Good News: रिव्ह्यू वाचून तुम्हीही खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, सरकारने उचलले मोठे पाऊल..
Good News: बऱ्याचदा आपण एखादी वस्तू विकत घेत असताना खास करून इलेक्ट्रॉनिक सारख्या वस्तू विकत घेताना आपण ई-कॉमर्स वेबसाईटवर जाऊन रिव्ह्यू (review) वाचत असतो. परंतु तुम्हाला माहिती नसेल ॲमेझॉन सारख्या कॉमर्स वेबसाईटवर वस्तूंचे लिहिलेले रिव्ह्यू खोटे असू शकतात. बरेचदा वस्तू घेतल्यानंतर आपल्या ते लक्षात देखील येते. खराब वस्तू देखील किती चांगली आहे, हे रिव्ह्यू मध्ये लिहिलेले असते. याच्यावर आता सरकारने पाऊल उचलले आहे. (Good News)
ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर लिहिण्यात आलेले रिव्ह्यूचा स्कॅम मध्यंतरी उघड झाला होता. या ई-कॉमर्स वेबसाईट वरती रिव्ह्यू लिहिण्यासाठी लोकांना पैसे देखील देण्यात येतात किंवा ज्यावेळी या वस्तूंची जाहिरात फेसबुक सारख्या ॲप वरती येत असते, त्यावेळी देखील आपल्याला बऱ्याच कमेंट्स पाहायला मिळतात. आपली दिशाभूल करण्यासाठी बऱ्याच गुणवत्ताशून्य उत्पादनांचे कौतुक हे मंडळी कमेंट्स मध्ये करत असतात. बरेचदा आपण याकडे डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि फसतो. काही वेबसाईट तुम्हाला फेक रिव्ह्यू ओळखण्यास मदत करतात. Fakespot तसेच thereviewindex या वेबसाईट तुम्हाला फेक रिव्ह्यू ओळखण्यास मदत करतील. त्यासाठी तुम्हाला वरील वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूचे युआरएल पेस्ट करावे लागेल. त्यानंतर ही तुम्ही रिव्ह्यूची सत्यता पडताळून पाहू शकता.
परंतु सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक थांबणार आहे. ते कसे जाणून घेऊया. ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स वेबसाईटवर विविध वस्तूंचे रिव्ह्यू लिहिण्यात येतात. या रिव्ह्यू बाबत त्याच्या स्त्रोताबाबत इ कॉमर्स वेबसाईटला खुलासा करावा लागणार आहे. एखाद्या कंपनीच्या उत्पादनावर रिव्ह्यू लिहिण्यासाठी लिहिणाऱ्याला पैसे देण्यात तर आले नाही याची खात्री या ई-कॉमर्स कंपन्यांनी करायची आहे. उत्पादनांच्या बनावट रिव्ह्यूवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने एक नियमावली सादर केली आहे. हेही वाचा: Marriage Tips: चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..
रिव्ह्यू वाचून खरेदी करणाऱ्या बऱ्याच लोकांची फसवणूक होत असल्याच्या घटनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या नव्या नियमावलीमुळे चांगले उत्पादन असणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार आहे. तसेच सर्वसामान्य जनतेची देखील फसवणूक होणार नाही. ही नियमावली तयार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. यासाठी मोठ्या ई कॉमर्स कंपन्यांना तसेच उद्योग आणि व्यापार संघटनां यांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. हेही वाचा: Pan Card: लागलीच करा हे काम, अन्यथा पॅन कार्डतर होईल बाद परंतु..; वाचा आयकर विभागाचा नवा नियम..
भारतीय मानक ब्युरोने एक नवीन मानक तयार केले आहे.भारतीय मानक ब्यूरो( Bureau of Indian Standards: BIS) ही भारत देशातील प्रमाणे ठरवणारी एक सरकारी संस्था आहे. IS 19000:2022 हे मानक ज्या कंपन्या त्यांच्या कस्टमरने दिलेल्या रिव्ह्यूला प्रकाशित करतात, अशा सर्व कंपन्यांना हे मानक लागू होते. अशा सर्व ई कॉमर्स कंपन्या BIS चे नियम पाळत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी एक नवीन सर्टिफिकेट सादर करणार आहे. हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कंपन्यांना BIS कडे अर्ज सादर करावा लागणार आहे. हेही वाचा:Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेहल साठवलेले गाठोळे बया..
दीर्घ काळ विचार विनिमय करून तयार करण्यात आलेली ही नियमावली येत्या 25 नोव्हेंबरपासून लागू केली जाणार आहे. काही कालावधीसाठी हे मानांकन घ्यायचे की नाही, हे कंपन्यांवर अवलंबून आहे, परंतु ज्या कंपन्यांकडे हे मानांकन प्रमाणपत्र नसेल, अशा कंपन्यांच्या रिव्ह्यूवर लक्ष ठेवता येत नसल्यास, हे मानांकन सर्वच ई-कॉमर्स वेबसाईटला बंधनकारक असणार आहे. हेही वाचा: Couple Romance Video Viral: तरुणी नको म्हणत असतानाही सिग्नलला थांबून तरुणाचा इम्रान हाश्मी स्टाईल Kiss; शेजारी पाहत असताना..
नव्या नियमावलीनुसार उत्पादनांचे कुठलेही रिव्ह्यू बनावट किंवा ग्राहकांची दिशाभूल करणारे नसावेत. तसे जो व्यक्ती रिव्ह्यू लिहीत आहे, त्याची ओळख त्याच्या परवानगीशिवाय उघड केली जाऊ नये. तसेच जे रिव्ह्यू एखाद्याला पैसे देऊन लिहून घेतले असल्यास तसे जाहीर करावे. कारण बरेच रिव्ह्यू पैसे देऊन विकत घेतलेले असतात. तसेच कुठल्याही उत्पादनांचे स्टार रेटिंग पाहून ग्राहक खरेदी करत असतात. त्यामध्ये देखील कुठलीही फसवणूक होता काम नये.
एखाद्या व्यक्तीने जर रिव्ह्यू लिहिला असेल, तर तो तसाच प्रकाशित झाला पाहिजे. त्यात कुठलाही बदल केला जाऊ नये. तसेच कुठल्याही उत्पादनांचे रेटिंग लपवले जाऊ नये. तसेच यामध्ये कुठलीही छेडछाड केली जाऊ नये. जो व्यक्ती रिव्ह्यू देत असेल त्याची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. KYC प्रोसेस लागू करावी लागेल. तसेच नियमांचे पालन केले नाही, तर तो गैरव्यवहार मानला जाईल. तसेच ग्राहक आयोग आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण सबंधित कंपनीवर कारवाई करू शकतात.
या नव्या नियमावलीच्या चर्चासत्रात अमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart), गूगल (Google), झोमॅटो (Zomato), स्विगी (Swiggy), रिलायन्स रिटेल (Reliance Retail), टाटा सन्स (Tata Sons), मिशो (Mesho), ब्लिंकिट (Blinkit), आणि झेप्टो (zepto) हे या चर्चासत्रात सहभागी झाले होते. या सर्वांनी मानांकनाचे पालन करणार असल्याचे सांगितले. तसेच ही नियमावली तयार करताना काही उद्योग संस्थांचा देखील सल्ला घेण्यात आला.
हेही वाचा: Marriage Tips: चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..
Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेहल साठवलेले गाठोळे बया..
Pornography Case: राज कुंद्रा, पूनम पांडे, शर्लीनने बनवले अश्लील व्हिडीओ; व्हिडिओ व्हायरल..
Pan Card: लागलीच करा हे काम, अन्यथा पॅन कार्डतर होईल बाद परंतु..; वाचा आयकर विभागाचा नवा नियम..
Good News: घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, आता ग्राहकांची
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम