‘उत्तर प्रदेश’सह ‘या’ तीनही राज्यात भाजपचा पराभव निश्चित; भाजपच्या नेत्यांनीही केलं कबूल

0

देशातल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकिंचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, भाजपसाठी या निवडणुका खूप मोठं आव्हान असल्याचं बोललं जात आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून, राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव होणार असल्याच्या चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत. फक्त उत्तर प्रेदेशच नाही तर, पंजाब गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील भाजपचा मोठा पराभव होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असून, भाजपच्या काही मंत्र्यांनी देखील हे मान्य केलं आहे.

देशात वाढती महागाई, बेरोजगारी, आणि शेतकऱ्यांच्या समस्या यामुळे भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत बॅफूटवर गेल्याच पाहायला मिळत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या यावरच मतदान होणार असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन वर्षांपासून चाललेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या नजरेत भाजपची प्रतिमा खूपच मलीन झाल्याचे दिसत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर, या राज्यात भाजपचा प्रचंड मोठा पराभव होणार असल्याचे दिसत आहे. २०१७ ला झालेल्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पार्टीला तब्बल ३१२ जागा मिळाल्या होत्या. मात्र आता योगी आदित्यनाथ यांच्या सभेला लोकांची गर्दी आणि उत्साह याचा विचार केला तर, लोकांची या सरकारवर प्रचंड नाराजी असल्याचं, पाहायला मिळतं. याउलट अखिलेश यादव यांच्या सभेचा विचार केला तर, अफाट गर्दी आणि कमालीचा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतो.

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीत राकेश टिकेत हा देखील मोठा फॅक्टर ठरणार आहे. जवळपास दोन वर्षापासून देशातला शेतकरी आंदोलन करत होता. मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी समजून न घेता, नरेंद्र मोदी यांनी हे शेतकरी नसून आंदोलनजीवी असल्याचं म्हटलं होतं. त्यातच गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना आपल्या चारचाकीने चिरडल्याने भाजपसाठी आणखीनच परिस्थिती कठीण झाली असल्याचं, बोललं जाऊ लागलं.

पंजाब विधानसभा निवडणुकीत देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसणार आहे. त्यातच कॉंग्रेसने पंजाबसाठी एक दलित चेहरा दिला असल्याने, याचा खूप मोठा फायदा कॉंग्रेसला होणार असल्याचं अनेक राजकीय विशलेषकानी म्हंटले आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये लढत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. मात्र आपची अलिकडच्या काळात प्रतिमा मलीन झाली आहे. त्यातच आशा वर्कर, यांच्या आंदोलनाने लोकांमध्ये आप विषयी जास्तच नाराजी असल्याचं दिसून येतं आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत उत्तराखंडमध्ये काँग्रेस सहज सत्तास्थाने करेल अशी परिस्थिती आहे. फक्त सत्ताच नाही तर भाजपचा या निवडणुकीत खूप मोठा पराभव होणार असल्याचं अनेक राजकीय विशलेषकांनी म्हंटलं आहे. भाजपच्या अनेक मंत्र्यांनी भाजप सोडल्याचा देखील मोठा फटका भाजपला बसणार असल्याचं बोललं जातं आहे. एकूणच भाजपसाठी या निवडणुका खूप कठीण असल्याचं चित्र सर्वच राज्यात दिसत आहे.

उत्तर प्रदेश प्रमाणेच गोवा विधानसभा निवडणुकीकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले आहे. याचे कारण म्हणजे अनेक राजकीय पक्ष या निवडणुकीत आपले नशीब आजमवताना पाहायला मिळणार आहेत. शिवसेना, तृणमूल काँग्रेस, आणि इतर स्थानिक पक्षांचा फटका बीजेपीला बसणार की काँग्रेसला हे सांगणं सध्या अवघड असल्याच बोललं जात आहे. मात्र या सगळ्यांच्या तुलनेत कॉंग्रेस सर्वात पुढे आहे, असंही स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. गेल्या वेळेस काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळून देखील सत्ता स्थापन करता आली नव्हती. त्यातच आता काँग्रेसने जवळपास सगळेच उमेदवार तरुण दिल्याने त्यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे असंही बोललं जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.