Android मोबाईल वापरकर्त्यांचा मोबाईल होऊ शकतो हॅक, Google ने दिला ‘हा’ इशारा..
Google कंपनीच्या संशोधकांनी अँड्रॉइड (Android) वापरकर्त्यांना इशारा दिला आहे की, मोबाइल डिव्हाइसमधील ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (GPU) मधील बगमुळे लाखो अँड्रॉइड (Android) स्मार्टफोन हॅक केले जाऊ शकतील, अशी धक्कादायक माहिती गूगलच्या (Google) प्रोजेक्ट टीम झिरोने सांगितली आहे. गुगलच्या सुरक्षाविषयक कामकाज करणाऱ्या संशोधकांना ‘टीम झिरो’ म्हटले जाते. त्यांनी चिप डिझायनर ARM ला GPU बग्सबद्दल अलर्ट केले होते आणि ब्रिटीश चिप डिझायनरने ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (GPU) मधील त्रुटी दुरुस्त केल्या.
सॅमसंग (Samsung), शाओमी (Xiaomi), ओप्पो (Oppo) आणि गुगल (Google) यासह इतर मोबाईल निर्मात्या कंपन्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्रुटी दुरुस्त केल्या नव्हत्या, असा दावा प्रोजेक्ट ‘झिरो टीमने’ केला आहे. गुगलच्या सुरक्षा संशोधक जॉन हार्न यांनी सांगितले की, ARM Mali GPU driver मध्ये 5 त्रुटींचा शोध लावला आहे. या त्रुटी जर असतील तर हॅकर्स कुठल्याही अँड्रॉइड (Android) स्मार्टफोनचा ताबा घेऊ शकतात आणि स्मार्टफोनमधील सर्व वयक्तिक डाटा चोरी होऊ शकतो.
प्रोजेक्ट झिरो टीमचे इयान बिअर म्हणाले की, ज्या त्रुटींवर चर्चा केलेली आहे, त्या त्रुटी अपस्ट्रीम विक्रेत्याने निश्चित केल्या आहेत. परंतु अद्याप या त्रुटींची दुरुस्ती पिक्सेल (Pixel), सॅमसंग (Samsung), शाओमी (Xiaomi), ओप्पो (Oppo) आणि इतर अँड्रॉइड (Android) मोबाईलमध्ये करण्यात आली नाही. Mali GPU असलेली उपकरणे सध्या असुरक्षित आहेत, असे देखील प्रोजेक्ट झिरो टीमचे इयान बिअर म्हणाले.
गुगलच्या (Google) संशोधकांनी जून ते जुलै २०२२ दरम्यान ARM ला पाच त्रुटी निदर्शनात आणून दिल्या. ARM ने जुलै आणि ऑगस्ट 2022 मध्ये या त्रुटींची दुरुस्ती केली. त्यांच्या आर्म माली ड्रायव्हर सुरक्षा पृष्ठावर (CVE-2022-36449) सुरक्षा त्रुटी म्हणून जाहीर केले आणि आणि पॅच केलेला स्त्रोत त्यांच्या सार्वजनिक डेव्हलपर वेबसाइटवर प्रकाशित केला. हेही वाचा: Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह
Mali GPU वापरणारी आमची सर्व चाचणी उपकरणे अजूनही या त्रुटींमुळे असुरक्षित आहेत, असे गूगलला आढळले. कोणत्याही डाउनस्ट्रीम सुरक्षा प्रकाशनात CVE-2022-36449 चा उल्लेख केलेला नाही. टीम झिरोने सांगितले की, वापरकर्त्यांनी सुरक्षा अपडेट (Security Update) उपलब्ध झाल्यानंतर लवकरात लवकर पॅच करण्याचा सल्ला दिला जातो. हे विक्रेते आणि कंपन्यांना देखील लागू होते.
कंपन्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, अपस्ट्रीम स्त्रोतांचे बारकाईने पालन करा. तसेच वापरकर्त्यांना लवकरात लवकर पूर्ण पॅच प्रदान करण्यासाठी कंपन्यांनी सर्वोत्तम प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे तंत्रज्ञानातील दिग्गजाने म्हटले आहे. सॅमसंग (Samsung) मोबाईलच्या मते, सॅमसंगच्या गॅलेक्सी एस 22 (Samsung Galaxy S22) सिरीजमधील स्मार्टफोन आण स्नॅपड्रॅगन (Snapdragon) प्रोसेसरवर चालत असलेल्या स्मार्टफोनवर या त्रुटींचा परिणाम होत नाही. त्यामुळे हे स्मार्टफोन सुरक्षित आहेत.
हेही वाचा: ट्रेनचं तिकीट कन्फर्म न झाल्यास चक्क मिळणार विमानाचं तिकीट, एवढंच नव्हे तर..
Horoscope Rashifal 27 November 2022: 27 तारखेला सूर्याप्रमाणे या राशींचे चमकेल भाग्य..
UPI Payment करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी..
Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह..
Google Search: असं नेमक झालं तरी काय? गूगलवरून कस्टमर केअरचा घेतला नंबर आणि पीएफमधून १.२३ लाख गायब
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम