Astrology 2022: तब्बल ५९ वर्षांनी जुळुन आलाय हा योग; या राशींना होणार हे जबरदस्त फायदे..
Astrology 2022: आजच्या विज्ञानाच्या युगात सुद्धा ज्योतिषशास्त्राला एक विशीष्ट स्थान आहे. ज्योतिषशास्त्र (Astrology) हा कुठला चमत्कार नसून ग्रहांच्या बदलत्या स्थितीवरुन केला जाणारा अभ्यास आहे. ज्याप्रमाणे ग्रह आपली जागा बदलत जातात. मानवी आयुष्यात त्याचे बदल जाणवायला लागतात. याचे अनेक दाखले अनेक ज्योतिषांकडून देण्यात आले आहेत. याशिवाय अनेकांना ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्या जिवनात बदल बघायला मिळालाय. त्यामुळे बहुतांश लोकांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. ज्योतिषशास्त्र एकप्रकारचा अभ्यास आहे. ज्याच्या सहाय्याने अथवा त्याचा अभ्यास करुन काही गृहितकं किंवा अंदाज बांधले जाऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह एका राशितून दुसर्या राशीत प्रवेश करतात. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जिवनमानावर होतो.
ज्योतिषशास्त्रातील काही तज्ज्ञ व्यक्तींकडून नुकतेच काही भाकीतं वर्तवण्यात आली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या महिन्याच्या शेवटाला राजयोग जुळुन येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना याचा प्रचंड फायदा या राजयोगादरम्यान होऊ शकतो. त्यामुळे कुठलेही महत्वाचे काम असल्यास किंवा नोकरी शोधणे वगैरे किंवा लग्नासाठी योग्य मुलगी मिळत नसेल, सतत आजारी पडत असाल अशा कुठल्याही समस्या असल्यास यादरम्यान या विशीष्ट राशींच्या लोकांना यांपासून सुटका मिळु शकते. तसेच अचानक धनलाभ झाल्यामुळे सर्व समस्या नाहीशा होऊन सर्व मनोकामना पूर्ण होण्याच्या शक्यता बळावणार आहे. २४ सप्टेंबरला शुक्राचे संक्रमण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे तब्बल ५९ वर्षांनंतर एक दुर्बल असा राजयोग जुळुन येणार आहे. जो अनेकांच्या जिवनात आनंद भरुन जाऊ शकतो.
शुक्राचे संक्रमण होत असल्यामुळे विविध प्रकारचे पाच राजयोग निर्माण होणार आहे. हे राजयोग विविध राशींवर प्रभाव टाकण्यासोबतच ५ विशीष्ट राशींवर यांचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. बुधादित्य राजयोग, नीचभंग राजयोग, भद्र राजयोग आणि हंस राजयोग असे या राजयोगांचे नावे आहेत. यापैकी नीचभंग राजयोग दोन प्रकारांमध्ये तयार होणार आहे. तब्बल ५९ वर्षांनी हा क्षण येत असल्यामुळे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणार्यांमध्ये प्रचंड ऊत्सुकता आहे. पाच राशिंसाठी हे राजयोग म्हणजे एकप्रकारे नशिबाचा दरवाजाच ऊघडा करणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जोतिषशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी सांगितलेल्या या पाच राशि कोणत्या आहेत? तुमची रास या पाचपैकी आहे का? आणि असल्यास तुम्हाला या राजयोगांचा नक्की काय फायदा होणार आहे? या सगळ्यांबद्दल सविस्तर जाणुन घेऊया.
*वृषभ*
वृषभ राशिंच्या लोकांसाठी हा राजयोग प्रचंड लाभदायी ठरणार आहे. अचानक आर्थिक आवक वाढीस लागेल. त्यामुळे तुमची थांबलेली सगळी कामे तुम्ही पटापट निकाली लाऊ शकता. विशेषत: या राशिच्या व्यवसायिकांसाठी हा काळ ऊत्तम ठरणार आहे. ज्योतिषांच्या मते यावेळी शनिदेव भाग्यस्थानी विराजमान असल्यामुळे पेट्रोलियम पदार्थ आणि लोखंडाशी संबंधीत व्यवसायांना प्रचंड भरभराटी येणार आहे. त्यामुळे या व्यवसायिकांना प्रचंड नफा कमावण्याची ही संधी आहे. वृषभ राशिचा स्वमी शुक्र १८ ऑक्टोंबरपर्यंत नीच स्थितीत आहे व याचदरम्यान गुरु लाभस्थानी असल्यामुळे आर्थिक आवक चांगली राहणार आहे. तसेच यादरम्यान पोटाचे विकार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
*मिथुन*
लग्नासाठी जिवनसाथी शोधताय आणि योग्य जोडीदार मिळत नाहीते, तर आता चिंता नको. तुमचे नशिब बदलण्याची वेळ आली आहे. मिथुन राशीच्या संक्रमण कुंडलीच्या मध्यभागी हंस नावाचा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे यादरम्यान योग्य जोडीदारासह त्याच्याकडूनच तुम्हाला संपत्ती लाभ होण्याची शक्यता सुद्धा सर्वाधिक आहे. यासोबतच करीयर व व्यवसायासंबंधीत सर्व समस्या तुमच्या यादरम्यान नाहीशा होणार आहेत. शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधीत लोकांना अचानक आंनदाची बातमी मिळु शकतो. दोनही क्षेत्रातील मिथुन राशिच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली असा हा काळ आहे. शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे आणि प्रतिष्ठेचे पद मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. राशिच्या केंद्रस्थानी तीन शुभग्रह असल्यामुळे यादरम्यान कुठलिही रिस्क घेण्यास हरकत नाही. कारण यादरम्यान तुमचे नशिबही तुमची साथ देणार आहे.
*कन्या*
चित्रपट आणि माध्यम क्षेत्राशी जुळलेल्या कन्या राशिंच्या लोकांसाठी हा सुवर्णकाळ ठरण्याची शक्यता आहे. अगोदर राहिलेली सर्व कामे मार्गी लागून नवे काम तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह ऊच्च स्थितीत आहे. त्यामुळे व्यवसायात सुद्धा वेगाने प्रगती होणार आहे. तसेच भाग्य आणि संपत्तीचा स्वामी शुक्र ग्रह नीच भंग राजयोग तयार करतो आहे. त्यामुळे भाग्य ऊजळण्याची व अचानक धनलाभ होण्याची शक्यता जास्त आहे. कन्या राशिंच्या लोकांची रखडलेली सर्व कामे यादरम्यान पूर्ण होऊ शकतात. केवळ स्वत:हून थोडी मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे कठिणातले कठिण आणि दीर्घकाळ थांबलेले काम सुद्धा यादरम्यान मार्गी लागु शकतात. याशिवाय नशिबाची साथ तर तुम्हाला असणारचं आहे.
*धनु*
व्यावसायिक असणार्या धनु राशिंच्या लोकांसाठी हा काळ प्रचंड फायदेशीर आहे. व्यवसायात लाभ होण्यासोबतच संपत्तीत मोठ्याप्रमाणात वाढ होणार असल्याचा हा काळ असणार, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे व्यावसायिक असणार्या मिथुन राशिच्या लोकांनी यादरम्यान सर्व तन-मन- धनाने आपल्या व्यवसायात लक्ष देण्याची गरज आहे. या राशिच्या संक्रमण कुंडलीत भद्रा, नीचभंग आणि हंस राजयोग तयार होतो आहे. व्यवसायासाठी हे फार अनुकुल आहे. यादरम्यान आलेले कुठलेच काम टाळू नका. नविन करार केल्यास भविष्यासाठी दीर्घकाळ फायदेशीर ठरु शकणार आहे. या काळात तुम्ही केलेला व्यावसायिक प्रवास सुद्धा तुम्हाला पुष्कळ लाभ मिळवुन देऊ शकतो.
*मीन*
नोकरी मिळत नसेल किंवा तेच ते काम करुन कंटाळा आला असेल तर हा काळ मीन राशिंच्या लोकांसाठी आनंददायी ठरणार आहे. यादरम्यान तुमची नोकरीची समस्या कायमची नाहीशी होणार असल्याची शक्यता आहे. या राशीच्या संक्रमण कुंडलीत शनिदेव लाभदायक स्थितीत विराजमान आहे. त्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय नोकरीत पदोन्नती, पगारामध्ये वाढ या काळात होऊ शकते. जर तुम्ही नविन व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ ऊत्तम आहे. तसेच जर तुम्ही व्यवसायिक असाल आणि काही ही न करता तुम्हाला एखादी ऑर्डर समोरुन चालून येत असेल, तर नाकारु नका, कारण ही ऑर्डर तुम्हाला दीर्घकाळ लाभदायी ठरु शकते.
हे देखील वाचा clean shave benefit: आठवड्यातून किती वेळा दाढी केली पाहिजे; जाणून घ्या clean shave करण्याचे फायदे..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम