Ajinkya Rahane: चाहत्यांना झटका..! ..म्हणून अजिंक्य रहाणेने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला..
Ajinkya Rahane: नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2023) भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने दारुण पराभव केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दोन्ही डावात भारतीय संघाची फलंदाजी अपयशी ठरली. मात्र अजिंक्य रहाणेने दोन्ही डावात आश्वासक फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या. आणि भारतीय संघाला सावरण्याचा अपयशी प्रयत्न केला.
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचे खापर अप्रत्यक्षपणे अजिंक्य रहाणेवरच फोडण्यात आले. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर अजिंक्यला कसोटी संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर अजिंक्य रहाणेचे आंतरराष्ट्रीय करिअर आता संपुष्टात आलं असं अनेकांना वाटत होतं.
अजिंक्य रहाणेचे आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आले असं वाटत असतानाच आयपीएल 2023 ने अजिंक्य रहाणेला नवी संजीवनी दिली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना अजिंक्य रहाणेने दमदार खेळ केला. आयपीएलच्या इतिहासात अजिंक्य रहाणेने यापूर्वी इतकी उत्कृष्ट आणि उपयोगी फटकेबाजी कधीही केली नव्हती. आयपीएल आणि घरेलु क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार खेळाच्या जोरावर त्याला कसोटी संघात पुन्हा संधी देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजिंक्य राहणेचा नवा पुनर्जन्म झाला असला तरी, आता अजिंक्य रहाणेच्या क्रिकेट चाहत्यांसाठी दुःखद बातमी आहे. नुकत्याच पार पडलेल्या वेस्टइंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर अजिंक्य रहाणे इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार होता. मात्र लिस्टेटरशायर सोबत केलेला करार त्याने आता रद्द केला आहे. कसोटी क्रिकेटबरोबर अजिंक्य रहाणे इंग्लंडमध्ये मेट्रो बँक वनडे चषक देखील खेळणार होता. मात्र दोन महिने क्रिकेट पासून दूर राहण्याचा निर्णय अजिंक्य रहाणेने घेतल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे त्याने पत्राद्वारे संबंधित क्रिकेट क्लबला कळवले आहे. नॅशनल ड्युटीमुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं अजिंक्य रहाणे याने लिस्टेटरशायर क्लबला पत्राद्वारे कळविले आहे. पुढचे दोन महिने अजिंक्य रहाणे क्रिकेट पासून दूर राहणार आहे.
हे देखील वाचा Chanakya Niti: म्हणून या पुरुषांसाठी महिला काहीही करायला असतात तयार..
successful Life tips: यश तर मिळणार नाहीच, पण या चार गोष्टींना चुकूनही शिवलात तरी जीवनातून उठाल..
PM Kisan: अजूनही 14 वा हप्ता जमा झाला नाही? मग करा या हेल्पलाईन नंबरवर कॉल..
Partner cheating Tips: तुमचीही गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत चॅट करतेय? ही एक ट्रिक पकडुन देईल रंगेहाथ..
PM Matru Vandana Yojana: या महिलांना सरकार देतंय 6 हजार; असा घ्या लाभ..
SSC JE Recruitment 2023: SSC अंतर्गत या उमेदवारांसाठी तब्बल 1324 रिक्त जागांची भरती; लगेच करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम