Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँकेत पाच हजार पदांची मेगा भरती; या उमेदवारांना करता येणार अर्ज..

0

Central Bank of India Recruitment 2023: बँकेमध्ये (Bank Job) नोकरी (nokari) करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र देशात बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात असल्याने नोकरी मिळवण्यासाठी सध्या मोठी कसरत करावी लागत आहे. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, आणि बँकेत नोकरी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ‘अप्रेंटिस’ या पदासाठी एकूण 5,000 पदांची मेगा भरती घोषित केली असून, या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘अप्रेंटिस’ या पदासाठी भरण्यात येणाऱ्या एकूण पाच हजार रिक्त जागांसाठी उमेदवारांना 3 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची तारीख 20 मार्चपासून निश्चित करण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘अप्रेंटिस’ या पदासाठी कोण अर्ज करू शकतो? त्याचबरोबर अर्ज शुल्क किती आकारले जाणार? ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

या उमेदवारांना करता येणार अर्ज

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘अप्रेंटिस’ या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर यासाठी तुम्ही कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. सोबतच तुमचे वय हे 20 ते 28 या दरम्यानच असणे आवश्यक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘अप्रेंटिस’ या पदासाठी भरण्यात येणाऱ्या पाच हजार जागांचा सविस्तर तपशील जाणून घेऊ.

रिक्त जागा तपशील

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण भरण्यात येणाऱ्या 5,000 पदांच्या जागेची वर्गवारी कॅटेगिरी नुसार करण्यात आली आहे. त्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना एकूण 1,162 जागा देण्यात आल्या आहेत. बरोबर एससी उमेदवारांसाठी 763 जागा, एसटी या उमेदवारांसाठी 416 जागा, ईडब्ल्यूएस या उमेदवारांसाठी 500 जागा, अप्रेंटिस या पदासाठी भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्वसाधारण या प्रवर्गामध्ये एकूण 2159 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

अर्ज शुल्क

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कॅटेगरी नुसार शुल्क आकारले जाणार आहे. PWBD उमेदवारांनासाठी 400 रुपये शुल्क असणार आहे. SC त्याचबरोबर ST उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. महिला उमेदवारांना देखील 600 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 800 अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

पगार

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस या पदासाठी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या पगाराविषयी जाणून घ्यायचे झाल्यास, उमेदवारांना दरमहा दहा हजार ते पंधरा हजार रुपये पगार दिला जाणार आहे. ग्रामीण त्याचबरोबर निमशहरी भागामध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपये पगार दिला जाणार आहे. शहरी शाखेसाठी पंधरा हजार रुपये दरमहा पगार मिळणार आहे. त्याचबरोबर मेट्रो शाखेसाठी दरमहा वीस हजार रुपये पगार उमेदवारांना मिळणार आहे.

असा करा अर्ज

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोम वर जाऊन centerbankofindia.co.in असं सर्च करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर, होम पेजवर ‘नवीनतम भरती’ या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर Central Bank of India Recruitment apprentice 2023 या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला 5000 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या पर्यायावर गेल्यानंतर, विचारलेला तपशील व्यवस्थित भरून, तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर प्रिंट काढून घ्या.

अशी केली जाणार निवड

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘अप्रेंटिस’ या पदासाठी भरण्यात येणाऱ्या पाच हजार जागांसाठी उमेदवारांची लेखी चाचणी आणि मुलाखत याद्वारे निवड केली जाणार आहे. परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रकारची असणार आहे. याबद्दल नवीनतम अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला वारंवार अधिकृत वेबसाईट तपासत राहावी लागणार आहे. यासंदर्भात तुम्हाला मेल देखील बँकेकडून पाठवला जाईल. तो देखील तुम्ही वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

realme smartphone: realme चा हा दर्जेदार स्मार्टफोन मिळतोय फक्त १० हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..

Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

Honda Shine 100cc: Hero Splendor Plus ला टक्कर देण्यासाठी Honda Shine 100cc झाली सज्ज; जाणून घ्या कोणती गाडी आहे बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.