CSK vs GT: पहिल्याच सामन्याला गालबोट; म्हणून गुजरात विरुद्ध चेन्नई सामना होणार रद्द..
CSK vs GT: आज पासून आयपीएलच्या 2023च्या पर्वाला (IPL 2023) सुरुवात होत आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मैदानावर (Narendra Modi cricket stadium Ahmedabad) हा सामना खेळण्यात येणार आहे. महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्ज Chennai super kings) आणि हार्दिक पांड्याच्या (hardik Pandya) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन संघांविरुद्ध हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता पूर्व नियोजित वेळेनुसार खेळण्यात येणार आहे. मात्र या सामन्यात व्यत्यय आला असून, हा सामन रद्द होण्याची देखील दाट शक्यता आहे.
आयपीएल सिझन16 (IPL16) च्या पर्वाची सुरुवात आज पासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मधून होणार आहे. हा सामना चार वेळा विजेता राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गत विजेता गुजरात टायटन्स या संघासोबत खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाची तुलना करायची झाली, तर दोन्ही संघ समतोल आहेत. दोन्ही संघांमध्ये डोमेस्टिक खेळाडूंची चांगली फळी आहे. मात्र दोन्ही संघ एकमेकांना भेटण्यासाठी सज्ज झाले असतानाच अहमदाबाद मधून एक दुःखद बातमी समोर आली आहे.
गुरुवारी संध्याकाळी अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस पडला. पावसामुळे खेळपट्टी देखील बऱ्यापैकी ओली झाली असल्याचं क्युरेटरांकडून सांगण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र सामन्यादरम्यान हलका पाऊस पडण्याचा अंदाज देखील आहे. आयपीएल स्पर्धेवर पावसाचे सावट निर्माण होऊ नये, म्हणून उन्हाळ्यामध्ये या स्पर्धेचा आयोजन केलं जातं. मात्र तरी देखील काही सामने पाऊस जिंकतो. आज पुन्हा एकदा पावसात जिंकतो की काय अशी परिस्थिती आहे.
दोन्ही संघांनी पोस्ट केला तो व्हिडिओ
काल मैदानावर पाऊसाने जोरदार बॅटिंग केली. पावसामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंना सराव करताना आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून पावसासंदर्भातला एक एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. चाहत्यांबरोबर या दोन्ही संघांच्या फ्रेंचाइला देखील पावसाची चिंता सतावत आहे. सकाळी कसलाही पाऊस पडला नसला, तरी देखील सामन्यादरम्यान हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे आता आयपीएल सीझन 16 च्या सुरुवातीलाच गालबोट लागते की काय अशी शक्यता देखील चाहत्यांमध्ये आहे.
गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये अंडर रेटेड राहिलेल्या गुजरात टायटन्सने सर्वांनाच धक्का देत, या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत विजेतेपद फटकावले. सर्वात जास्त आयपीएल फायनल खेळलेला आणि चार वेळा फायनल राहिलेला चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. या संघात मोठे खेळाडू नसले तरी त्यांच्याकडे महेंद्रसिंग धोनी नावाचा करिष्मा असल्याने सामन्याचा केव्हाही पासा पालटण्याची जादू त्याच्याकडे असल्याचे बोलले जाते.
आतापर्यंत या दोन्ही संघांनी एकूण दोन सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये दोन्ही सामन्यात गुजरात टायटनने चेन्नई सुपर किंग्स संघाचा पराभव केला आहे. यामध्ये पुण्यात खेळलेल्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटनने चेन्नई सुपर किंग्स संघाचा तीन गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात 94 धावांची महत्त्वपूर्ण खेळी डेविड मिलरने केली होती. तर मुंबईमध्ये खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात वृद्धिमान साहाने 67 धावांची खेळी करत गुजरात टायटनला विजय मिळवून दिला होता.
गुजरात पडणार भारी
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात देखील गुजरात चेन्नई सुपर किंग्ज संघावर भारी पडणार असल्याचं कागदावर तरी पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्याचा नेतृत्वात गुजरात टायटन हा संघ चेन्नई सुपर किंग्जच्या तुलनेत समतोल वाटत आहे. त्याचे कारण म्हणजे गुजरातकडे राशिद खान, अल्झारी जोसेफ, शिवम मावी, मोहम्मद शमी, यासारखे गोलंदाज आहेत.
Choosing the right rain snack ✅#WhenInGujarat #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/FyskXh1URj
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 30, 2023
गोलंदाजाबरोबर गुजरातकडे हार्दिक पांड्या, शुबमन गिल, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, केन विल्यमसन सारखे तगडे फलंदाज आहेत. दुसरीकडे रवींद्र जडेजा सोडला तर चेन्नई सुपर किंग्स संघाकडे एकही अनुभवी गोलंदाज नाही. दीपक चहर असला तरी गेल्या अनेक महिन्यांपासून तो क्रिकेट खेळायला नसल्याने त्याचा फॉर्म विषयी प्रश्नचिन्ह आहे.
दोन्ही संघाची अशी असणार अंतिम अकरा
चेन्नई सुपर किंग: रुतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी, दीपक चहर, सिसांडा मगला, सिमरजीत सिंग/मुकेश चौधरी, महेश तीक्षाना
गुजरात टायटन: शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, आर साई किशोर, राशिद खान, अल्झारी जोसेफ, शिवम मावी, मोहम्मद शमी
हे देखील वाचा PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..
Aadhaar-Ration card linking: जाणून घ्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्याची ही सोपी ऑनलाइन पद्धत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम