Health tips : एक महिना आहारातून चपाती काढून टाकल्यास काय होईल? वाचून बसेल धक्का..

0

Health tips : फिट राहणं अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी समस्या आहे. धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. निरोगी राहायचं असेल, तर नियमित व्यायाम करणे फार आवश्यक असल्याचं सांगितलं जातं. मात्र दररोज केवळ व्यायाम करून तुम्ही तंदुरुस्त राहू शकत नाही. नियमित व्यायामाबरोबर तुम्हाला हेल्दी डाएट करणं देखील फार आवश्यक आहे.

अनेकजण वजन कमी करण्यासाठी हेल्दी डायटचे देखील सेवन करतात. इतकंच नाही, तर काहीजण अगदी आहारातून पूणपणे चपाती आणि भात देखील काढून टाकतात. जर तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी आहारातून चपाती काढून टाकली असेल, किंवा जास्त प्रमाणात चपतीचे सेवन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

गव्हाममध्ये (wheat) मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. अधिक कार्बोहायड्रेट्स असणाऱ्या पदार्थांचे अधिक सेवन केल्यास वजन वाढते. हे सगळ्यांना माहीत आहे. साहजिकच त्यामुळे अनेकजण चपाती आहारातून काढून टाकतात. जर तुम्ही देखील चपाती (chapati) आहारातून काढून टाकण्याचा विचार करत असाल, तर असं अजिबात करू नका. आहारातून गहू काढून टाकल्यास वजन कमी होऊ शकते. मात्र यामुळे तुम्हाला अशक्तपणा देखील येऊ शकतो.

चपातीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबरही असते. फायबरच्या अधिक सेवनाने तुमचे पोट भरलेले राहते. त्यामुळे चापतीचे तुम्ही नियमित सेवन करू शकता. मात्र फायबर बरोबर चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स देखील मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे वजन वाढण्याचा देखील धोका असतो. मात्र शरीरामध्ये ऊर्जा राहण्यासाठी कार्बोहायड्रेट्स देखील आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही केवळ एकच वेळ चपाती खाऊन वजन नियंत्रणात आणू शकता.

चपातीमध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेटसह शरीरासाठी आवश्यक इतर खनिजे देखील आढळतात. त्यामुळे चपातीच्या सेवनाने शरीराला पोषक घटकही मिळतात. आहारातून चपाती पूर्णपणे बंद करणं शरीरासाठी हानिकारक देखील आहे. चपातीच्या सेवनामुळे पचनसंस्था देखील व्यवस्थित काम करते.

वजन कमी करायचे असेल, तर केवळ एकच फॉर्म्युला लक्षात ठेवणे आवश्यक आहे कॅलरी. जर तुम्ही दिवसाला 2000 कॅलरी बर्न करत असाल, आणि 2500 खात असाल तर तुमचे वजन कमी होणार नाही. शरीराला जर दररोज 2000 ची आवश्यकता असेल तर तुम्ही 2500 कॅलरी खाऊ शकता. मात्र तुम्ही फिजिजल ॲक्टिव्हिटी, व्यायामाच्या माध्यमातून 3000 कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. तरच तुम्ही वजन कमी करण्यामध्ये यश मिळवू शकता.

हे देखील वाचा Abhishek Sharma Tanya Singh : गर्लफ्रेंड आत्महत्या प्रकरणात अभिषेक शर्मा अडचणीत; त्या संबंधामुळे पोलिसांनी..

IPL 2024 Schedule : 22 मार्च ते 7 एप्रिल पर्यंतचे IPL 2024 वेळापत्रक जाहीर; उर्वरित सामने कधी? वाचा सविस्तर..

IPL season17 : भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या पाच दिग्गज खेळाडूंचे 2024 ठरणार शेवटचं आयपीएल; दोन नावं धक्कादायक..

Virat Kohli Anushka Sharma baby boy : विराटने इतक्या दिवस मुलाचा जन्म का लपवला? जाणून घ्या अकाय नावाचा अर्थ आणि विराटने लोकांना केलेलं आवाहन..

Shreyas Iyer vs BCCI : ईशान नंतर आता श्रेयस अय्यरच्या करिअरला खीळ! खोटं बोलल्यामुळे कारवाई; त्या पत्रामुळे पडला उघडा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.