Chanakya Niti: कुटुंबात वाईट काळ सुरू होण्यापूर्वी हे पाच संकेत देतात इशारा..
Chanakya Niti: हजार वर्षांपूर्वी आचार्य चाणक्यांनी (aacharya Chanakya) आपल्या चाणक्य निती (Chanakya Niti) या ग्रंथांमध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नीतीशास्त्र त्याचबरोबर मानवी आयुष्याबद्दल देखील लिहून ठेवलं आहे. एवढंच नाही, तर मानवाच्या भविष्यात येणाऱ्या अडचणी विषयी देखील त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे. कुटुंबावर जर संकट येणार असेल, तर तुम्हाला त्याची चाहूल संकट येण्यापूर्वीच लागते. असं आचार्य चाणक्य यांचं म्हणणं आहे. काय आहेत ती संकेतं?जाणून घेऊ सविस्तर.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये नातेसंबंध, त्याचबरोबर समाजामध्ये तुमचा मान-सन्मान कसा उंचावेल? त्यासाठी तुमच्या अंगी कोणते गुण असायला हवेत? याविषयी देखील भाष्य केलं आहे. महत्वाचं म्हणजे, तुमच्या जीवनामध्ये भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी विषयी देखील त्यांनी भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य सांगताच, तुमच्या जीवनामध्ये भविष्यात अडचणी येणार असतील तर तुम्हाला काही संकेत मिळतात. तुम्ही ते संकेत वेळीच ओळखून सावध होणं गरजेचं असतं.
आचार्य चाणक्य म्हणतात, भविष्यामध्ये जर तुमच्या घरावर संकट येणार असेल, तर तुमच्या घरातील दूध गरम करताना वारंवार ओतू जाते. तुमच्या घरातील दूध वारंवार ओतू जात असेल तर तुमच्यावर आर्थिक संकट येणार आहे. असा त्याचा अर्थ आहे. कामामुळे गॅसवर असणारे दूध दुर्लक्षित होऊन ओतू जाणं सामान्य गोष्ट आहे. मात्र हा प्रकार वारंवार घडत असेल तर, भविष्यामध्ये तुमच्या कुटुंबाला आर्थिक चणचण भासू शकते.
आचार्य चाणक्य म्हणतात, जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील, छोट्या-छोट्या गोष्टीवरून घरातील सदस्य एकमेकांवर तोंड टाकत असतील तर, तुमचं कुटुंब आर्थिक संकटाला सामोरे जाणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. आचार्य चाणक्य सांगतात घरात सतत वाद होत असतील तर, तुमच्या घरात लक्ष्मीचा वास येत नाही. सततच्या भांड्यामुळे लक्ष्मीचा तुमच्यावर कोप होतो. आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला आर्थिक चणचण भासते.
आचार्य चाणक्य सांगतात, जर तुमच्या कुटुंबावर आर्थिक संकट येणार असेल तर, तुम्हाला संकट येण्यापूर्वी काही संकेत मिळतात. यामध्ये तुमच्या अंगणात असलेले तुळशीचे रोप सुकू लागते. वेळोवेळी पाणी घालून देखील जर तुळशीचे रूप सुकत असेल तर, तुमच्या कुटुंबावर भविष्यामध्ये आर्थिक संकट येणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. आचार्य चाणक्य म्हणतात, तुळशीचे रोप लक्ष्मीचे प्रतीक आहे. तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होत नसेल तर, तुळशीचे रोप सुखायला सुरुवात होते. जर असं होत असेल तर, तुम्ही जुनं रोप काढून नवीन रोप लावणे आवश्यक आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात, घरातील सदस्य जर मोठ्यांचा अपमान करू लागले, तर तुमच्या घरावर आर्थिक संकट येणार असल्याचे हे लक्षण आहे. घरातली छोटी मंडळी जर मोठ्यांचा अपमान करू लागले, मोठ्यांचा आदर करत नसतील, तर अशा कुटुंबांना नेहमी आर्थिक संकटातून जावे लागते. जे लोक मोठ्यांचा अपमान करतात त्यांना कधीच आशीर्वाद प्राप्त होत नाही.
आजारी चाणक्य सांगतात, घरातील सदस्यांची जर झोप पूर्ण होत नसेल, तरी देखील कुटुंबावर आर्थिक संकट येणार असल्याचे हे संकेत आहे. माणसाने नेहमी आनंदी असायला हवं. माणूस जर चिंतेत असेल तर, लक्ष्मी देखील त्या घरात फार काळ राहत नाही. तुम्ही चिंतेत असाल तर, तुमची झोपमोड वारंवार होते. साहजिकच यामुळे लक्ष्मी घरात फार काळ टिकत नाही. जर असं असेल तर, तुमच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवणार आहे असं समजावं.
हे देखील वाचा Chanakya Niti: चाणक्यांच्या या मार्गाचा अवलंब केल्यास झटक्यात मिळेल यश..
Malaika Arora: मलायका माझ्या आयुष्यात आल्यामुळे आता मला रोज रात्री…’; अर्जन कपूरचे खळबळजनक विधान..
Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम