Dangers Of Using GB WhatsApp: GB WhatsApp वापरण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितही असतील, पण हे खतरनाक धोके जाणून तुम्हीही कराल त्वरीत बंद..

0

Dangers Of Using GB WhatsApp: सध्याच्या काळात WhatsApp हे फार लोकप्रिय माध्यम आहे. WhatsApp हाताळण्यास अगदी सहज आणि सोपं आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक वापरकर्ते असणारे मॅसेजींग ऍप म्हणून व्हॉट्सअपला ओळखले जाते. आपल्याकडे व्हॉट्सअपला फारच मागनी आहे. सकाळी सुप्रभातचे मॅसेज टाकण्यापासून ते संध्याकाळी शुभरात्री टाकण्यापर्यंत आपली लोकं व्हॉट्सअपवरच असतात. परंतू व्हॉट्सअप सुद्धा आपल्या ग्राहकां प्रती प्रामाणिकता दाखवत असते. वेळोवेळी नविन फिचर्स आणुन ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न व्हॉट्सअप कडून केला जातो. याशिवाय सुरक्षेची सुद्धा हमी दिली जाते. त्यामुळे व्हॉट्सअपचे चाहते पुष्कळ आहेत. मात्र आता व्हॉट्सअपच्याच तोडीला तोड म्हणून जीबी व्हॉट्सअप (GB whatsapp) आलेलं आहे. पण नेमकं काय आहे हे जीबी व्हॉट्सअप? आणि व्हॉट्सअपेक्षा सुरक्षित आणि फायदेशीर आहे का? तर तेच आपण या लेखातून जाणुन घेणार आहोत. (Dangers Of Using GB WhatsApp)

नेमकं काय आहे जीबी व्हॉट्सअप?

जीबी व्हॉट्सअप (GB WhatsApp) हे व्हॉट्सअपसारखेच एक ऍप (app) आहे. ज्यावरुन आपण आपल्या मित्र मैत्रीणींशी गप्पा मारु शकतो. सुप्रभात, शुभरात्रीचे संदेश पाठवु शकतो. व्हिडिओ कॉल करु शकतो. सगळं काही व्हॉट्सपसारखचं, मात्र व्हॉट्सअप नाही. जीबी व्हॉट्सअप हे व्हॉट्सअपचे क्लोन ऍप आहे. म्हणजेच सोप्या भाषेत व्हॉट्सपचीच कॉपी असल्यासारखे आहे. पण व्हॉट्सअपेक्षा पुष्कळ वैशिष्ट्ये जीबी व्हॉट्सअपमध्ये आहेत. आम्ही तुम्हाला याठिकाणी जीबी व्हॉट्सअपची काही वैशिष्ट्ये सांगणार आहोत, जे व्हॉट्सअपपेक्षा जास्त फायदेशीर ठरु शकतात. मात्र जीबी व्हॉट्सअप हे अधिकृत ॲप नाही. साहजिकच यामुळे धोके देखील अधिक आहेत. आपण आज याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहेत.

मोठ्या फाईल पाठवता येतील

व्हॉट्सअप हे लोकप्रिय मॅसेजींग ऍप असल्यामुळे ऑफीस कामामध्ये सुद्धा याचा सर्वाधिक ऊपयोग होतो. परंतू व्हॉट्सअपच्या काही फिचर्समुळे ऑफीसच्या कामात अडचणी येतात. अशावेळी जीबी व्हॉट्सअप उपयोगी येऊ शकते. जसे की व्हॉट्सअपवर १६ एमबीपेक्षा मोठी फाईल पाठवता येत नाही. मात्र जीबी व्हॉट्सअपवर तुम्ही १०० एमबीपर्यंतची फाईल पाठवू शकता. त्यामुळे अशावेळी जीबी व्हॉट्सअपचा वापर करुन आपण आपली कामे सोपी करु शकतो.

डु नॉट डिस्टर्बचे वैशिष्ट्य

बर्‍याच वेळापासून तुमच्या फोनचे ईंटरनेट बंद असेल, आणि तुम्ही ईंटरनेट सुरु केले की अक्षरश: व्हॉट्सअप मॅसेजेसचा भडीमार होतो. पुष्कळ वेळापासून थांबलेले मॅसेजेस एकदम धडाधड पडायला लागतात. त्यामुळे सुरुवातीचे २ ते ४ मिनीट तुम्हाला त्यातच जाऊ द्यावी लागतात. अशावेळी मोबाईल लवकर हॅंग होण्याची सुद्धा शक्यता असते. मात्र जीबी व्हॉट्सअपमध्ये यावर एक वैशिष्ट्य आहे. ज्याचे नाव डु” नॉट डिस्टर्ब” आहे. डु नॉट डिस्टर्बचे वैशिष्ट्य वापरुन, तुम्हाला ईटरनेट सुरु असतांना होणार्‍या मॅसेजेसच्या त्रासापासून तुम्ही वाचू शकता. हे वैशिष्ट्य वापरल्यास ईंटरनेट सुरु असून देखील तुम्हाला काही काळ मॅसेज येणे बंद होतील.

स्टेटस डाऊनलोड करता येते

बर्‍याचदा जेव्हा आपण ईतरांचे व्हॉट्सअप स्टेटस बघत असतो, तेव्हा त्यातीलच एखादे स्टेटस आपल्याला खुपच आवडते. आपणही असे स्टेटस ठेवायला हवे असे आपल्याला वाटू लागते. त्यासाठी आपल्याला स्टेटस ठेवणार्‍यास मॅसेज करुन त्याच्याकडून ते मागवावे लागते. मात्र जीबी व्हॉट्सअपद्वारे तुम्ही ते स्टेटस थेट डाऊनलोड करु शकता. जीबी व्हॉट्सअप असल्यास स्टेटसमधील व्हिडिओ असो किंवा फोटो, तुम्ही काहीही डाऊनलोड करु शकता.

ऑनलाईनची स्थिती लपवा

आपले ईंटरनेट सुरु असल्यास आपण व्हॉट्सअपवर ऑनलाईन असल्याचे दिसतो. बर्‍याचदा काही रिकामे नातेवाईक आपल्यावर विनाकारण लक्ष ठेऊन असतात. जरा का रात्री ऊशिरा वगैरे ऑनलाईन दिसलो, की लगेच आपल्या आई-वडिलांपर्यंत दोन गोष्टी जास्तच पोहचवतात. त्यामुळे जीबी व्हॉट्सअप तुमच्यासाठी ऑनलाईन स्थिती लपवण्याचे फिचर घेऊन आले आहे. जीबी व्हॉट्सअपमधील हे फिचर वापरल्यास तुम्ही ऑनलाईन असून देखील ऑनलाईन दिसत नाही. याशिवाय जीबी व्हॉट्सअपच्या सहाय्याने टायपिंगची स्थिती सुद्धा लपवता येते.

डिलीट केलेले मॅसेज वाचता येतात

अनेकदा चॅंटींग करत असतांना आपल्याला आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण बोलतांना तिच्या किंवा त्यांच्या मनातलं बोलून जाते. आपल्याबद्दल काही वाईट विचार त्यांच्या मनात असले, तर अनावधानाने त्यांच्याकडून ते निघून जातात. मात्र त्यांना त्याची भनक लागताच ते लगेच मॅसेज डिलीट करतात. व्हॉट्सपवर एकदा डिलीट केलेले मॅसेज पुन्हा दिसत नाही. मात्र जीबी व्हॉट्सअपवर याउलट आहे. जीबी व्हॉट्सअपवर डिलीट केलेले मॅसेज सुद्धा तुम्ही पुन्हा पाहू शकता. जीबी व्हाट्सअपमध्ये या सर्व सुविधा मिळत असल्या तरी याचे धोके देखील मोठ्या प्रमाणात आहेत, आपण यावर देखील नजर टाकूया.

सुरक्षित आहे का जीबी व्हॉट्सअप?

जीबी व्हॉट्सअप मध्ये व्हॉट्सअपेक्षा अनेक चांगले फिचर्स आहेत. जे की ग्राहकांसाठी फायदेशीर सुद्धा आहेत. मात्र जीबी व्हॉट्सअपच्या सुरक्षिततेवर अद्यापही काही प्रश्न अनुत्तीर्णच आहेत. व्हॉट्सअप त्याच्या ग्राहकांसाठी सुरक्षेची हमी देतो. मात्र जीबी व्हॉट्सअप कुठलीही हमी देत नाही. व्हॉट्सअपप्रमाणे “एंड टु एंड एन्क्रिप्टेड” यामध्ये नसेल तर ग्राहकाचा खाजगी डेटा असुरक्षित असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. क्लोन आणि मोडेड ऍपच्या सुरक्षिततेची कुठलीही हमी नसते. अशाप्रकारचे ऍप वापरु नयेत, म्हणून व्हॉट्सअपने काही कठोर धोरणे सुद्धा अवलंबिली आहेत. गुगल प्ले स्टोअरवर हे ऍप सुचिबद्ध नसल्यामुळे सहसा डाऊनलोड करणे टाळावे असे जाणकारांचे मत आहे.

हे देखील वाचा Social media side effects: सोशल मीडियाचा वापरामुळे होतायत हे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार..

limbu Pani side effects: गरम पाण्यात लिंबू टाकून पीत असाल त्वरित थांबवा; अन्यथा आरोग्यावर होतील हे गंभीर परिणाम..

Health tips: उभा राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम वाचून बसेल धक्का; जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत..

Astrology 2022: तब्बल ५९ वर्षांनी जुळुन आलाय हा योग; या राशींना होणार हे जबरदस्त फायदे..

clean shave benefit: आठवड्यातून किती वेळा दाढी केली पाहिजे; जाणून घ्या clean shave करण्याचे फायदे..

Love addict Side effect: प्रेम रोगाचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; जाणून घ्या याची लक्षणं आणि उपाय..

Women’s views on sex: लैंगिक संबंधाचा आनंद घेताना महिलांचं देखील असतं हे मत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Who has Seen My Facebook Profile: या सोप्या पद्धतीने जाणून घ्या तुमची Facebook profile कोण-कोण पाहतंय..

ITBP Recruitment: बारावी पास उमेदवारांसाठी या सरकारी विभागात मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.