शेतकरी सुखी राहावा म्हणून, महाराजांनी तयार केलेली निती वाचून,तुम्ही आजच्या राज्यकर्त्यांना शिव्या घालाल; एकदा वाचाच..

0

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच नाही तर, संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य करण्यास संबंधित त्यांनी निती तयार केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला नितीचे आजही जगभरातून कौतुक होताना पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेविषयी नीती तयार करताना त्यांच्या नितीचा मुख्य कणा हा शेतकरी होता.

शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी, शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची स्थापना केली. या नितीचा मुख्य कणा शेतकरी असण्यालाही कारण होतं. स्वराज्यात शेतात राबणारा शेतकरी हाच खरा स्वराज्याचा आधार होता, त्याच्या व्यवसायाला अनन्य साधारण महत्व होतं. त्याचे कारण म्हणजे, उत्पन्नात खूप मोठा वाटा शेतकऱ्याच्या शेतातून कर रूपात राज्याला मिळत होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांना प्रचंड महत्त्व होतं,आणि त्याची काळजी देखील सर्वांना होती.

आपल्या राज्याचा मुख्य कणा शेतकरी असल्याचे,लक्षात घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी सुखी करण्याबाबत एक विशेष धोरण आखले. जमिनीचे प्रकार केले. प्रकार करताना, शेती कोणत्या प्रकारात मोडते, याची वर्गवारी केली. शेतकऱ्यांना जमीन मोजून दिल्यानंतर, पिक पाहणी करण्याची व्यवस्था केली. शेतकऱ्यांच्या शेतात पीक कसं आलं आहे? याची पिक पाहणी करूनच शिवरायांच्या राज्यात शेतसारा आकारला जात असे.

राज्यात ज्या वेळी दुष्काळ पडेल, त्या वेळी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिलं जायचं. एवढंच नाही तर, शिवरांच्या राज्यांत दुष्काळ पडल्यावर शेतसारा देखील माफ करण्यात यायचा. शेतकऱ्यांनी शेतात भरघोस उत्पन्न मिळवल्यानंतर त्याच्या शेतमालाच्या विक्रीची जबाबदार देखील छत्रपती शिवाजी महाराज घ्यायचे. शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव मिळवा, यासाठी परराज्यात विक्री, केली जायची.

एवढंच नाही तर, शिवरायांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव येण्यासाठी साठा करण्याची देखील सोय करण्यात आली होती. साठ्याबरोबरच शेतकऱ्यांनी कोणत्या वेळी कोणत्या मालाचं उत्पन्न घ्यायचं? शिवरायांच्या राज्यात याचे देखील मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं जायचं. एवढंच नाही तर, राज्यातला शेतकरी कायम सुखी राहावा, यासाठी शिवरायांनी आपल्या तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल, पण शेतकरी सुखी राहिला पाहिजे. अशा प्रकारचे धोरण आपल्या शेतकऱ्यांसाठी राबवले होते.

आपल्या शेतकऱ्यांसाठी आदर्श नीती तयार करताना शिवरायांनी राज्यातल्या दुर्बल शेतकर्‍यांना शेती कसण्यासाठी बैलजोडी, बी-बियाणे, देण्याची सोय देखील केली होयी. एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर, शेतकऱ्यांचा शेतसारा माफ तर व्हायचाच, पण त्याला दिलेले कर्ज देखील माफ व्हायचं. विशेष म्हणजे, दुष्काळ पडल्यावर राजाचे मावळे, प्रत्येक गावात फिरुन, शेतकर्‍यांना धान्य देखील देत असत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून, शिवरायांनी आपल्या मावळ्यांसाठी देखील मागर्दर्शक नीती आखली होती.

कुठल्याही मोहिमेवर जात असताना आपले घोडे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नयेत. शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्यांच्या भाजी-पाल्याच्या देठालाही हात लावाल तर खबरदार. अशी ताकीद दिली होती. शेतकऱ्यांकडून कुठलीही गोष्ट खरेदी करताना, त्याला योग्य भाव देऊनच खरेदी करण्याची सक्त ताकीद मावळ्यांना महाराजांनी दिली होती. हिवाळ्याच्या दिवसांत रात्री शेकोटी केल्यानंतर, ती पूर्ण विझवूनच झोपावे. चुकून एखादी ठिणगी शेतकऱ्यांच्या शेतात पडली तर, त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. अशाप्रकारची निती शेतकऱ्यांबाबत शिवरायांनी तयार करून, ती अंगीकारली होती. शेतकऱ्यांबाबत एवढा कळवळा आणि काळजी करणारा राजा आज जगात कुठेही सापडणार नाही. आताच्या राजकारण्यांविषयी तर काही बोलायलाच नको.

हे पण वाचा: उस उत्पादक शेतकऱ्यांचा गोडवा या सरकारनं पुन्हा घेतला हिरावून; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का

नारायण राणेंवर गुन्हा दाखल; केव्हाही होऊ शकते अटक, ‘हे’ आहे कारण.

ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; …अन्यथा पीएम किसान हप्ता होईल बंद

‘उत्तर प्रदेश’सह ‘या’ तीनही राज्यात भाजपचा पराभव निश्चित; भाजपच्या नेत्यांनीही केलं कबूल

शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी भाषेत केल्याने ‘रकुल प्रीत सिंग’ वादाच्या भोवऱ्यात; शिवप्रेमी आक्रमक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.