late night Sleep Side effect: तुम्हाला रात्री ऊशिरापर्यंत जागायची सवय आहे का? असेल तर आत्ताच बंद करा अन्यथा..
late night Sleep Side effect: आपल्या आजुबाजुला, मित्रपरिवारात अशी अनेक लोकं असतात, ज्यांना रात्री ऊशिरापर्यंत जागायची सवय असते. कॉलेज लाईफमध्ये तर अनेकजण रात्रभर जागुन काढण्यास आव्हान समजतात तर अनेकांना नाईटआउटची सुद्धा सवय असते. पुष्कळ लोकं अशी आहेत, ज्यांना रात्री लवकर झोपच येत नाही. मग अशावेळी ते मोबाईलवर वेळ घालवतात. अनेकांना रात्रीचे काम करण्याची सवय असते. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर रात्री ऊशिरापर्यंत ते काम करत असतात. विद्यार्थी जिवनात अनेकांना रात्रीचा अभ्यास करण्याची सवय असते. अनेकांना तर त्यांच्या कामाच्या व्यापामुळे आणि त्यासंबंधीत विचारांमुळे झोप येत नाही. अशावेळी एकतर त्यांना कुठले तरी व्यसन करुन झोपावे लागते किंवा झोपेच्या गोळ्या घेऊन जबरदस्ती झोप आणावी लागते.
आता तुम्ही म्हणाल की, एवढं रात्रीच्या झोपेबाबत का सांगताय? तर त्याच कारण असं आहे की रात्री ऊशिरापर्यंत जागण्याची सवय असणार्यांना किंवा रात्री पुरेशी झोप न घेणार्यांना त्यांच्या जिवाचा धोका निर्माण होऊ शकतो. कारण ज्याप्रमाणे आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज लागते. त्याचप्रमाणे शरीरास विश्रांतीची आवश्यकता असते. झोपेतून शरीराला विश्रांती मिळते. त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम, सकस आहार आणि यांसोबतच पुरेशी झोप सुद्धा आवश्यक आहे. पूर्ण झोप न झाल्यास तुम्हाला विविध आजार होण्याची शक्यता आहे. त्यापैकी काही आजार थेट तुमच्या जिवावर सुद्धा बेतु शकतात. आम्ही तुम्हाला या लेखामध्ये त्याबद्दलच माहिती देणार आहोत. तर जाणुन घेऊयात पुरेशी झोप न घेतल्यामुळे तुम्हाला कुठल्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.
उच्च रक्तदाब
रात्री ऊशिरापर्यंत जागल्याने विविध आजारांना तुम्ही आमंत्रण देता, त्यापैकीच एक ऊच्च रक्तदाब आहे. तरुण वयात या आजाराचे लक्षण जाणवत नाही. मात्र सतत जागरण केल्याने हा आजार होण्याची शक्यता बळावते. वयाची ४० वर्षे पार केल्यानंतर सहसा ऊच्च रक्तदाबाची समस्या जाणवायला लागते. ऊच्च रक्तदाबाचा परिणाम थेट हृदयावर होतो. वाहिन्यांमधून रक्ताचा सुरळीत प्रवाह होण्यास अचानक अडचनी जाणवु लागतात. परिणामी चक्कर आल्यासारखे वाटायला लागते. ऊच्च रक्तदाबात शरीराच्या काही अवयवांपर्यंत रक्त पोहचण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक, किडनी फेल्युलर, पॅरालीसीस किंवा हार्ट अटॅकचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ऊच्च रक्तदाबाची समस्या सहसा ऊद्भवु न देणेच चांगले आहे. त्यासाठी रात्री ऊशिरा झोपण्यासारख्या काही सवयी टाळण्याची गरज आहे.
मधुमेह(डायबेटीज)
मधुमेहाच्या रुग्णांना तर रोजचे जिवन जगतांना सुद्धा स्वत:वर अनेक प्रतिबंध लादावे लागतात. मधुमेहाच्या रुग्णांना गोड खाण्याची बिल्कुलच मुभा नसते. बर्याचदा मधुमेह हा जेनेटीक असतो. मात्र काही जणांना तर, त्यांच्या कुटुंबियांत पहिल्यांदा त्यालाच होतो. रोजच्या धावपळीच्या जिवनात काही महत्वांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास मधुमेह होण्याची शक्यता असते. त्यापैकी रात्री पुरेशी झोप न घेणे हे एक कारण आहे. रात्रीच्या अपुर्या झोपेमुळे शरीरातील ईन्सुलीन प्रतिरोधक क्षमता वाढवते. परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण त्याने वाढते. ज्यामुळे मधुमेह होतो. त्यामुळे मधुमेह टाळायचा असल्यास रात्रीच्या झोपण्याला गंभीरतेने घेणे जरुरी आहे.
हृदयविकाराचा झटका
रात्री पुरेशी झोप न झाल्याने शरीराच्या काही स्नायुंना आणि अवयांना आरामच मिळत नाही. परिणामी त्यांच्यावरील दाब वाढत जातो. रात्री पूर्ण झोप न झाल्याने शरीराच्या विविध भागांवर सुद्धा परिणाम होतो. बीपी आणि कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सुद्धा असते. हृदयविकाराचा झटका थेट तुमचा जिव घेऊ शकतो. त्यामुळे जिव वाचवायचा असल्यास रात्री लवकर झोेपले पाहिजे. जेणेकरुन शरीरास आवश्यक तेवढी झोप पूर्ण होईल.
नैराश्य येते
अनेकांना रात्री झोपण्याअगोदर विचार करण्याची सवय असते. बहुधा या विचारांमध्ये नकारात्मक विचारच जास्त असतात. त्यामुळे हे विचार थेट तुमच्या झोपेवर परिणाम करतात. रात्री ऊशिरापर्यंत झोपच लागत नाही. मग तुम्ही मोबाईलचा सहारा घेता आणि पुष्कळ वेळ गेल्यानंतर कसे-बसे झोपी जाता. मात्र रात्री पूर्णवेळ झोप न झाल्यास तुमचा संपूर्ण दिवस खराब जातो. दुसर्या दिवशी ऊदासीनता वाढते. त्यामुळे चिंतेचे प्रमाण वाढते. छोट्या-छोट्या गोष्टींची विनाकारण चिंता व्हायला लागते. मग पुन्हा नकारात्मक विचार डोक्यात भुंगा घालतात आणि तुम्हाला नैराश्य येते. नैराश्यात माणुस टोकाचे पाऊल सुद्धा ऊचलु शकते.
लठ्ठपणा येतो
रात्रीची पुरेशी झोप न झाल्याने थेट पचनक्रियेवर त्याचा परिणाम व्हायला लागतो. पचनक्रिया बिघडते आणि अन्न पचण्यास अवघड जाते. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढत जातो. लठ्ठपणा वाढण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे लठ्ठपणा वाढु द्यायचा नसेल तर २४ तासांतून ७ तासांची झोप घेणे अनिवार्य असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. लठ्ठपणा वाढल्यास पुन्हा कॉलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरच्या समस्या येतात. ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. पचनक्रिया बिघडल्यामुळे मुत्रपिंडावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे मुत्रपिंडाचे रोग सुद्धा ऊद्भवण्याची शक्यता जास्त असते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते पुरेशी झोप फार महत्वाची आहे. शरीर निरोगी ठेवण्यात झोप फार मोठी भूमिका बजावते. ज्याप्रमाणे आपण व्यायाम आणि सकस आहार तसेच ध्यान वगैरेंकडे लक्ष देतो. त्याचप्रमाणे झोपेवर लक्ष देणे गरजेचे आहे. मन एकाग्र करण्यासाठी सुद्धा पुरेशी झोप गरजेचे आहे. त्यामुळे किमान ७ तास तरी शांत झोप घेतली पाहिजे. अन्यथा अपुर्या झोपेमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे देखील वाचा Ration Card: रेशन दुकानदार पावती, नियमानुसार धान्य देत नाही? फक्त या नंबरवर कॉल करा लगेच उठेल दुकानदाराचा बाजार..
Urine Colour Chart: लघवीच्या रंगावरुन समजते आजाराचे स्वरूप; जाणून घ्या लघवीच्या विविध रंगांविषयी..
Social media side effects: सोशल मीडियाचा वापरामुळे होतायत हे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार..
Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.