Swastika Sign: मुख्य प्रवेशद्वार, लग्न, महत्त्वाच्या समारंभात स्वस्तिक का काढले जाते? जाणून तुम्हालाही बसेल धक्का..
Swastika Sign: अनेकांचा कर्मावर विश्वास असला तरी, हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार, (vastu Shastra)आयुष्य जगणाऱ्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अनेक महत्त्वाची कामे करायची असतील, तर अनेकजण ज्योतिषशास्त्राचा सहारा घेतात. नवीन घर बांधायचं असेल, लग्न करायचं असेल, अगदी जमीन खरेदी कऱ्यची असेल, तरी देखील अनेकजण ज्योतिष शास्त्राचाच सहारा घेतात. हिंदू धर्मामध्ये काही गोष्टींना खूप महत्व दिले जाते. त्यापैकीच एक म्हणजे, स्वस्तिक. हिंदू धर्मात स्वस्तिकाला खूप महत्व आहे. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मात्र कोणत्याही महत्वाच्या कार्यक्रमात स्वस्तिक का काढलं जातं? स्वस्तिकमुळे काय फायदे होतात? हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. Vastu Shastra: या दिशेला भिंतीवरचे घड्याळ लावल्यास तुमची वेळ होईल सुरू; जाणून घ्या या मागचे शास्त्र..
अनेकांना प्रश्न पडला असेल, घराच्या चौकटीवर किंवा चौकटीच्यावर तसेच महत्वाच्या समारंभात स्वस्तिक का काढले जाते? तर स्वस्तिकाला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं, त्याचबरोबर समाधान आणि आनंद, समृद्धी वाढवण्याचे काम स्वस्तिक करत असल्याचं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटले आहे. साहजिक यामुळे कोणत्याही प्रकारचे चांगले काम किवा महत्वाचा कार्यक्रम करण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. आता आपण एखाद्या शुभकार्यात किंवा सणासुदीमध्ये स्वस्तिक का काढलं जातं? त्याचे काय-काय फायदे होतात? हे देखील सविस्तर जाणून घेणार आहोत. Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..
स्वस्तिकला चारच बाजू का असतात?
‘स्वस्तिक’ला चारच बाजू असतात, हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र स्वस्तिकला चारच बाजू का असतात, हा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? साहजिकच तुमचे उत्तर असेल नाही. मात्र ‘स्वस्तिक’ला चार बाजू असण्याला देखील कारण आहे. चार बाजू निसर्गाच्या चारही दिशांचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणून ‘स्वस्तिक’ ला चार बाजू असतात. स्वस्तिक हे तीन अक्षरांनी बनलेलं आहे. यामध्ये देखील महत्त्वाची माहिती दडलेली आहे. आपण ते देखील जाणून घेऊ.
स्वस्तिक हे तीनच अक्षरांनी का बनलेले आहे?
स्वस्तिक हे तीन अक्षरांनी बनलेले आहे, याला देखील महत्वाचं कारण आहे. सर्वप्रथम आपण स्वस्तिक या शब्दाचा अर्थ काय आहे? हे जाणून घेऊ. स्वस्तिक हा शब्द ‘सू’, ‘अस’ तसेच ‘क’ अशा अक्षरांपासून बनलेला आहे. आता आपण ‘सू’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. ‘सू’ या शब्दाचा अर्थ होतो ‘चांगले’ त्याचबरोबर ‘अस’ या शब्दाचा अर्थ होतो ‘अस्तित्व’ आणि ‘क’ या शब्दाचा अर्थ होतो ‘कर्ता’ या सगळ्या शब्दाचा एकत्र अर्थ लावायचा झाल्यास, या सगळ्यांचा अर्थ होतो, “शुभ काम करणार” आता आपण घराच्या मुख्य द्वारावर स्वस्तिक का लावतात हे जाणून घेऊ.
यामुळे घराच्या मुख्य द्वारावर लावले जाते स्वस्तिक
आतापर्यंत आपण स्वस्तिक या चिन्हाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. मात्र आता आपण घराच्या दरवाजा किंवा दरवाज्याच्यावर स्वस्तिक चिन्ह का काढलं जातं? हे जाणून घेऊ. आपल्या घरामध्ये कोणीही प्रवेश करताना चांगले विचार घेऊनच प्रवेश करावा. असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र प्रत्येक वेळी चांगले विचार घेऊनच प्रवेश केला जाईल, हे ठामपणे सांगता येत नाही. चांगले आणि वाईट असे दोन्हीं विचार घरामध्ये प्रवेश करू शकतात. साहजिकच या वाईट विचारापासून संरक्षण व्हाव, यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह काढले जातात. असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.
याबरोबरच स्वस्तिक मुख्य प्रवेशद्वारावर काढण्याचे आणखी काही फायदे आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर जर स्वस्तिक काढलं, तर आपल्या घरामध्ये रोग त्याचबरोबर दारिद्र्य, वाईट विचार प्रवेश करत नाहीत. असे देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. सहाजिकच यामुळे आपले कुटुंब आनंदी, समाधानी, सुखी आणि समृद्ध राहण्यास मदत होते. स्वस्तिक हे नेहमी हळदीने काढलं जावं, अस देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हळदीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. हळद हे सूक्ष्मजीव त्याचबरोबर नकारात्मकता नाहीशी करते.
उत्तर आणि ईशान्य दिशेस स्वस्तिक काढल्यास होतो हा फायदा
हिंदू धर्मामध्ये ‘स्वस्तिक’ला किती महत्त्व आहे, या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेतली. मात्र स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत देखील आपण समजून घेणे आवश्यक आहे. स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत आणि दिशा जाणून घ्यायची झाल्यास, स्वस्तिक हे नेहमी उत्तर आणि ईशान्य दिशेला असणे आवश्यक आहे. स्वस्तिक जर उत्तर आणि ईशान्य या दिशांना काढलं, तर त्या कुटुंबाची नेहमी समृद्धी होत राहते. शिवाय देवांचा विशेष आशीर्वाद देखील राहतो.
हे देखील वाचा Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..
Work From home side effect: वर्क फ्रॉम होम मुळे मानसिक आरोग्यावर होतायत हे तीन गंभीर परिणाम..
Skin Care Tips: नियमित कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुवल्यास होतात हे आश्चर्यकारक फायदे..
Kitchen tips: हिरवे झालेले बटाटे खात असाल, तर सावधान! होतायत हे गंभीर आजार..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.