Raj Thackeray: राज ठाकरे यांनी आपल्या नातवाचे नाव ठेवले आगळे वेगळे; जाणून घ्या, नावाचा नावाचा अर्थ..
Raj Thackeray: म शि दी व री ल भों ग्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) गेल्या काही दिवसांपासून कमालीचे चर्चेत आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या अनेक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र आता राज ठाकरे एका वेगळ्याच कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांच्या नातवाचा आज नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असेल, याविषयी अनेकांना उत्सुकता असल्याचे पाहायला मिळाले होते. अखेर राज ठाकरे यांच्या नातवाचं नामकरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा विवाह २०१९ला मिताली बोरुडे (Mitali Thackeray) यांच्याशी झाला होता. अमित आणि मितालीला ५ एप्रिल २०२२ पुत्ररत्न प्राप्त झाले होते. 5 एप्रिल दोन हजार बावीसला राज ठाकरे आजोबा झाल्यानंतर, अनेकांमध्ये राज ठाकरे आपल्या नातवाचं नामकरण कधी करणार? राज ठाकरें आपल्या नातवाचे नाव काय ठेवणार? याविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. मात्र ही उत्सुकता आज संपुष्टात आली असून, राज ठाकरे यांनी आपल्या नातवाचं नामकरण केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव ‘सचिन मोरे’ यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून राज ठाकरे यांच्या नातवाच्या नावाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव सचिन मोरे यांनी आपल्या फेसबुकवरून राज ठाकरे यांचे नातू आणि अमित ठाकरे, मिताली ठाकरे यांच्या मुलाचे नाव ‘ ‘किआन’ आमित ठाकरे, ठेवण्यात आलं असल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असेल? याविषयी मोठी उत्सुकता असल्याचे पाहायला मिळालं होतं. राज ठाकरे यांच्या नातवाच्या नावावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा देखील रंगल्या होत्या. एवढेच नाही, तर काहींनी सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या नातवाचे नावे देखील सूचवल्याचं पाहायला मिळाले होते.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव सचिन मोरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून राज ठाकरे आजोबा झाल्याचे जाहीर केले होते. सचिन मोरे यांनी आपल्या फेसबूक वरून एक पोस्ट लिहिताना म्हटले होते, “युवरांजांचे आगमन, आमचे साहेब आजोबा झाले” नंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या फेसबुकवरून राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव ‘किआन’ ठेवलं असल्याचं अधिकृतरित्या जाहीर केले आहे. राज ठाकरे यांच्या नातवाचे आगळंवेगळं नाव पाहून, अनेकांनी सोशल मीडियावर किआन या नावाचा अर्थ काय होतो, अशी विचारणा केली आहे.
राज ठाकरे यांच्या नातवाच्या नावाचा अर्थ काय?
राज ठाकरे यांच्या नातवाचे नाव किआन असल्याचं समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर या नावाचा अर्थ शोधायला सुरुवात झाली. अनेकांनी या नावाचा अर्थ काय आहे, अशी देखील विचारणार केल्याचं पाहायला मिळत आहे. prokerala.com या संकेतस्थळाने प्रसारित केलेल्या माहितीनुसार, किआन हे एक हिंदू नाव असून, या नावाचा अर्थ देवाची कृपा असा होतो, असं समोर आलं आहे. dvaita.org या वेबसाईट ने प्रसारित केलेल्या माहितीनुसार हे एक विष्णू देवाचं नाव असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज ठाकरे हे आपल्या नातवाचं नाव हिंदू धर्माशी संलग्न ठेवणार, हे जवळपास त्यांनी घेतलेल्या अलीकडच्या भूमिकेवरून स्पष्ट झालं होतं. आणि म्हणूनच त्यांच्या नातवाच्या नावाच्या नामकरणाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांच्या लग्नाला अनेक बड्या मंडळींनी लावली होती हजेरी
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह 2019 ला झाला. या दोघांच्या विवाहासाठी अनेक बॉलीवूडचे दिग्गज स्टार मंडळी आणि प्रतिष्ठित नेतेमंडळी देखील उपस्थित राहिली होती. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर, लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर अमित ठाकरे यांनी आता सक्रीय राजकारणात पाऊल ठेवले आहे.
हे देखील वाचा second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम