infinix Hot 12 या smartphone चा डिस्प्ले HD+ रिझोल्यूशनसह ग्राहकांना मिळणार आहे. 6.82 इंचाचा हा डिस्प्ले असणार आहे. याचा रिफ्रेश रेट हा 90Hz त्याचबरोबर 460 nits असणार आहे. सोबतच फिंगर प्रिंट देखील देण्यात आले आहे.
हे देखील वाचा अतिक्रमण: जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची ही आहे योग्य प्रक्रिया..
Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..
Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..
Teeth Whitening: हे चार घरगुती उपाय केल्यास पिवळसर दात होतात पांढरे शुभ्र..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.