Geological Survey of India Recruitment: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या डिटेल्स..
Geological Survey of India Recruitment: बेरोजगारीच्या दुनियेत नोकरी मिळवणे खूप मोठे आव्हान आहे. त्यातल्या त्यात सरकारी नोकरी हे तर जवळपास अशक्य झालं आहे. कारण सरकार नोकर भरती करताना दिसत नाही. त्यात एखादी नोकर भरती निघालीच, तर शंभर दोनशे जागा निघतात. आणि या जागांसाठी लाखों अर्ज येतात. साहजिक यामुळे बेरोजगारीचा आकडा वाढला आहे. मात्र आता काही जागांसाठी भारत सरकार खान मंत्रालय अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यात येत आहेत. जाणून घेऊया या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर.
अनेकांना उच्च शिक्षण घेणं परवडत नसल्याने, अनेक जण दहावी बारावीनंतरच चार पैशाची नोकरी शोधताना पाहायला मिळतात. उच्च शिक्षण घेऊन आता चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, याची देखील काही शाश्वती राहिली नसल्याने, अनेक जण उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष देखील करत असल्याचं दिसतं. दहावी झाल्यानंतर, अनेक जण जॉबच्या शोधात असतात. आता तुम्ही देखील दहावीनंतर जॉबच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.
भारत सरकार खान मंत्रालयांतर्गत GSI ने ड्रायव्हर या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. विशेष म्हणजे, उमेदवाराची निवड लेखी आणि कौशल्य चाचणीनुसार करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 ठेवण्यात आलेली आहे. किती जागांसाठी भरती केली जाणार आहे? शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
रिक्त जागांचा तपशील
भारत सरकार खान मंत्रालय अंतर्गत रिक्त जागांच्या तपशीला विषयी जाणून घ्यायचं झाल्यास या भरती प्रक्रियेत एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये ओपनच्या दहा, त्याचबरोबर ओबीसीच्या चार, आणि एससी प्रवर्गातील दोन जागा भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एसटी एक, आणि EWS प्रवर्गातील एक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा आणि पगार
या भरती अंतर्गत रिक्त जागांच्या होणाऱ्या भरतीसाठी वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांचे वय 25 वर्षापेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे. त्याबरोबरच ज्या जागा राखीव प्रवर्गामधील आहेत, अशा उमेदवारांना नियमानुसार अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे. आपण या भरतीसाठी निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांना पगार किती मिळणार? हे देखील जाणून घेऊ. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १९ हजार नऊशे ते ६२ हजार दोनशे इतका पगार मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवारांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातमधून उमेदवारांनी मॅट्रिक म्हणजेच, दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे हलके आणि जड वाहनाचे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतमध्ये किमान तीन वर्षे हलकी आणि जड वाहने चालवली असणे, आवश्यक असल्याचं अधिसूचनेत म्हटले आहे.
निवड प्रक्रिया:
या भरती प्रक्रियेत सहभागी घेणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा त्याचबरोबर कौशल्य परीक्षेमधून केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 12 सप्टेंबर देण्यात आली आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि अधिसूचना पाहण्यासाठी उमेदवारांनी यावर क्लिक करा.
हे देखील वाचा Proprietary Rights: हे सात पुरावे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असता..
अतिक्रमण: जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची ही आहे योग्य प्रक्रिया..
Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..
Astrological sign: मुलींसाठी या राशीचे लोकं असतात खूपच रॉयल; प्रत्येक गोष्ट ठेवतात हृदयात जपून..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.