Viral video: शिकार करायला गेलेल्या वाघाचा माकडानेच केला करेक्ट कार्यक्रम; व्हिडिओ पाहून तुम्हीही ठोकाल सलाम..

0

Viral video: सोशल मिडीयावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी अनेक व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही धक्कादायक सुद्धा असतात. नेटकर्‍यांकडून मात्र अशा व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद दिला जातो. मजेशीर व्हिडीओंवर अनेक प्रकारचे मीम्स बनवले जातात. सर्वत्र शेअर केले जातात. व्हायरल होणार्‍या या व्हिडीओंमध्ये प्राण्यांमधील संघर्षाचे व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात बघितले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दोन हिंस्त्र प्राण्यांमधील संघर्षाचे व्हिडीओ पुष्कळ बघितले जातात. तसेच हिंस्त्र प्राण्यांकडून केल्या जाणार्‍या शिकारींच्या व्हिडीओंना सुद्धा पसंती दिली जाते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिकारी आपली शिकार करण्यात अयशस्वी तर झालाच मात्र स्वतःची फजितीही करून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. साहजिकच यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका माकडाची शिकार करायला गेलेल्या वाघाचा हा व्हिडिओ आहे .

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक वाघ शिकारीसाठी निघालाय. आता तुम्ही म्हणाल, वाघाचा धर्मच शिकार करणे होय, मग त्यात आश्चर्यकारक असे काय? मात्र वाघ ज्याची शिकार करण्यासाठी गेला, त्याने वाघाची अशी पंचाईत केली की पुन्हा शिकार करताना तो वाघ देखील दहा वेळा विचार करेल. व्हिडीओमध्ये वाघ एका माकडाची शिकार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या माकडाने शिकारीसाठी आलेल्या वाघाचाच करेक्ट कार्यक्रम केला.

एक माकड आपल्या पिलाला घेऊन झाडावर बसले असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसते आहे. शिकारीसाठी बाहेर पडलेल्या वाघाने झाडावरील या माकडाला आपले भक्ष्य करण्याचा निर्धार केला. यानंतर वाघ हळूहळू झाडावर चढत अगदी झाडाच्या शेंड्यावर गेला. वाघ झाडावर चढण्यात यशस्वी तर झाला मात्र माकडाला पकडण्यात त्याला अपयश आले. आता तुमचा विचार झाला असेल की, माकडाने तेथून पळ काढला. नाही याउलट माकडाने त्या वाघाला चांगलीच अद्दल घडवली.

वाघ झाडावर चढल्यानंतर हळूहळू माकडाजवळ जाण्याचा प्रयत्न करताना यामध्ये दिसतोय. मात्र माकड सुद्धा तेवढ्याच चपळाईने वाघाला अधिकाधिक वर येण्यासाठी भाग पडताना दिसत आहे. असे करता करता माकडाने एका फांदीचा आधार घेतला आणि माकड त्या फांदीला लटकले. वाघ माकडाच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात त्या फांदीजवळ गेला आणि तोल निसटून थेट जमिनीवर कोसळला. यादरम्यान वाघाला काहीशी इजा देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाघ जमिनीवर पडल्यानंतर आपली खूप मोठी फजिती झाल्याचा भाव वाघाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

नेटकर्‍यांनी मात्र या व्हिडीओचा चांगलाच आस्वाद घेतला. weird and terrifying या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “तू जरी वाघ असला तरी झाडावरील राजा मी म्हणजेच माकड आहे” असा आशय सुद्धा यासोबत शेअर करण्यात आला आहे. अनेक मजेशीर कमेंट यावर केल्या जात आहे. विशेष म्हणजे, बातमी लिहीस्तोवर ८ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ बघितलाय. तसेच हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात शेअर सुद्धा केला जातोय.

हे देखील वाचा Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

Viral video: सापाची आणि माकडाची थरारक झुंज पाहून व्हाल थक्क; पाहा काय झाला शेवट..

Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..

Aadhaar card: आधार कार्ड धारकांना मिळणार ४.७८ लाखांचे कर्ज! काय आहे या योजनेची सत्यता? जाणून घेऊया..

PM Kisan Maandhan Yojana: या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना सरकार देतंय दरमहा तीन हजार; जाणून घ्या लगेच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.