Sarsenapati Hambirrao: “युद्धात झालेल्या ‘जखमे’सारखा देखना दागिना नाही, फक्त हा दागिना छातीवर पाहिजे,” थरकाप उडवणारा ट्रेलर लाँच..
Sarsenapati Hambirrao: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट कधी रिलीज होणार याची उत्सुकता आता संपली असून, हा चित्रपट 27मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, या ट्रेलरमध्ये (trailer) मनाला भेदणारे अनेक डायलॉग आणि ग्राफिक्स्, व्हिज्युअल, इफेक्ट्सची मस्त झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अंगावर शहारे आणणारा हा टेलर अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुळशी पॅटर्न या चित्रपटाचे यशस्वीरित्या दिग्दर्शन केल्यानंतर, प्रवीण विठ्ठल तरडे (Pravin Tarde)यांनी मुख्य भूमिका साकारलेला सरसेनापती हंबीरराव यांच्या जीवनावर आधारित सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाल्यापासूनच, हा चित्रपट कमालीचा चर्चेत होता. या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाल्यानंतर, चित्रपटाचा टीचर देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचं पाहायला मिळालं. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने देखील या टीझरचं तोंडभरून कौतुक केलं. आता सेनापती हंबीरराव या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच चर्चेत असून, केवळ दोन तासांत दोन लाखाहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहीला आहे.
प्रविण तरडे दिग्दर्शित आणि उर्विता निर्मित सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर, सरसेनापती हंबीरराव यांचा “परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट” का डायलॉग चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील आता पुन्हा सरसेनापती हंबीरराव यांचे डायलॉग प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहे. अनेक भन्नाट डायलॉग तसेच ग्राफिक्स्, व्हिज्युअल, इफेक्ट्सची जबरदस्त झलक प्रेक्षकांना या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
काय आहे या चित्रपटात
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज या दोन्हीं राजांचे स्वराज्याचे सरसेनापती असणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीच साकारली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव यांच्या पत्नीची भूमिका प्रवीण तरडे यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीच साकारत आहे. या ट्रेलरमध्ये हंबीरराव यांच्या पत्नीचे देखील डायलॉग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अभिनेता गश्मीर महाजनी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची भूमिका साकारली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि संभाजी महाराजांचे सरसेनापती म्हणून काम केलेल्या हंबीरराव यांचा सोनेरी इतिहास या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
सरसेनापती हंबीराव हे छत्रपतींचे मामा होते. सरसेनापती हंबीरराव यांनी मामा आणि स्वराज्यासाठी असणारे कर्तव्य, हे एकाच वेळी खूप यशस्वीरित्या पार पाडले. एक धुरंदर योद्धा म्हणून देखील, त्यांनी आपली भूमिका पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यात देखील हंबीरराव यांची प्रमुख भूमिका असल्याचं या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका साकारणारे प्रवीण तरडे यांनी आपल्या भाषेत कुठलाही बदल केला नसल्याने, त्यांच्या या भूमिकेची अधिक चर्चा रंगली आहे.
लाजवाब ट्रेलर
प्रवीण तरडे यांच्या मुख्य भूमिकेत असणारा सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या ट्रेलर विषयी बोलायचं झाल्यास, ट्रेलर लाजबाब आहे. जबरदस्त डायलॉग, धैर्य शौर्य, आणि साहस यांनी परिपूर्ण असणारा हा ट्रेलर पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. या चित्रपटाच्या टिझर वेळी आपण सरसेनापती हंबीरराव यांचा “परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट” हा डायलॉग ऐकला होता. आता या ट्रेलरमध्ये असे अनेक भन्नाट डायलॉग प्रेक्षकांना ऐकायला मिळतात. हे डायलॉग ऐकताना अनेकांच्या अंगावर शहारे देखील उभे राहतात.
अब ये हिंदुस्तान हमारा है! तो अचानक ये हंबीरराव नाम की आंधी कहा से आई! या डायलॉगने या ट्रेलरची सुरुवात होते. त्यानंतर सरसेनापती हंबीरराव यांचा “सह्याद्राचा कडा श्वास रोखून खडा’ हा डायलॉग ऐकायला मिळाल्यानंतर अंगावर शहारे उभा राहतात. प्रेक्षकांना सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या टेलरमध्ये अधिक संवाद सरसेनापती हंबीरराव यांचेच ऐकायला मिळत आहेत. “अरे युद्धात झालेल्या जखमेसारखा देखना दागिना नाही, फक्त हा दागिना छातीवर पाहिजे, कुठेतरी पाठीत नाही” “त्या सर्जा खानाकडे काय आहे म्हणं आग ओकणाऱ्या तोफा आहेत, आरं मराठ्यांकडे आग ओकणाऱ्या नजरा आहेत” “आज आपला भगवा मातीत नाही, गरिबाच्या छातीत रोवायचाय” “शिवाजी महाराजांसारखा राजा कधी कोणा एकाचा नसतो, तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो” असे अनेक भन्नाट डायलॉग सरसेनापती हंबीरराव यांच्या तोंडून ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उभे राहतात.
हे देखील वाचा Sharad Pawar: खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड..”केतकीने केलेली विकृत कविता वाचून तुमचाही होईल संताप..
WhatsApp : व्हाट्सअप वर चूकूनही ‘हे’ मेसेज पाठवू नका, अन्यथा खाली लागेल जेलची हवा..
Google Search: गुगलवर या तीन गोष्टी सर्च केल्यास, पोलीस ठोकतील बेड्या..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम