E-gram swaraj: ‘असा’ चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी, आणि उठवा सरपंचाचा बाजार

ग्रामपंचायत १०० टक्के निधी खर्च करू शकली नाही, तर काय होतं? वाचा सविस्तर..

0

E-gram swaraj: पंचायतराजमध्ये (panchayatraj) ग्रामपंचायतीला खूप महत्त्व आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक गावांचा कायापालट झाल्याचे आपण सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्षात जाऊन देखील जाऊन पाहिले असेलच. मात्र देशात अशा अनेक ग्रामपंचायतींच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. पूर्वी कुठल्या कामाला ग्रामपंचायत किती निधी खर्च करतेय, याचा कोणालाही अंदाज लागत नव्हता. मात्र आता ग्रामपंचायतीचा सगळा कारभार तुम्हाला ऑनलाइन पाहता येणार आहे. ग्रामपंचायतीला शासनाकडून आलेला निधी, आणि झालेला खर्च कसा पहायचा, याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

शासनाकडून गावच्या विकास कामांसाठी ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीचा योग्यप्रकारे आराखडा तयार होतोय का? सोबतच त्याची अंमलबजावणी होतेय का? हे गावातल्या सामान्य नागरिकाला देखील पाहता यावं, यासाठी केंद्र सरकारने 24 एप्रिल 2020 ला ‘ई-ग्राम स्वराज(e-gram swaraj)  या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “या अॅपवर ग्रामपंचायतीद्वारे झालेल्या विकासकामांची सविस्तर माहिती मिळणार आहे. सरकारने ग्रामपंचायतींसाठी दिलेला निधी कुठे आणि कसा खर्च करण्यात आला, याविषयीची सगळी माहिती या वेबसाईटवर उपलब्ध असेल. त्यामुळे गावचा कुठलाही नागरिक आपल्या ग्रामपंचायतमध्ये कुठले विकास काम सुरू आहे? या विषयाची सगळी अपडेट या वेबसाईटच्या माध्यमातून घरबसल्या घेऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं.

सरकारकडून ग्रामपंचायतीला दरवर्षी आलेला निधी, ग्रामपंचायतीने कुठल्या कामाला आणि कसा खर्च केला आहे, या संदर्भातली सगळी माहिती कुठल्याही नागरिकांना आपल्या मोबाईलवर सहज पाहता येणे शक्य झाले आहे. मात्र तरीदेखील अनेकांना आलेला निधी, खर्च झालेला निधी, आणि शिल्लक असलेली रक्कम, कशी चेक करायची याविषयी माहिती नसल्याचं समोर येत आहे. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेऊन, आम्ही तुम्हाला या संदर्भातली सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत. सर्वप्रथम आपण गावाचं बजेट कसं ठरतं, ते पाहूया.

गावाचं बजेट कसं ठरतं?

दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ग्रामविकास समितीची एक बैठक बोलावली जाते. या बैठकीमध्ये गावच्या मूलभूत गरजांचा प्रामुख्याने विचार केला जातो. शिक्षण,आरोग्य, महिला कल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर विचार केल्यानंतर संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे किती निधी उपलब्ध आहे, तसेच या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून आणखी किती नीधीची गरज आहे, याचं एक अंदाजपत्रक तयार करण्यात येतं. हे अंदाजपत्रक तयार केल्यानंतर गावातील अनेक योजनांचे एकत्रित अंदाजपत्रक पंचायत समितीला पाठवलं जातं. आणि पंचायत समिती राज्य सरकारकडे अंदाजपत्रक मंजूरीसाठी पाठवते. केंद्र आणि राज्य सरकार त्या त्या गावाची भौगोलिक परिस्थिती पाहून योजना देतं.

ज्या योजना केंद्राच्या आहेत, त्या योजनासाठी केंद्र सरकार 60 टक्के निधी देतं, तर राज्य सरकार 40 टक्के निधी देत असतं. जर राज्य सरकारशी संबंधित योजना असेल तर, राज्य सरकार त्या योजनेला शंभर टक्के निधी देतं. 1 एप्रिल 2020 पासून 15वा वित्त आयोग सुरू करण्यात आला आहे. या आयोगानुसार शासन दर वर्षाला गावातील प्रति व्यक्ती, 957 रुपये देतंय. 14 व्या वित्त आयोगात शासन ग्रामपंचायतींना वर्षाला प्रती व्यक्ती 488 रूपयेप्रमाणे निधी देत होतं. १५ व्या वित्त आयोगात ही रक्कम जवळपास डबल केल्याचं दिसतं. शासनाने 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला दिलेला पैसा हा कुठे खर्च करायचा? हे देखील सांगण्यात आले होते. १४ व्या वित्त आयोगातला निधी मानवविकास आणि कौशल्य विकासासाठी २५-२५ टक्के निधी खर्च करायचा होता. तर उर्वरित पन्नास टक्के निधी हा राज्य सरकारच्या योजनांचा समन्वय आणि पायाभूत सुविधांसाठी 25 टक्के असा खर्च करण्यास सांगितलं होतं.

आता आपण 15 व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च कराय सांगितलाय, याविषयी माहिती घेऊया. शासनाने 15 व्या वित्त आयोगाद्वारे गावाला दिलेल्या एकूण निधीपैकी तब्बल 50 टक्के निधी पाणीपुरवठा तसेच स्वछता यावर खर्च करण्यास सांगितलंय. तर राहिलेला पन्नास टक्के निधी हा, गावातील इतर बाबींवर खर्च करण्यास सांगितलं आहे. परंतु वित्त आयोगाकडून तुमच्या गावाला नेमका निधी किती आलाय? त्याचबरोबर तुमच्या ग्रामपंचायतीने तो कुठे खर्च केलाय? हे कसं चेक करायचं, याविषयी देखील आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

तुमच्या ग्रामपंचायतीनं किती निधी खर्च केलाय?

तुमच्या ग्रामपंचायतीला शासनाकडून किती निधी मिळाला आहे? आणि ग्रामपंचायतीने तो कुठे खर्च केला आहे? तसेच शासनाने पाठवलेल्या निधीपैकी एकूण किती निधी शिल्लक आहे? हे कसं पाहायचं? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमवर जाऊन https://egramswaraj.gov.in/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर “ई-ग्राम स्वराज” नावाची वेबसाईट ओपन झालेली तुम्हाला दिसेल. वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्ही ही वेबसाईट डेस्कटॉपवरच ओपन करणं गरजेच आहे. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करत गेल्यानंतर तुम्हाला Report हा पर्याय दिसेल.

रिपोर्ट या पर्यायाच्या बरोबर खाली तुम्हाला पाच पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला ACCOUNTING या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाच पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला ACCOUNTING ENTITY WISE REPORT या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला दोन नंबरचा पर्याय म्हणजेच CASH BOOK REPORT या पर्यायावर क्लिक करायचं आहे. CASH BOOK REPORT या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर असा चार्ट ओपन झालेला दिसेल.

या चार्टमध्ये दिसणाऱ्या रखाण्यात तुम्ही व्यवस्थित माहिती भरल्यानंतर तुम्हाला, GET REPORT या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीला शासनाने किती निधी दिला आहे? ग्रामपंचायतीने तो कुठे खर्च केला आहे? या संदर्भातली सगळी माहिती मिळेल. कुठल्या कामाला किती निधी खर्च झाला आहे, त्या कामाचे बिल कोणाच्या नावावर आहे, याची देखील सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. शासनाने पाठवलेल्या निधीपैकी ग्रामपंचायतीच्या खात्यावर आता किती रक्कम शिल्लक आहे, याची देखील माहिती तुम्ही घेऊ शकता.

ग्रामपंचायत निधी खर्च करू शकली नाही तर..

आपण अनेक वेळा ऐकलं असेल, शासनाने पाठवलेला १०० टक्के निधी ग्रामपंचायत खर्च करू शकली नाही. शासनाने पाठवलेल्या निधीपैकी तब्बल 60 ते 65 लाख ग्रामपंचायत खर्च करू शकली नाही, असं आपण अनेक वेळा ऐकलंय बरोबर ना, मग् या निधीचं काय होतं? असा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल.

“ग्रामीण अर्थकारणाचे अभ्यासक डॉ. कैलास बवले याविषयी माहिती देताना म्हणतात, ग्रामपंचायत खर्च करू न शकलेला निधी सरकारला परत जातो. जर हा निधी परत जात असेल तर, संबंधित ग्रामपंचायत अकार्यक्षम असल्याचं समजावं. गावच्या विकासासाठी आलेला निधी ग्रामपंचायत खर्च करू शकली नाही तर, “गावचा योग्य असा विकास आराखडा” ग्रामपंचायत तयार करू शकली नाही, असं समजावं. निधी नेमका कुठे खर्च करायचा? हे सरपंचाला समजणं फार गरजेचं आहे, अन्यथा गावची वाट लागू शकते”

हे देखील वाचा. वीस वर्षाच्या कोवळ्या पोराची सहा जणांनी ‘या’ किरकोळ कारणासाठी बोकसून केली ‘ह’ ‘त्या’; घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद..

PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा अॉनलाईन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…

Viral Video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून..

Viral video: रस्त्याने जात असताना म्हताऱ्याचा किडा वळवळला; विनाकारण बैलाला मारली काठी अन्.. पहा व्हायरल व्हिडिओ..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; ‘असा’ घ्या लाभ...

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.