ITBP Recruitment: बारावी पास उमेदवारांसाठी या सरकारी विभागात मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
ITBP Recruitment: आज अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. कारण आजकालच्या परिस्थितीनुसार नोकरी मिळवणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. बरेच युवक आज बेरोजगार आहेत. ज्या लोकांच्या नोकऱ्या कोरोना महामारीच्या दरम्यान गेल्या आहेत, अशा लोकांना अद्याप नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. ऊच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळवण्यात तरुणांना समस्या येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवक नैराश्याच्या गर्तेत अडकत चालले आहेत. तरुणांना आता जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. ज्यांना नोकरी मिळाली नाही, असे तरूण तर चिंताग्रस्त आहेतच, परंतु त्यांच्या घरचे देखील चिंतीत असल्याचे पाहायला मिळते.
पदवीऐवजी सध्या कौशल्य असणाऱ्या लोकांना मागणी वाढली आहे. त्यामुळे कौशल्ये आत्मसात करण्याकडे युवकांचा कल असायला हवा. नवीन काही कौशल्य आपल्याला मिळवता येईल का? याचा विचार केला पाहिले. परंतू ग्रामिण भागातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मुलांमध्ये शिकण्याची ओढ असली तरी ते मार्गदर्शना अभावी अनेकदा संधी असताना देखील तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. सरकारी नोकरीकडे स्थिर नोकरी म्हणून बघितले जाते. परंतू वाढत्या स्पर्धेमुळे तिथे सुद्धा सगळ्यांना यश येत नाही. परिणामी मुले नैराश्यातून आत्महत्यांसारखी टोकाची पाऊलेसुद्धा उचलतात. कारण त्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असल्यामुळे आणि भरती देखील मोठ्या प्रमाणात सध्या नसतात.
ग्रामीण भागातील बहुतांश युवक अगोदरच हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असतात. बऱ्याच तरुणांना शिक्षण घेण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो, आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. शिक्षण घेतांना होणार्या खर्चामुळे त्यांची दमछाक होते. त्यामुळे शिक्षण संपताच नोकरी मिळावी, अशा कोर्सेसना त्यांचेकडून प्राधान्य देण्यात येत आहे. परंतू ग्रामिण भागात माहितीचा प्रचंड अभाव असतो. त्यामुळे पाहिजे ती माहिती युवकांपर्यंत पोहचतच नाही, तर बर्याचवेळा माहिती पोहचेपर्यंत ऊशिर झालेला असतो. शिक्षण घेऊनसुद्धा नोकरीसाठी कष्ट घ्यावे लागत असल्यामुळे ऊच्च शिक्षणाबाबत एक अनास्था मुलांमध्ये बघायला मिळते आहे.
जर तुम्हालापण केवळ बारावीच्या जोरावरच नोकरी मिळवू इच्छित असाल व योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची तुम्हाला गरज असेल तर तुम्ही आता योग्यठिकाणी आहात. या लेखात आपण जाणुन घेणार आहोत बारावीनंतर असणार्या नोकरीच्या संधीबाबत. आपल्याला सरकारी नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यात आता राज्य शासन किंवा केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात भरती काढत नाहीत. पण आता एक मोठी संधी तुम्हाला मिळत आहे. ईंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये नोकरी (ITBP Recruitment) करण्याची सुवर्णसंधी आहे. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे या पदासाठी तुम्हाला पगारसुद्धा पुष्कळ मिळणार आहे. त्यात ही परीक्षा बारावी पास उमेदवारांसाठी आहे. त्यामुळे बारावी पास उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (Indo-Tibet Border Police) ही चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सीमेसाठी भारताची प्राथमिक सीमा गस्त संस्था आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस हे भारताच्या सात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक होय. या दलाची स्थापना 1962 मध्ये झाली. भारत आणि चीनच्या युद्धानंतर या दलाची स्थापन करण्यात आली आहे.
आता आपण या भरती साठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊ. http://recruitment.itb.police.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. तसेच आपण निवड प्रक्रिया जाणून घेऊ.
वरील पदासाठी शारिरीक कार्यक्षमता फार महत्वाची आहे. कारण निवडीच्या प्रक्रियेत शारिरीक चाचणीला केंद्रित करण्यात आले आहे. शारिरीक कार्यक्षमता चाचणी, शारिरीक मानक चाचणी, लेखी परिक्षा, कागदपत्रे पडताळणी, कौशल्य चाचणी, वैद्यकीय परिक्षा पुनरावलोकन या बाबींचा निवड प्रक्रियेत सहभाग असणार आहे.
पदसंख्या आणि माहिती: भरती प्रक्रियेअंतर्गत आकरा अनारक्षित पदे आहेत. अनुसुचीत जातीसाठी (SC) केवळ एकच पद आरक्षित आहे. तसेच दोन पदे अनुसुचीत जामातीसाठी (ST) आणि दोन मागासवर्गीयांसाठी (OBC) आणि दोन पदे EWS पदासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
अर्ज करण्यास पात्रता: अर्ज करणार्या ऊमेदवारासाठी वयाचे बंधन ठेवण्यात आलेले आहे. अर्ज करणार्या ऊमेदवाराचे वय किमान २१ वर्षे असावे. तसेच या पदासाठीची वयोमर्यादा ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. वरील पदासाठी कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डातुन बारावीची परिक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. यासोबतच जनरल नर्सींग आणि मिडवाईफरीची परिक्षासुद्धा ऊत्तीर्ण केलेली असावी. या भर्तीची विशेषता ही आहे की, महिला ऊमेदवार, माजी सैनिक तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील ऊमेदवारांसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. सर्वसाधारण गटातील ऊमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
पगार: या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 35400 रुपये ते 1,12,400 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.
Job: नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे; जाणुन घ्या कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी..
Women Sex Life: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम