Google Search: असं नेमक झालं तरी काय? गूगलवरून कस्टमर केअरचा घेतला नंबर आणि पीएफमधून १.२३ लाख गायब
Google Search: सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. अगदी स्वयंपाकातील महितीपासून प्रत्येक गोष्ट आपण गूगलवर सर्च करत असतो. जी माहिती आपल्याला हवी असेल, ज्यावेळी हवी असेल, अशी माहिती आपल्याला एका क्षणात गूगलवर उपलब्ध आहे. त्यात रिलायन्स जियो (Reliance Jio) कंपनीचा उदय झाल्यापासून प्रत्येकाला दररोज १,२ जिबी इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. अगदी १० वी १२ वीच्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना आता इंटरनेट वापरताना आपण पहात असतो.
इंटरनेट सारख्या गोष्टी जेव्हापासून सहज आणि स्वस्त उपलब्ध झाल्या (Google Search) आहेत, तेव्हापासून त्याचे तोटे देखील मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहेत. कारण प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याचा गैरफायदा आता ऑनलाईन काळाबाजार करणारे लोक घेऊ लागले आहेत. ज्यांचे तंत्रज्ञानावर प्रचंड प्रभुत्व आहे, असे भामटे आजकाल आपल्या ज्ञानाचा वापर दुसऱ्यांना लुटण्यात करत आहेत. दरवेळी नवनवीन कटकारस्थाने हे भामटे रचत आहेत आणि त्यातून लोकांची फसवणूक करत आहेत.
काही वर्षांपूर्वी आपल्याला बँकेत, कितीतरी गर्दी पाहायला मिळायची. मोठीच्या मोठी रांग आपल्याला बँकांच्या बाहेर दिसायची. परंतु ऑनलाईन व्यवहाराची एक क्रांतीच जणू आली आणि जगातल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून व्यवहार करणे शक्य होऊ लागले. बँकेत जाऊन पासबुक छपाई करण्याची गरजच राहिली नाही. प्रत्येक व्यवहार बँकेच्या अधिकृत ॲपवर पाहायला मिळतोय. कुठल्याही व्यक्तीला कुठेही पैसे पाठवायचे असतील तर त्याच्या बँक खात्यावर स्लीपने पैसे भरायची गरज राहिली नाही. ऑनलाईन ते काम होऊ शकते. हेही वाचा: Breast Personality: स्तनाचा आकार सांगतो महिलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सर्व काही; अशा आकाराच्या स्त्रिया पतीसाठी ठरतात वरदान..
परंतु हे सगळं होत असेल तरीदेखील त्याची दुसरी बाजू किती भयानक होत चालली आहे, याचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजकालच्या या इंटरनेटच्या जगात लोकांची कशी फसवणूक केली जात आहे, हे आपण जाणून घेऊया. मुंबईमधील एक गृहस्थांना पीएफ रक्कम चेक करायची होती. त्यांना ही रक्कम चेक कारण एवढं महागात पडलं की तुम्ही विचार करू शकत नाही. त्यांची पीएफ ऑनलाईन चेक करणे ही एवढी मोठी चूक ठरली की त्यांना खूप मोठी रक्कम गमवावी लागली. त्यांच्या या चुकीमुळे त्यांच्या बँक खात्यावरील जवळपास १.२३ लाख रुपये एवढी रक्कम गायब झाली.
कोणासोबतही होऊ शकतो असा प्रकार:
मुंबईतील या 47 वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. सदर व्यक्तीला पीएफ रक्कम चेक करायची होती त्यामुळे त्यांनी गुगलवर ऑनलाइन कस्टमर केअर नंबर सर्च केला (Google Search). सर्च केल्यानंतर त्या व्यक्तीला त्यांच्या समोर एक हेल्पलाइन क्रमांक आला. त्या व्यक्तीने त्या नंबरवर पीएफ रक्कम जाणून घेण्यासाठी फोन केला. त्यानंतर समोरून EPFO (Employee Provident Fund Organization) अधिकारी असल्याच्या आवेशात बोलत असल्याने कुठलीही शंका न आल्याने सदर व्यक्तीला सर्व माहिती दिली.
समोरून आपण स्वतः EPFO अधिकारी सांगणाऱ्या त्या व्यक्तीने मोबाईलमध्ये एक एप्लिकेशन्स (App) इंस्टॉल (Install) करण्यास सांगितले. त्या ॲपवर सर्व प्रकारची पीएफ संदर्भात माहिती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यानंतर हे ॲप डाऊनलोड करणे त्या व्यक्तीला खूपच तोट्याचे ठरले. कारण त्यानंतर व्यक्तीच्या बँक खात्यामधून १.२३ लाख रुपये कट झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला. ज्यामध्ये ही रक्कम विविध १४ बँकांच्या खात्यांवर पाठवण्यात आली होती.
गुगलवर (Google Search) मिळणारी माहिती १०० टक्के खरीच असेल असे नाही. त्यामुळे गूगलवर मिळणारी माहिती खोटी देखील असू शकते. ही माहिती दिशाभूल करणारी देखील असू शकते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्यावेळी तुम्ही गूगलवर कुठल्याही कस्टमर केअरचा नंबर शोधता तेव्हा डुप्लिकेट क्रमांक देखील येऊ शकतो. कारण त्या लोकांनी तशी व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे कुठल्याही कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक घेताना त्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला (Website) भेट देऊन नंबर घ्या. हेही वाचा: Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेहल साठवलेले गाठोळे बया..
तसेच ज्या वेबसाइटला लॉक सिम्बॉल असेल अशाच वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा. जसं की तुम्ही ही बातमी वाचत असताना एकदम वरती डाव्या कोपऱ्यात आमच्या वेबसाईटच्या नावा अगोदर तुम्हाला जे कुलूपासारखे (Lock) चिन्ह दिसत आहे. तसेच ज्या वेबसाईटची सुरुवात HTTPS पासून सुरू होते. अशाच वेबसाइटवर क्लिक करा. कारण गुगलवर बऱ्याच फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्स (Website) आहेत. त्यांचा उद्देशच आर्थिक घोटाळे करणे हा आहे. त्यामुळे कुठल्याही वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर किंवा कुठलाही कस्टमर क्रमांक घेतल्यानंतर वयक्तिक माहिती देताना काळजी घ्या. तसेच ओटीपी फोनवरून शेअर करू नका.
हेही वाचा: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने उरकला लग्नसोहळा, चाहत्यांना धक्का; फोटो व्हायरल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम