Voting card: मतदान यादीत नाव लावायचंय? ‘असा’ करा घरबसल्या पाच मिनिटांत अर्ज; मतदान ओळखपत्रही मिळेल घरपोच..
voting card: 18 वर्षावरील सर्वांना मतदान करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. हे आपण लहानपणीच नागरिक शास्त्रात शिकलो आहे. मात्र अठरा वर्षे पूर्ण होऊन देखील मतदान यादीत नाव नसेल, तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. तुम्ही 18 वर्ष पूर्ण होऊन देखील अद्याप मतदान यादीत नाव समाविष्ट केलं नसेल, तर तुम्ही घर बसल्या अगदी पाच मिनिटांमध्ये मतदान यादीत तुमचं नाव लावू शकता. यासंदर्भातील सगळी प्रोसेस आज आपण पाहणार आहोत.
मतदान यादीत नाव आणि मतदान ओळखपत्र कसं काढायचं?
जर तुमचे वय 18 वर्षे पूर्ण आहे, आणि तुम्हाला मतदान यादीत नाव नोंदवायचे आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोमवर जाऊन, www.nvsp.in असं सर्च करावं लागणार आहे. हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर National Voters Service Portal ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला login/register या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे.
आता तुम्ही जर या वेबसाईटवर यापूर्वी कधीही आला नसेल, तर या वेबसाइटवर तुमचं अकाऊंट नसेल. त्यासाठी तुम्हाला Don’t have account Register as a new user या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे. Don’t have account Register as a new user या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर नवीन पेज ओपन झालेलं दिसेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाइल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला समोर दिसणाऱ्या रकान्यात कॅप्चा टाकणं आवश्यक आहे. समोरच्या रकान्यात आकडे किंवा अक्षरे जशीच्या तसशी टाकल्यानंतर तुम्हाला,Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
इंथपर्यंत सगळी प्रोसेस व्यवस्थित झाल्यानंतर, तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता, त्या मोबाईल नंबरवर ओटीपी आलेला दिसेल. आलेला OTP तुम्हाला Enter OTP या पर्यायासमोर टाकून Verify या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे. यानंतर तुमच्या समोर दोन पर्याय दिसतील. त्यातला पहिला have EPIC Number त्याचबरोबर दुसरा don’t have EPIC Number हा असेल.
तुमचं नाव मतदान यादीत नसल्यामुळे, सहाजिकच तुमच्याकडे मतदान कार्ड देखील नसणार आहे. आणि म्हणूनच या दोन पर्यायांपैकी तुम्हाला I don’t have EPIC Number या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे. I don’t have EPIC Number या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेला दिसेल, या पेजवर तुम्हाला, तुमचं नाव, आडनाव, ई-मेल आयडी, पासवर्ड टाकणं आवश्यक आहे. टाकलेला पासवर्ड तुम्हाला पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी डबल टाकावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला Register या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे.
इथपर्यंत सगळे प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला परत एकदा लॉग-इन करणं आवश्यक आहे. Registration करतेवेळी टाकलेला मोबईल नंबर, सोबतच, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग-इन या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे. लॉग-इन केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल, या नवीन पेज वरील, पहिल्या fresh inclusion/ enrolment या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे. यापुढे तुम्हाला Citizenship या पर्यायांमध्ये I reside in India, या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे. I reside in India, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, राज्य निवडावं लागणार आहे.
इथपर्यंत सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला next या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे. मग तुम्ही ज्या मतदार संघात येता, त्या मतदारसंघातील गाव किंवा शहर निवडावं लागणार आहे. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला लोकसभा किंवा विधानसभा हा पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर तुमच्या पोस्टाचा पत्ता टाकावा लागणार आहे. यामध्ये राज्याचं नाव, जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, गावाचं नाव, घर क्रमांक, तसेच पोस्ट ऑफिस, आणि पिन कोड देखील टाकणं आवश्यक आहे.
इथपर्यंत सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला खाली Date या पर्यायावर तारीख निवडावी लागणार आहे. वर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही किती वर्षांपासून राहत आहात, या संदर्भातली सगळी माहिती व्यवस्थित भरायची आहे. यानंतर तुम्हाला एक address proof जोडणं आवश्यक आहे. तुम्हाला खाली बँक पासबुक किंवा रेशन कार्ड हे दोन पर्याय दिसतील या दोन पर्यायांपैकी तुम्हाला एक पर्याय सिलेक्ट करून, याचा फोटो अपलोड करणं आवश्यक आहे. ही माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पर्यायावर क्लिक करणे आवश्यक.
तुम्ही नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन झालेलं दिसेल, या पेजवर तुम्हाला तुमच्या जन्माविषयाची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. या पेजवर तुम्हाला जन्मतारीख, तुमच्या गावाचं नाव, राज्य तसेच जिल्हा निवडावा लागणार आहे. यानंतर, तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून, आधार कार्डाचा फोटो अपलोड करणं आवश्यक आहे.
तुम्ही आधारकार्डचा फोटो अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर, Age declaration form हा एक पर्याय ओपन झालेला असेल. Age declaration form यावर क्लिक करून, इथं तुम्हाला तुमचं नाव, वडलांचं नाव, गावाचे नाव, टाकणं आवश्यक आहे. हा फॉर्म डाऊनलोड करून भरणं आवश्यक आहे. तसेच पुढे, तुम्हाला मतदारसंघाचं नाव टाकणं आवश्यक आहे. सोबतच सही करून, ठिकाण, तारीख टाकणं आवश्यक आहे. आता तुम्हाला भरलेल्या फॉर्मचा फोटो काढून, Age declaration या पर्यायासमोर अपलोड करणं आवश्यक आहे.
Age declaration या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही ‘नेक्स्ट’ या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरणं आवश्यक आहे. याठिकाणी नाव आणि आडनाव टाकून, तुम्हाला लिंग निवडणं आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला आई-वडीलांची, माहिती भरणं आवश्यक आहे. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा फोटो समोरच्या पर्यायावर अपलोड करणं आवश्यक आहे. ही सगळी माहिती अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे.
ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला सगळ्यात शेवटी तुम्ही यापूर्वी एखाद्या मतदारसंघात नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केलेला नाही. सोबतच माझं नाव कोणत्याही मतदारसंघाच्या मतदान यादीत नाही, यासंदर्भातले declaration टाकून नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे.
यानंतर मग preview या पर्यायानुसार नवीन मतदान कार्डासाठी तुम्ही भरलेला फॉर्म-6 तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. त्याखालील जे सबमिट हे बटण आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर, तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर, तुम्हाला एक रेफरन्स आयडी देण्यात येईल. या आयडीनुसार तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकाल. या वेबसाईटच्या होमपेजवर तुम्ही परत आला की, तुम्हाला याठिकाणी Track application Status हा पर्याय दिसणार आहे.
Track application Status या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही रेफरन्स आयडी टाकून Track status या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे. हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर या फॉर्मची स्थानिक Booth level officer छाननी करत असतात. छाननी केल्यानंतर Electoral Registration officer (उपजिल्हाधिकारी) यांच्याकडे पाठवण्यात येतो.
तुम्ही भरलेली सगळी माहिती, तसेच कागदपत्रं व्यवस्थित असल्यास भरलेला फॉर्म accept केला जातो. त्यानंतर साधारण 2 महिन्यांमध्ये तुमच्या पत्त्यावर मतदान कार्ड पाठवलं जातं. यासंदर्भात तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही, आम्हला संपर्क करू शकता.
हे देखील वाचा खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईल असा पहा फेरफार उतार,अगदी सोप्या भाषेत..
ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; अन्यथा पीएम किसान हप्ता होईल बंद..
Viral video: मगरीने क्षणात हरणाचे तुकडे-तुकडे केले; तुम्हीच पहा काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ..
Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजगर जिवंत हरणाला गिळत असताना घडलं असं काही..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम