HPCL Recruitment 2023: 12वी पाससाठी हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरी करण्याची संधी; असा करा अर्ज..

0

HPCL Recruitment 2023: देशात खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असली तरी आता अनेक सरकारी आणि खाजगी विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळण्याची कोणतीही शास्वती नसल्याने दहावी बारावी झाल्यानंतर उमेदवार नोकरीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतं. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. जर तुमची बारावी आणि इंजिनिअरिंग झाले असेल, तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुंबई विभागामध्ये नोकर भरती केली जाणार आहे.

बारावी उत्तीर्ण तसेच इंजीनियरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई विभागामध्ये एकूण 60 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून 25 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. कोणकोणत्या पदासाठी किती जागा भरण्यात येणार आहेत? तसेच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज कसा करायचा जाऊन घेऊया सविस्तर.

भरली जाणारी पदे

असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन या पदासाठी एकूण 30 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. असिस्टंट बॉयलर टेक्निशियन या पदासाठी –एकूण 7 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. असिस्टंट फायर आणि सेफ्टी ऑपरेटर या पदासाठी एकूण 18 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन या पदासाठी एकूण 5 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन’ या पदासाठी उमेदवारांची पात्रता B.Sc (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा इत्यादी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. ‘असिस्टंट बॉयलर टेक्निशियन’ या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण तसेच ITI चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

असिस्टंट फायर सेफ्टी ऑपरेटर’ या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 60% गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा पूर्ण असणे देखील आवश्यक आहे. सोबतच अवजड वाहन ड्रायव्हिंग लायसन्स असणे देखील आवश्यक आहे. ‘सिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन’ या पदासाठी उमेदवारांसाठी इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स यापैकी कोणताही एक इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि परीक्षा फी

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई विभागामध्ये केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांचे वय एक फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 या असणे आवश्यक आहे. एससी/एसटी त्याचबरोबर ओबीसी उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट दिली जाणार आहे. ओबीसी आणि ओपन कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना 590 रुपये परीक्षा फी आकारली जाणार आहे. मात्र एससी/एसटी आणि PWD उमेदवारांसाठी कोणतेही शुक्ल आकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया आणि वेतन

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई विभागामध्ये निवड केल्या जाणाऱ्या उमेदवारांचे वेतन आणि निवड कशी होणार हे देखील जाणून घेऊ. निवडी विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, उमेदवारांची संगणक आधारित चाचणी होणार आहे. कागदपत्रांची पडताळणी आणि कौशल्य चाचणी देखील घेतली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 27 हजार पाचशे ते एक लाखांपर्यंत दरमहा पगार दिला जाणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन www.hindustanpetroleum.com असं सर्च करा. त्यानंतर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. यानंतर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Gautami Patil: गौतमीला पुन्हा दणका! ..म्हणून थेट महिलांनीच काठीने दिला चोप; पाहा व्हिडिओ..

Rail Coach Factory Recruitment 2023: रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; लगेच करा अर्ज..

Alia bhatt pregnant: मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच आलिया पुन्हा प्रेग्नंट; पोस्ट करून स्वतः दिली माहिती..

regular sex benefits: नियमित सेक्स केल्याने शरीरावर होतोय हा गंभीर परिणाम; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा सेक्स करणं आहे फायदेशीर..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.