Reliance AGM 2022 Update: रिलायन्स ‘या’ तारखेपासून देणार 5G सर्व्हिस, या ठिकाणांहून होणार सुरुवात..

Reliance AGM 2022 Update: रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजच्या ४५ वी वार्षिक बैठकीला सुरूवात झाली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लि. च्या 45 व्या AGM (Reliance AGM 2022) मध्ये मोठी मोठी घोषणा आहे. येत्या दिवाळीपर्यंत Reliance Jio 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. परंतु सुरुवातीला मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि अन्य महानगरांमध्ये 5G सेवा देण्यात येणार आहे. परंतु डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गावात Jio 5G पोहोचवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. Jio 5G साठी Reliance कंपनी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक बैठकीस संबोधित करत असताना मुकेश अंबानी म्हणाले, आम्ही स्वदेशी तंत्रज्ञानासह एंड-टू-एंड 5G पायाभूत सुविधा विकसित केली आहे, जी पूर्णपणे क्लाउड आधारित आहे. हे तंत्रज्ञान आमच्या 2,000 हून अधिक तरुण जिओ अभियंत्यांनी पूर्णपणे इन-हाउस विकसित केले आहे, असे मुकेश अंबानी म्हणाले. तसेच येत्या नोव्हेंबरपर्यंत रिलायन्स कंपनी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई महानगरांसह अनेक मोठ्या शहरांमध्ये Jio 5G सेवा पोहोचवणार असल्याचा कंपनीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लि. च्या बैठकीच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंड भरून कौतुक केले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी रिलायन्स सर्वोत्तम योगदान देण्यास तयार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात ज्या काही सेवांबाबत बोलले होते, त्या निश्चितपणे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवतील. तसेच Reliance (रिलायन्स) देशाच्या प्रगतीत पूर्वीपेक्षा अधिक योगदान देईल. हेही वाचा: Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

पुढे बोलत असताना मुकेश अंबानी म्हणाले, आपली कंपनी वार्षिक महसूल 100 अब्ज डॉलर पेक्षा अधिक महसूल देणारी देशातील एकमेव कंपनी आहे. रिलायन्सचा (Reliance) महसूल (Tax) 47% वाढून 104.6 अब्ज डॉलर एवढा झाला. रिलायन्सने (Reliance) रोजगार निर्मितीमध्ये नवा विक्रम रचला आहे. तब्बल २.३२ लाख नोकऱ्या रिलायन्सने दिल्या आहेत. मुकेश अंबानी म्हणाले, रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वात मोठ्या नोकरदारांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष 2022 (Financial Year) मध्ये, रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी कर देणारी कंपनी आहे. कंपनीने देशाच्या तिजोरीत रु. 188,000 कोटी एवढे योगदान दिले. हेही वाचा: Health Tips: शारीरिक संबंधामध्ये खंड पडल्यास मानसिकतेवर आणि शरीरावरही होतात हे गंभीर परिणाम..

रिलायन्स इंडस्ट्रीच लिमिटेडची ही वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना काळात व्हिडिओ कॉन्फरर्सिंगद्वारे (Video Conferencing) सलग तिसऱ्या वर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) आयोजित केली जात आहे. ही वार्षिक सर्वसाधारण सभा पाच सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जात आहे. तुम्ही जिओ मीट (Jio Meet) या ॲपवर मीटिंग लाईव्ह पाहू शकता. असेच यूट्यूब (YouTube) किंवा फ्लेम्स ऑफ ट्रुथवरदेखील तुम्ही ही मीटिंग पाहू शकता. जर तुम्हाला फेसबुकवर मीटिंग पहायची असेल तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स जिओच्या पेजवरदेखील तुम्ही पाहू शकता.

हेही वाचा: Honda CB Shine: कमी किंमतीत आता युनिकॉर्नचा फील! कंपनीचे CB Shine च्या लूकमध्ये केले जबरदस्त बदल; जाणून घ्या सर्व डिटेल्स.. 

drinking injurious to health: दारू पित असाल आणि ही लक्षणं जाणवल्यास समजून जा लिव्हरचा होत आहे खराब.. 

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम.. 

Viral Video: रस्त्यावर बिबट्या गाईची शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा उडेल थरकाप.. 

Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.