Honda CB Shine: कमी किंमतीत आता युनिकॉर्नचा फील! कंपनीचे CB Shine च्या लूकमध्ये केले जबरदस्त बदल; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Honda CB Shine: होंडा कंपनीच्या सीबी शाईन या गाडीने भारतामध्ये विक्रमी विक्री केली. अक्षरशः या गाडीने तरुणाईंना वेड लावल्याचे पाहायला मिळाले. जर तुम्ही देखील या गाडीचे चाहते असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. Honda कंपनीचे CB Shine ला आणखीन मॉडीफाय करण्यात आले आहे. CB Shine गाडीचे नवे सेलिब्रेशन एडिशन लॉन्च करण्यात आले आहे. CB Shine या गाडीमध्ये काय बदल करण्यात आले आहेत? नवीन व्हेरिएंटची किंमत किती असणार आहे, जाणून घेऊया या विषयी सविस्तर.

Honda ने CB Shine मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कंपनी आपल्या या बाईकच्या लुकमध्ये बदल करण्याचा विचार करत होती. शाईन ही बाईक नव्या वेरियंटमध्ये ग्राहकांच्या भेटीला आणले असून, 125cc मोटरसायकलच्या नवीन व्हेरियंटची किंमत आता 78 हजार रुपयांपासून सुरू होणार आहे. डिस्क ब्रेक असणाऱ्या बाईची किंमत याच्याहून जास्त असणार आहे. गेल्या काही वर्षात कंपनीने शाईन या गाडीचा लुक मध्ये सातत्याने बदल केला आहे.

गेल्या काही वर्षात कंपनीने शाईन बाईकच्या लुक मध्ये बदल केल्यानंतर नवीन मध्ये येणाऱ्या गाडी ग्राहकांच्या फारशी पसंतीस उतरली नव्हती. आता पुन्हा एकदा कंपनीने आपली लोकप्रिय गाडी नव्या अवतारात उतरवत असल्याने, याची जोरदार चर्चा आहे. शाईन आपल्या ग्राहकांच्या भेटीला दोन नव्या कलरमध्ये येत आहे. मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक त्याचबरोबर मॅट संगरिया रेड मेटॅलिक या दोन कलरचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

नव्या रुपात ग्राहकांच्या भेटीस येणाऱ्या या बाईकच्या लूक आणि कलर विषयी अधिक खोलात जायचं झाल्यास, या बाईची थीम ही गोल्डन कलरमध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मॅट फिनिशचा टच देखील देण्यात आला आहे. नवीन व्हेरियंटमध्ये अनेक आकर्षक ग्राफिक्स देखील ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. गाडीच्या टाकीवर गोल्डन कलरचा विंग मार्क चीन्हांसोबत ठेवण्यात आला आहे. नवीन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना गाडीचा लोगो देखील नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गाडीच्या सीटला देखील तपकिरी रंग देण्यात आला आहे.

इंजिनमध्ये बदल:

आपल्या नवीन सीबी शाईनच्या लुक आणि कलरमध्ये बदल केला असला तरी इंजिनमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. शाईनचे इंजीन हे 123.94 CC चेच ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर हे गाडीचे गिअर देखील फोर स्ट्रोक असणार आहे. मात्र हे इंजिन एअर कूल्ड देण्यात आले आहे.

ट्यूबलेस टायर/एलॉय व्हील 

पुढे ब्रेकिंगकरिता 130 मिलोमिटर ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. त्याचबरोबर पाठीमागे दिले गेलेल्या ड्रम ब्रेक बाजूस देखील याच प्रकारचे ब्रेक आहेत. डिस्क ब्रेक असणाऱ्या शाईन गाडीला पुढच्या बाजूस 240 डिस्क ब्रेक मिळतो. या गाडीला पुढील आणि पाठीमागील बाजूस 80/100/18 चे टायर देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने होंडा Activa चे देखील नवीन व्हेरियंट ग्राहकांच्या भेटीस आणले होते.

हे देखील वाचा drinking injurious to health: दारू पित असाल आणि ही लक्षणं जाणवल्यास समजून जा लिव्हर होत चाललंय खराब..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Helath: हे 5 पदार्थ जे पुन्हा गरम करुन खायचे नाहीत? नाहीतर होतील हे गंभीर परिणाम

Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.