India vs West Indies 1st T20I: यशस्वी, टिलक वर्माचा संघात समावेश; असा आहे पहिल्या टी-20 साठी भारतीय संघ..
India vs West Indies 1st T20I: कसोटी (test) आणि एकदिवसीय (ODI) सामन्याची मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघ टी 20 (T20 series) मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. एकदिवसीय आणि कसोटीच्या तुलनेत वेस्टइंडिजचा संघ टी ट्वेंटीमध्ये चांगला खेळ करतो. वेस्टइंडीजच्या खेळाडूंना टी-ट्वेंटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाते. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये वेस्टइंडिज संघाची कामगिरी देखील दमदार राहिली आहे. आतापर्यंत वेस्टइंडीज संघाचे दोन टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकले आहेत. सहाजिकच त्यामुळे भारतासाठी टी-ट्वेंटी मालिका आव्हानात्मक असणार आहे. (India vs West Indies 1st T20I live streaming)
आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकाची तयारी भारताने आतापासूनच सुरू केली आहे. अनेक अनुभवी खेळाडूंना टी ट्वेंटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शमी, या तगड्या खेळाडूंचा समावेश आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात भारतीय टी-ट्वेंटी संघ चांगली कामगिरी देखील करतो आहे. आज वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी ट्वेण्टी (IND vs WI 1St T20) सामन्यात देखील अनेक नवीन खेळाडूंचा अंतिम अकरामध्ये सहभाग होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये दमदार खेळ केलेल्या खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यशस्वी जैसवाल आणि तिलक वर्मा या दोघांनाही भारताच्या अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या दोघांमध्ये रस्सीखेच आहे. आज होणाऱ्या पहिल्या टी ट्वेण्टी सामन्यात तिलक वर्माच्या अगोदर संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे.
भारताच्या टी ट्वेण्टी संघात तीन दमदार सलामीवीर उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणते दोन खेळाडू सलामीला पाठवायचे? ही मोठी दिखेदुखी हार्दिक पांड्यापुढे असणार आहे. शुभमन गिल (shubman gill) यशस्वी जैसवाल (yashasvi jaiswal) आणि ईशान किशन (ishan Kishan) हे तीनही खेळाडू भारताच्या प्लेइंग11 मध्ये असणार आहेत. डावाची सुरुवात कोण करणार? हा प्रश्न असला तरी, शुभमन गिल आणि यशस्वी जैसवाल हे दोन सलामीवीर डावाची सुरुवात करण्याची दाट शक्यता आहे. (Yashasvi Jaiswal shubman gill open the inning)
तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर ईशान किशन फलंदाजीसाठी येण्याची शक्यता आहे. तर पाचव्या क्रमांकावर संजू सॅमसनला संधी मिळू शकते. सहाव्या क्रमांकावर हार्दिक, तर सातव्या क्रमांकाची जबाबदारी अक्षर पटेल पार पाडणार आहे. गोलंदाजीची कमान डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदिप सिंगवर असेल. यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी देखील त्याचा विचार केला जात असल्याने, टी ट्वेण्टी मालिका त्याच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
वेस्टइंडीज विरूद्ध भारतीय संघाला पाच टी ट्वेण्टी सामने खेळायचे आहेत. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेच्या तुलनेत ही मालिका भारतीय संघासाठी आव्हानात्मक असणार आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये वेस्टइंडीजचा संघ तुल्यबळ असल्याने क्रिकेट चाहते देखील मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. भारतीय वेळेनुसार पहिला टी ट्वेण्टी सामना संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. जियो सिनेमा फॅन कोड, या ओटीटी platform, आणि dd sports TV चॅनलवर या मालिकेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
असा असेल भारतीय संघ
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (विकेटकीपर) सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार) अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, मुकेश कुमार.
हे देखील वाचा Ajinkya Rahane: चाहत्यांना झटका..! ..म्हणून अजिंक्य रहाणेने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला..
Chanakya Niti: म्हणून या पुरुषांसाठी महिला काहीही करायला असतात तयार..
Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..
successful Life tips: यश तर मिळणार नाहीच, पण या चार गोष्टींना चुकूनही शिवलात तरी जीवनातून उठाल..
PM Kisan: अजूनही 14 वा हप्ता जमा झाला नाही? मग करा या हेल्पलाईन नंबरवर कॉल..
PM Matru Vandana Yojana: या महिलांना सरकार देतंय 6 हजार; असा घ्या लाभ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम