Hardik Pandya ruled out: दुखापतीमुळे हार्दिक पांड्या बाहेर; न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात संघात होणार दोन बदल..
Hardik Pandya ruled out: लगातार चार सामन्यात चार विजय संपादन करून भारतीय संघाने या विश्वचषकात (world Cup 2023) दमदार सुरुवात केली आहे. जवळपास प्रत्येक खेळाडूने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचललेला आहे. एकीकडे भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असतानाच, दुसरीकडे हार्दिक पांड्याला (Hardik Pandya injured) झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघ आता संकटात सापडला आहे. न्युझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यात करिता हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुकणार आहे. (Hardik Pandya ruled out against IND vs NZ)
भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) सामन्या दरम्यान गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) पायावर दुखापत झाली. या दुखापतीमुळे आता हार्दिक पांड्या न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाचा भाग नसणार आहे. गोलंदाजी करत असताना हार्दिक पांड्याचा पाय मुरगळल्याने तो मैदान सोडून ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बसला होता.
हार्दिक पांड्याला झालेली दुखापत भारतीय संघासाठी चिंतेचा विषय असून, आता संघात दोन बदल करावे लागणार आहेत. हार्दिक पांड्या पांड्याचा मुरगळून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. पायाच्या स्कॅनचे रिपोर्ट विषयी अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र पुढील उपचारासाठी त्याला बेंगलोरच्या नॅशनल क्रिकेट इकॅडमीमध्ये (NCA) पाठवण्यात आले आहे.
रविवारी धर्मशाळा मैदानावर भारतीय संघाला न्युझीलंड विरुद्ध या स्पर्धेतील आपला पाचवा सामना खेळायचा आहे. या सामन्यात आता हार्दिक पांड्या भारतीय संघाचा भाग नसणार आहे. ऑल राऊंडर हार्दिक पांड्या बाहेर गेल्याने आता भारतीय संघाला दोन बदल करावे लागणार आहेत. हार्दिक पांड्याच्या बाहेर जाण्याने फलंदाजी आणि गोलंदाजी कमकुवत झाल्याने, एक स्पेशालिस्ट फलंदाज आणि स्पेशलिस्ट गोलंदाजाची आवश्यकता असणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोलंदाजीत फारशी चमक दाखवू शकल्या नसणाऱ्या शार्दुल ठाकूरला (shardul Thakur) बाहेर बसवलं जाणार असून, त्याच्या जागी स्पेशालिस्ट जलदगती गोलंदाज मोहम्मद (Mohammed Shami) शमीला संधी देण्यात येणार आहे. तर हार्दिक पांद्याच्या जागेवर सूर्यकुमार यादवला (SuryaKumar Yadav) संधी दिली जाणार आहे.
चार आणि पाच क्रमांकाचे फलंदाज फॉर्ममध्ये असल्याने, सहाव्या क्रमांकावर ईशान किशन (Ishan Kishan) ऐवजी सूर्यकुमार यादव हा चांगला पर्याय ठरू शकतो. असा विचार रोहित शर्मा आणि राहुल द्रविडचा आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे आता एक अतिरिक्त फलंदाज आणि गोलंदाजाचा ऑप्शन देखील कमी झाला आहे. भारतीय संघाला कराव्या लागणाऱ्या बदलामुळे आता त्याचा संघावर काय परिणाम होतो? हे न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा Sara Tendulkar Viral video: गिलने चौकार मारताच साराने वाजवल्या जोरजोरात टाळ्या; व्हिडिओ व्हायरल झाल्याने डेटिंगच्या चर्चा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम