Mongoose and Cobra: मुंगूस आणि कोब्राची झुंज पाहून होईल काळजाचं पाणी पाणी; कोण जिंकतं पाहा तुम्हीचं…
Mongoose and Cobra: सोशल मीडिया (social media) हे वायरल व्हिडिओंचा (viral video) व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर दररोज लाखों व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेकांचा सोशल मीडियावर वापर वाढल्याने या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळत आहे. खासकरून प्राण्यासंदर्भातले नवनवीन व्हिडिओ अनेक जण पाहतात. सिंह, वाघ, मगर, चित्ता, या हिंस्र प्राण्यांबरोबर अनेकांना मुंगूस आणि सापाची लढाई पाहणं देखील आवडत असतं. या प्राण्यांच्या लाईफस्टाईल (lifestyle) विषयी जाणून घेण्याची अनेकांमध्ये उत्सुकता असते. आणि म्हणून आम्ही देखील मुंगूस Mongoose आणि सापाच्या (cobra) लढाईचा सोशल मीडियावर तुफान वायरस झालेला व्हिडिओ घेऊन आहोत.
साप आणि मुंगस हे कायम एकमेकांचे शत्रू राहिले आहेत. दोघांनीही एकमेकांना पाहिलं, तर दोघांच्याही संतापाचा पारा चढतो. बहुतेकदा साप आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो. तर दुसरीकडे मुंगूस मात्र कोणत्याही परिस्थितीत सापाला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करतं. सापाच्या आणि मुंगासाच्या लढाई नेहमी मुंगूस जिंकल्याचे पाहायला मिळते. मात्र कधीकधी शेराला सव्वाशेर देखील मिळतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत देखील असंच काहीस चित्र पाहायला मिळत आहे.
काय घडलं नेमकं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एकमेकांचे कट्टर दुश्मन समजले जाणारे, मुंगूस आणि सापाची लढाई चांगलीच वायरल झाली आहे. लढाई पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ जवळपास दोन मिनिटांचा असून, हा व्हिडिओ पाहताना या दोघांच्या लढाईत नक्की कोण जिंकणार? याची उत्सुकता लागून राहते. सुरुवातीला कोब्रा मुंगसावर हल्ला करतो. कोब्राने आपल्या भल्या मोठ्या पाण्याने मुंगसावर केलेला वार पाहून काळजात धस्स होतं.
कोब्राने केलेला जबरदस्त वार मुंगूस मोठ्या चपळाईने वाचवते. कोब्राच्या आक्रमकपणापासून मुंगूस प्रचंड घाबरल्याचे देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मुंगूस घाबरून पुढे पळताना देखील पाहायला मिळत आहे. मात्र कोब्रा हार न मानता मुंगसाचा पाठलाग करताना देखील पाहायला मिळत आहे. कदाचित टप्प्यात आल्यावर शिकार करायची असते, हे मुंगसाला माहित असावं, याप्रमाणे मुंगूस देखील शांत डोक्याने कोब्र्याचा खेळ पाहत असल्यास दिसतं. कोब्राभोवती गोल गोल फिरल्यानंतर, मुंगूस अचानक कोब्रावर ह ल्ला करतं.
मुंगसाच्या या हल्ल्यात कोब्रा स्वतःला वाचवू शकत नाही. मुंगसाने हल्ला केल्यानंतर कोब्रा काही वेळ प्रतिकार करतो, मात्र मुंगसाच्या तावडीतून त्याला सुटणे अशक्य होतं. मुंगसाच्या हल्ल्याने आता आपला कार्यक्रम झाला आहे, हे कोब्राच्या लक्षात आल्यानंतर, कोब्रा देखील आपली हार मानतो. आणि काही वेळाने मुंगूस कोब्राला ठार करून आपल्या गुहेत घेऊन जाताना पाहायला मिळते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत नऊ कोटी दोन लाख लोकांनी पहिलं आहे. वास्तविक पाहता हा व्हिडिओ जुनाच आहे, मात्र नव्याने व्हायरल झाला आहे.
हे देखील वाचा Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..
Ration Card: नवीन रेशन कार्डसाठी असा करा online, ऑफलाईन अर्ज; दहा दिवसांत रेशन कार्ड मिळेल घरपोच..
Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..
Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.