Importance of sleep: का खेळतात स्वतःच्या जीवाशी? दररोज रात्री वेळेत झोपा अन्यथा आरोग्यावर होतील हे जीवघेणे परिणाम..
Importance of sleep: स्मार्टफोन (smartphone) आणि सोशल मीडियाच्या (social media) जमान्यात प्रत्येकाची लाईफस्टाईल (lifestyle) बदललेली आहे. आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या या उपक्रमामुळे अनेकांची जीवनशैली बदललेली आहे. या सगळ्या उपकरणांना बाजूला सारून रोज रात्री (every night) वेळच्यावेळी झोपणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी असेल, असं म्हटले तरी देखील अतिशोक्ती होणार नाही. कामावरून घरी आल्यानंतर, रोज रात्री इंस्टाग्राम (Instagram) फेसबूक (Facebook) यूट्यूब (YouTube) अशा अनेक माध्यमावर टाईम पास करताना पाहायला मिळतात. या माध्यमांवर टाईमपास करता करता त्यांना कधी रात्रीचे दीड दोन वाजतात (late night) हे लक्षात देखील येत नाही. मात्र यामुळे माणसाला आपला जीव देखील गमवावा लागू शकतो, याविषयी तुम्हाला माहिती आहे का? impact of not taking enough sleep
सध्या धावपळीच्या या युगात अनेकांना आपल्या आरोग्याकडे (Health) लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र तरी देखील काही बेसिक नियमांचे पालन करून तुम्ही तुमचे आरोग्य व्यवस्थित ठेवू शकता. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं काय असेल, तर नियमितपणे पुरेशी झोप. जर तुम्ही रोजच्या रोज वेळच्यावेळी झोपलात आणि दररोज तुमची पुरेशी झोप होत असेल, तर तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्यांना दोन हात लांब ठेवता. अनेकांना ही सामान्य गोष्ट वाटत असल्याने, अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्याचा आपल्या आरोग्यावर जीव घेणा परिणाम होतो. रोज पुरेशी झोप झाली नाही, तर आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम होतात याविषयी जाणून सविस्तर.
जर तुम्ही सोशल मीडियावर दररोज वेळ घालवत असाल आणि रात्री बारा एक वाजता झोपत असाल, तर तुम्ही तुमचे आयुष्य कमी करून घेत आहात. निरोगी आरोग्य ठेवायचं असेल, तर दररोज तुमची झोप पूर्ण होणे आवश्यक आहे. नियमितपणे तुमची झोप पूर्ण होत असेल, तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर, ताजेतवाने दिसता. दिवसभर काम करण्यासाठी तुमच्या अंगामध्ये ऊर्जा संचारते. मात्र नियमितपणे जर तुमची झोप पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला अपचन, ऍसिडिटी, यासारख्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही, तर साखर, रक्तदाब, अटॅक यासारख्या अनेक समस्यांपासून दोन हात लांब राहता.
इम्युनिटी ढासळेल ( Poor Immunity)
शरीरामधील रोगप्रतिकारशक्तती (Immunity) वाढवण्यासाठी दररोज पुरेशी झोप घेणे फार आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर झोपला नाही, तर रोगप्रतिकारशक्ती खालावते. त्यामुळे तुम्ही नेहमी आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते. नियमित पुरेशी झोप होत असेल, तर तुमच्या मेंदूचे आरोग्य देखील उत्तम राहते. (brain and body relaxation) झोपेमुळे तुमच्या मेंदूवर होणारा ताण कमी होतो. यासोबतच तुम्हाला खोकला, सर्दी, ताप यासारख्या अनेक समस्या, उद्भवत नाहीत.
हार्मोनल इम्बॅलन्सची समस्या
जर तुमची नियमितपणे पुरेशी झोप होत नसेल, तर तुमचा हार्मोनल इनबॅलन्स (Harmonal Imbalance) होतो. साहजिकच त्यामुळे तुम्ही जाड होण्याची समस्या देखील निर्माण होते. यासोबतच थकवा देखील तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, समोरच्याला देखील तुम्ही फ्रेश नसल्याचे जाणवतं. एवढंच नाही, तर विनाकारण तुम्ही कोणावरही आपला चिडचिडेपणा व्यक्त करता. साहजिकच पुरेशी झोप होत नसेल, तर याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होतो.
महिलांवर होतो हा परिणाम
पुरुषांपेक्षा महिलांना घरातील अनेक कामे असतात. सहाजिकच यामुळे घरातील आवरा आवरीपर्यंत महिलांना रात्री दहा वाजतात. सर्व कामे आवरून झाल्यानंतर, महिला देखील मोबाईलवर काही वेळ टाईमपास करतात. मात्र हा टाइमपास इतका वाढतो, की रात्रीचे बारा वाजलेले देखील कळत नाहीत. हळूहळू ही सवय लागून जाते, आणि मग महिलांना देखील आरोग्याची गंभीर समस्या उद्भवते. महिलांची जर दररोज झोप पूर्ण होत नसेल, तर महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचे सर्वेतून समोर आलं आहे.
डिप्रेशन (depression )
नियमिपणे जर तुमची पुरेशी झोप होत नसेल, तर याचा थेट तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. साहजिकच यामुळे तुम्ही डिप्रेशन (depression ) मध्ये जाण्याची समस्या निर्माण होते. जर तुम्हाला वेळेत झोप येत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मोबाईल पासून तुम्ही जितका वेळ जास्त लांब राहाल तितकं तुमचं आरोग्य अधिक चांगले राहील. खासकरून जर तुम्ही रात्री मोबाईलचा वापर करत असाल, तर टाळा. हळूहळू लवकर झोप लागायला सुरुवात होईल.
हे देखील वाचा Flipkart Big Dussehra Sale 2022: या सेलमध्ये Samsung, Vivo सह अनेक कस्मार्टफोनवर तब्बल 80 टक्के डिस्काउंट; ऑफर फक्त तीन दिवस..
INDvSA: बॅटिंग करत असताना के एल राहुलच्या पायातच निघाला साप; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..
Women rights: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! महिलांना गर्भपात करण्याचा दिला पूर्ण अधिकार..
SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम