brain tumor: ही लक्षणे जाणवत असतील, तर असू शकतो ‘ब्रेन ट्युमर’; जाणून घ्या या आजाराविषयी सर्वकाही..
brain tumor: मेंदु हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. संपूर्ण शरीराला सुरळीतपणे कार्यरत ठेवण्यासाठी मेंदु शरीराच्या विविध भागांना सुचना देत असतो. त्यामुळे मेंदुसंबंद्धीत कुठलाही आजार थेट मृत्युचे कारण ठरु शकते. ब्रेन ट्युमर हा असाच एक गंभीर आजार आहे. ज्याचे वेळेवर निदान न झाल्यास मृत्युसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे ब्रेन ट्युमरसंबंद्धीत काही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांना जवळ करुन सल्ला घेणे जरुरी आहे.
मेंदुमध्ये काही असामान्य कोषीका वाढल्यास ट्युमरची समस्या निर्माण होते. या कोषीका मेंदुला होणार्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण करतात. मेंदुला सुरळीत रक्तपुरवठा न झाल्यास त्याचा परिणाम शरीराच्या विविध भागांवर होऊन काही लक्षणे जाणवायला लागतात. सुरुवातीला सामान्य वाटणारी ही लक्षणं हळूहळू गंभीर स्वरुप धारण करतात. त्यामुळे ब्रेन ट्युमरचे वेळेवर निदान होणे जरुरी आहे. अन्यथा ट्युमर मृत्युचे कारणसुद्धा ठरु शकते. ब्रेन ट्युमरसंबंद्धीत लक्षणे लगेच ओळखुन त्यावर ऊपचार करणे सोयीचे जावे म्हणूनच याठिकाणी ट्युमरसबंद्धीत लक्षणांवर या लेखात सविस्तर चर्चा केली गेली आहे.
काय आहे ट्युमरचे कारण
आज सर्वत्र स्पर्धेचे आणि धावपळीचे युग आहे. त्यामुळे संपूर्ण जिवनशैलीच बदलुन गेली आहे. आहारामध्ये प्रथीनांचा समावेश कमी झालाय. तसेच जंक फुड आणि वाढती व्यसनाधीनता हे अनेक आजारांना आमंत्रीत करण्याचे कारण आहे. परिणामी रोगप्रतिकारकशक्ती कमी होते आहे. धावपळीच्या या जगात तणावसुद्धा पुष्कळ वाढला आहे. ताण-तणाव जास्त झाल्याससुद्धा ट्युमरसारखा गंभीर आजार ऊद्भवु शकतो. याबरोबरच अलीकडच्या एका संशोधनातून मोबाईलचा सतत वापर केल्यामुळे देखील हा आजार उद्भवत असल्याची माहिती आहे.
वारंवार डोके दुखणे
डोके दुखणे याकडे कधीच आपण गंभीरतेने बघत नाही. बर्याचदा साधारण ताप किंवा सर्दी-खोकला असल्यास डोके दुखते. व्हायरल किंवा ऍसीडीटीमुळेसुद्धा डोके दुखते. त्यामुळे डोके दुखणे यांस आपण सहजतेने घेतो. मात्र वारंवार तीव्र डोके दुखत असल्यास वेळीच सावध होणे जरुरी असते. मेंदुला सुरळीत रक्त पुरवठा न झाल्यामुळे आणि ट्युमरचा मेंदुतील आकार वाढत गेल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ट्युमरमुळे सुरुवातीला हलक्या स्वरुपाचे दुखणे सुरु होते. मात्र जसा जसा ट्युमरचा आकार वाढत जातो तसे तीव्र डोके दुखते. त्यामुळे डोकेदुखीला सहजतेने घेण्याऐवजी वेळीच सावधानता बाळगत डॉक्टरांचा सल्ला घेणे ट्युमरसारख्या गंभीर आजारापासून वाचवु शकते.
सारखं चक्कर आल्यासारखं वाटणे
एखाद्यावेळेला पुष्कळ कामं झालीत आणि प्रचंड थकवा आल्यास चक्कर आल्यासारखे वाटते. बीपी आणि शुगरच्या रुग्णांसाठी तर चक्कर आल्यासारखे वाटणे साहजिक झालेले असते, कारण बर्याचदा शरीरातले संतुलन कमी-जास्त झाल्यास असे होते. मात्र वारंवार चक्कर आल्यासारखे वाटणे हे ट्युमरचे लक्षण असु शकते. मेंदुमध्ये वाढलेल्या असामान्य कोशिकांमुळे रक्तपुरवठ्यात अडथळा होतो. परिणामी चक्कर आल्यासारखे वाटते किंवा शरीरावरीलल संतुलन बिघडल्यासारखे जाणवते. त्यामुळे वारंवार चक्कर आल्यासारखे वाटत असल्यास डॉक्टरांना जवळ करणे फायदेशीर ठरु शकते.
परिवारातील ईतर सदस्यांना असल्यास दुसर्यांनासुद्धा होऊ शकतो
‘ब्रेन ट्युमर’ तसा जेनेटीक आजार नाही. परंतू परिवारातील मागील पिढीतील एखाद्या सदस्यास असल्यास, तो पुढील पिढीतील सदस्यांस होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यावर काही प्रमाणात मतभेद असले, तरी तज्ज्ञ या भूमिकेच्या समर्थनात असल्याचे बघायला मिळते. साहजिकच यामुळे तुम्ही या आजाराकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. अनेकजण हा आजार झाल्यानंतर प्रचंड घाबरतात मात्र घाबरण्यासारख काहीही नाही. योग्य वेळी यावर इलाज झाला, तर तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.
हे देखील वाचा Best Partner Tips: योग्य जिवनसाथी निवडताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी अन्यथा..
Motorola: 200MP कॅमेरा असणारा Motorola चा हा स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.